Saturday, 25 March 2017

होऊ दे चांगभलं

होऊ दे चांगभल

पाटाया पाण्यावर हेत दुबार आवलं
महालक्षुमीकृपेनं बग नवसाला पावलं
डोंगरी दादुस नांग कात टाकून राह्यलं
होऊ देरे डोंगरदेवा त्याह आता चांगभलं

मातीहा माहणू दिनरात राब राब राबला
आवळा देऊन धनकोनं कोहळा काढला
सोयी सवलती मोप परि कागदावर झोल
होऊ देरे डोंगरदेवा त्याह आता चांगभलं

हिरवी शिरमंती लाहो देवा सोनं केशरी
शिकून शाळा दादूस बन डोंगरी पुढारी
वेठबिगारीहं दुःख बापजाद्यांनी भोगलं
होऊ देरे डोंगरदेवा त्याह आता चांगभलं

हो दादुस शहाणा आता शिकून विज्ञान
घात करी अडाण्याहा घोर- अघोर अज्ञान
बो प्रयासानं तुज जिल्हा पालघर बहाल
होऊ देरे डोंगरदेवा त्याह आता चांगभलं

...........हेमंतराम  पाटील.

No comments:

Post a Comment