🌴 हेत हिरवगारं
पाटाया पाण्यावर हेत दुबार आवलं
मालक्षुमीया कृपेन नवसाला पावलं
डाणूसा वार्ली दादुस कात टाकू लागलं
होऊ दे रं डोंगरदेवा त्यास चांगभलं
आदिवासी पूत तो राब राब राबला
आवळा देवून धनकोनं कोहळा काढला
सोयी सवलती मोप पण कागदावर खोप
भगून देवा लावलेल वाढू देरे रोप
हिरवी श्रीमंती बनू दे सोनं केशरी
शिकुन दादू विद्या होड कमजोरी
व्यसन करुन येते बग दादू गंडेरी
हयातभर करव्या लागे वेठबिगारी
हो दादुस शाणा आता हिक विज्ञान
घात करते अडाण्याहा घोर अज्ञान
दिला तुला स्वतंत्र जिल्हा पालघर
उदो उदो होवो तुहा वांछी कविवर
........हेमंतराम पाटील. दहिसर मुंबई
9757340310
No comments:
Post a Comment