पितृदिन
हेतात राबला बाप निंबरात तापला रे खूप
जगविण्याहाटी लेकुरां उपाशी जागला बाप
सालायसा बारकेपणी हातामन घेऊन हात
कामातस पाहे राम टाळ कुटण्या ना उसंत
भणविले त्याने हाती देऊन बोरूही लेखणी
ओठी होती त्याह्या तुकोबाही अभंगवाणी
जाहलोरे भोठे जहेजहे हात हुटतस गेला
आता आठवत रेतो माया बापाया वेंघेला
जवा सोबत होती तवा पाहिला नेक माहणू
नय होती मुशाफिरी कवातरि फेरी डहाणू
बदलले जहे जग बदलले तहे रंग ढंग संग
बदलला नय रे बाप साठीत गाठी पांडुरंग
पी. हेराम कविवर.
फादर डे २१/०६/ २०२०