Tuesday, 29 August 2017

अपघात

अपघात

आसमुंड्या खिंडीमन अपघात बैलगाडीला झाला
बैलगाडीया हाटा उलाल होउन गाडीवान गेला
ऐनजवानीत वामन आबा हकनाक बळी गेला
भोटा दादा लक्षुमण बहु शोकाकुल जाहला

तीन गाड्याहा तांडा वापीभात घेउन परत निघाला
आसमुंड्याखिंडीत वामनाहा ढवळाबैल बिथरला
धाडसी वामन म्होरक्या पागे होडून बैलांपुढे आला
बैलांस्या नथी पकडून बैलगाडी पोते ओढू लागला

परि कृतांत काळ बळी घेण्या सरसावून आतुरला
बैलगाडीहाटा उलाल होउन वामनाअंगावरुन गेला
वरोरी गाडीवान तांडा निःस्तब्ध विद्ध मनी झाला
कलेवर घरी येता घरपरिवार शोकाकुल जाला

काळाने झडप घालून रामबाळा पोरका केला
बुटुकल्या राम माताहे सौभाग्य हिरावून गेला
हेराम कथिता कथा ही अंतरी विरहीत झाला
वामन आजा तुवा ही वाहतो शब्दसुमन माला

...............पी. हेमंतराम  कविवर.

Tuesday, 22 August 2017

भादवा

भादवा
भादव्यासा मयना कुत्रे माजले भारी
रस्तोरस्ती गल्लोगल्ली साले कुत्रेगीरी
तावडेवाडीतले गावठी रागीट कुतरडे
चावता जोरात वाचमन गुरखा रडे

येता जाता कुत्रेप्रेमी बिस्किटे खिलवती
खाऊन भुसकुटे जयतय घाण ते करिती
परवादिह्या सोसायटीस्या सचिवाया दारी
कुतरडे मोकळे जाले होडून धार मुतरी

काल कुतरड्यांनी कमालीहा कहर केला
चेअरमनस्या चेअरवर सुगंधी संडास केला
पयले मनपाव्ह्यानने भटके कुत्रे जेरबंद केले
नंतर मानवतावादी प्राणीमित्र आडवे आले

रात्रंदिन भुंकत राहती झोप हराम करिती
उपाय सालेना काही दत्त दत्त नाम घेती
सरावण भादवा हिरवळ मस्त गावाकडे
नगरात कोंडवाडे आणि उपद्रवी कुतरडे

..............पी. हेराम कविवर.