Saturday, 25 March 2017
वैकुंठाची वाट धरा
घाला धुमाकूळ हकिम वैद्यांनो अँलोपथीच्या नावानं
दिली मुभा तुम्हा डाँक्टरकीची भारतीय सुप्रिमकोर्टानं
रोगी जनानो दुर्धर रोग पोखरतो अपुल्या शरीरा
हकीम वैदूंना शरणागत हो वैकुंठाची वाट धरा
गुणवत्तेचा निकाल लावून कोर्टाची व्यवसाय हमी
खुशाल व्हावे हकीम वैदू खर्च कमी नि श्रमही कमी
आयुर्वेद होमिओपथी युनानी पुरातन वैद्य परंपरा
हकीम वैदूंना शरणागत हो वैकुंठाची वाट धरा
कोर्ट तारी हकीम वैद्यां एम सी आय मान्यता नसे जरि
कशास व्हावे एमबीबीएस मुन्ना खर्चून भारी द्रव्य तरि
सुखेनैव अँलोपथीअनुसरा वैदूंनो तुम्ही खिसा भरा
हकीम वैदूंना शरणागत हो वैकुंठाची वाट धरा
चिंता सोड त्रस्त पालका एमबीबीएसचा नको हेका
ताणतणाव दुःख देवूनी पिडू नकोरे सुज्ञ बालका
एमबीबीएस सरकारी डाँक्टरा पडतो प्रसंगी मारा
हकीम वैदूंना शरणागत हो वैकुंठाची वाट धरा
.........हेमंतराम पाटील.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment