Monday, 27 March 2017

गुढी पाडवा

गुढी पाडवा

उबारारं गुढी आज हण गुढीपाडवा
होडा मना मनासी अढी वर्षारंभ नवा

घोरत काय पडल्यात लोळत ढोरावाणी
डोकर्या जाल्यात हरणी न तरणी जाल्यात बरणी

रामपारा वासुदेवा पोतदारा जाला फेरा
गाडवापुढं वासली गीता कालसा गोंधळ बरा

आता ऊठारं पुसारं घर आवरं पसारा
हारवणादिही खपले झाडू तरि मारा

पाडाला लावतो आंब्या घुळी भगुन पाडवा
पाडाया पिकल्या आंब्यागत गोड बोल मानवा

आला आला पाडवा गुढी ऊबारा दारा
पै पावणा येल त्याहा पाहुणसार करा

मनपूत घण्या घण्या शुभेच्छा पाडव्या
नववहरा पुर्या होवोत आशाआकांक्षा नव्या 🌹🙏🏼

.........पी. हेराम कविवर.

No comments:

Post a Comment