Sunday, 9 July 2017

हावटला माल लय हाल जाले

हावटला माल जाले हाल
हावटली दुहर्याही दौलत आंगावर आली
ढुंगणावर लाठ्या बहतास लय कळ आली
पयल्यापासून वाढवण बंदर उपेगी चाचांना
स्मगलींग माल उतरविण्या आसरा बोटींना

एकदा राती गाववाल्यांना बोटीहा माग लागला
जो तो समुंदरतीरी धावला माल हावटायला
रेडलेबल ब्लँकलेबल दारु न उस्सी कपड्याला
लोकांसी भर करुन चाचा अंतर्धान पावला

बिज्या दिहा आख्खा गाव हावटली दारू प्याला
कोणी भारणात हेणकईत जयतय माल दडवला
खबर्यांनी पोलिसांना इथंभूत हांगावा कळवला
लाठ्या ढुंगणावर बहतास माल दफ्तरी जमा जाला

...........पी. हेमंत्राम  कविवर.

Saturday, 8 July 2017

गुरूवंदना

गुरूवंदना

पां.मा.पाटील गुरूभूषण मूर्तिमंत श्रमिक
डुलवून बाळा शिकविल्या शाळा अनेक
रंक राव ते समान लेखून समतेचा पूजक
गतकालाचा वरोर ग्रामी आदर्श शिक्षक

माजीगुर्जींचा कैवारी निवृत्तजना आधार
धडपडणार्या गरजू ज्ञानार्थींचा मदतगार
वर्तन वादातीत शुभ्र वसन नित अंगावर
पाटील मान्यवर तत्वशील सद्भावसदाचार
टीका टिपण्णी रागरोष नच कधी कुणावर
लखलखित चारित्र्य झिजला चंदनापरि थोर

...........पी. हेमंतराम कविवर.9757340310

Saturday, 1 July 2017

वृक्ष फलदान

वृक्ष फलदान

आता वृक्षात्मके देवा
येणे वाडवळ तोषवावा
तोषवून सकला द्यावा
फलपुष्प रानमेवा

ज्याने लागवड केली
वा ज्याने खांडोळी केली
त्या दोघाही एकस सावली
देई वृक्ष माऊली

मी लाविले अर्जुन तरुवर
फक्कडवाड्यात ग्रामी वरोर
रामबाण उपाय हृदरोगावर
आश्वस्त करी कविवर.

.........हेराम कविवर.

वृक्षदिन

वृक्षदिन

धन्य धन्य तरुवर सांभाळून पर्णभार
सावली मायेची देवून करी आम्हा गार
झेलून अंगावर ऊन तुफानभरलं वारं
पत्री फूल फळ दाता ऐसा विश्वंभर

निस्वार्थ तुझी सेवा जन खाती रानमेवा
खाल्या पानावर छीटू नकोस मानवा
सपासप चालविती कुठारी असुरी कावा
उजाड डोंगर रान खेडोपाडी गावोगावा

वर्षाकाठी एकदिन वृक्षारोपण दिखावा
शंभरटक्के  हरितक्रांती करति फुका दावा
बुडलोट कटाई केले हिरवे जंगल सपाट
भोवतो आहे आता निसर्गाचा तळतळाट

धरीत्रीचे असाल जर सकल सच्चे धन्य पुत्र.
लावून झाड जगवा तरुबन वृक्षसंवर्धन सर्वत्र
स्मरोनी महाराज शिवरायांचे सार्थ आज्ञापत्र
कविवर जाणितसे वृक्ष जैसा नसे अन्य मित्र.

.........पी.हेमंतराम  कविवर.