Sunday, 12 March 2017

धुळवड

धुळवड

आली धुळवड होळी सरता सरली
पोटृटी उधळा खेळत रंगरंगात नहाली
महापाही नवते रंग टोळकं रंगवाया आलं
मंग पाटलाया ओट्यावर पोतं सिमेंटस दिहलं

मायामेरे आला वर्सडपोट्ट रंग उधळायाला
पोत्यातल सिमेंटानं त्याया पुतळास केला
वानरटोळकं एकत्रित आंगावर धावून आलं
मला बठ्ठा हुसलून आळूया खाड्यात माखवलं

तवापासून वानरवाडी मी साफ वर्ज्य केली
धुळवड उधळाया पुनः नय हिंमत जाली
बरा जरि हा इथं गावापासून मी कोसो दूर
परि हरेक धुळवडी सय येई लागे हुरहूर

............पी. हेमंतराम कविवर.

No comments:

Post a Comment