पाडोळे
पाडोळे आम्ही पक्के हो पाडोळे
आवतण अहो वा नहो पाऊल हे वळे
लगीनआहेर नहीन तय आवर्जून जाती
जेवायाला पयला नंबर पयल्या पंक्ती
आवळा देवून काढतो कोहळे
सोहेळे पाहेळे वाडवळ सोहळे
हजेरी लावून विणतो घट्ट अहे जाळे
पाडोळे आम्ही पक्के हो पाडोळे
लगुरी तोंडदेखली वळख आम्हा पुरते
वळखपाळख नहली तरि आम्हा सालते
ये तोंड आमसे भलतेस बो बो खादाड
ज्याही पोळी त्याला टाळी ऐसे आमी द्वाड
चांद्यापासून बांद्यापर्यंत रूजली आमसी मुळे
पाडोळे आम्ही पक्के हो पाडोळे
देशाटन पर्याटन तीर्थाटन करुन सभेत संचार
जोडलयं शाणपण डायपण माहणूपण फार
मुक्कामाला कोठेही आम्हा मोकळी राऊळे
पाडोळे आम्ही पक्के हो पाडोळे.
.........पी. हेमंतराम कविवर.
No comments:
Post a Comment