बायबोली वाडवळी
बायबोलीत कवन कवन मी रसतोय
वाडवळी बायबोली बोली मी जपतोय
करोत कोणी बायबाय नयते हायहाय
आशिश दे कवना ज्ञानराज गुरूमाय
माही बायबोली काव्याला साजरी
बायबोली दिवा लावू या घरोघरी
कवडेक वाडवळी अभिमानी कटृयावर
घेतिल बायबोली पालखी खांद्यावर
वाडवळी पताका फडकवू गगनामाजी
बायबोली रसाळ हांगे गोष्टी सुरस आजी
राखेतून जहा फिनिक्स पक्षी मारी भरारी
बायबोली बरसेल ही कविवरायी वैखरी.
............पी. हेमंतराम कविवर
No comments:
Post a Comment