झरे आटले
बायबोली मायबोली पाझरते झरे क्यव आटले
पाषाण फोडून उफाळणारे कारंजे कोठे लोपले
नवाळीतले ते नवाळे उसासे मुळी नय उरले
बायबोली फलित तरूंवर बांडगुळ फोफावले
माथाफोड करून माथा सुन्न नुसता जाहला
गाथाकार तुका वाडवळी ना गवसून रेला
मीच माझा एकला लिवत गेलो कवनावली
नामयाची पाटी माही कोरी करकरित राहिली
बायबोली झोळी माही रिकामी भरणार कोण
खोवळू जाता शब्दलेणी शब्दसंपत्तीही वाण
एकसंध वाडवळपूर्वासुरी धर्मांतराने वेगळाले
कवडेक सिनोर कुपमंडूक कुपवृत्ती कुपात रेले
ज्यानं त्यानं बायबोली वायला संसार मांडला
नगरवासी मूळ वाडवळ वाडवळीला मुकला
मायबोली अस्तित्वाहाटी धायमोकलून जटे रडे
उमलतील का निर्जळी वाळवंटी बायबोली माडे
......पी.हेमंतराम कविवर.8108409392