कोरडेपाषाण
कोरडेपाषाण तुम्हीहो कुंपणावरचे सरडे
शासनदरबारी कामकाज लालफितीत अडे
कोरडेपाषाण अतिरिक्त वेतनही पदरी पडे
तरिही नीज कर्तव्यात पेंड खाते कुठे रे घोडे
कागदपत्राची दखलही जर घ्याविशी ना वाटे
मग जावे तरि का सरकारी नोकरीचिया वाटे
काम दिसामाजी थोडे तरि म्हणती अतिलोड
खुर्ची तापविती सातघंटे धारिणीवर धुळवड
नोकरीस्तव घातले का रे मध्यस्थांना साकडे
मोजलेही असेल दाम चहापानास्तव रोकडे
कोरडेपाषाण ऐसे कैसे झाले दरबारी मुखत्यार
ऊतून मातून मोप करून राहिलेत भ्रष्ट आचार
आम्हा माळीयाची जात पडताळणीस रवाना
तप लोटले धारिणी गायब खाद्य उंदीरमामांना
जोवर या कोरडेपाषाण खाबूंचे आहे अधिष्ठान
कैसे यावे अच्छे दिन नि व्हावा भारतदेश महान
कवी- हेमंत राम पाटील. दहिसर,मुंबई .
8108419392