Tuesday, 7 November 2017

पार्श्वभूमी बायबोलीही

✍  पार्श्वभूमी बायबोलीही

आजवर बायबोली उपेक्षीत सालोसाल रेली
मराठीमायला वासव्याहाटी बुलावा बायबोली
इंग्रजीतटे लोकांसा ओघ वाढतावाढता वाढला
बहुजनांसा प्रवाह आपसुक फादरटंगकडे वळला
बामणीमराठी पीढी कव्वास आंग्लाळली
मायबोली बिसारी बायबोली बयणीअहून एखली
अवडी वहर बायबोलीला नवतं अजिबात स्थान
पणआता बायस्यावीण मायस बहेनय बस्तान
भगुन बोलीबाबत सकारात्मक धोरण घेतल जातयं
त्याहामागे हीस एक पार्श्वभूमी ठाम हाय.
हेमंतराम कविवर सज्ज हाय वाडवळ
मायबोली रथ ओढव्या आपुले आशीर्वच बळ.

तरुवर कुठार

तरुवर कुठार

कुराड हांगे तरुवराला
वरसड कोण तू का मी
मायास दांडा आधार तुला
पोतेह्या पायावर उभा रे मी

फलाहार भुकेल्या जीवाला
तानभूक शमवितो मी
थकलाभागला माया सावलीला
बांधाया घरकुल उपयोगी मी

ममा फुलांनी देव हजविला
चंदन बनून झिझातो मी
पावसाने चिंब केले धरतीला
कारण भूवर उभा हाय मी

माहा श्वास जगवी जीवाला
माणूस जगण्या आधार मी
अरे मरत्यामनुजा सोबतीला
सवता सरणावर जळतो मी

देवाया ठायी जागा हाय मला
वृक्षदेव सकलां पुजनीय मी
नकोगे कुठार विसारु मजला
दोगात वरसड तू का मी

अवड्यात कुर्हाडीया घाव पडला
कण्हत वृक्ष रुदन करी अंतर्यामी
कह हमजावू या माह्या अर्धांगाला
पातं वेगळं तरि दांड्यात मी.

..........पी. हेमंतराम कविवर.

Sunday, 5 November 2017

आयतोळे ऐदी

आयतोळे ऐदी

बडीशेप जिरं शेपा नि  ओवा
आजीया बटव्यातला हुक्मी दवा
आजकालस्या या लवबर्ड ओवा
दूर सारतात आजीहा नामी बटवा

हल्लीया ओवांना टूरटूर गोवा
मुठीत ठेविती परिणीत घोवा
जगतात हावू मुठीत घेऊन जीवा
दे माय धरणी ठाय करतात ओवा

आयत्या बीळात डुलतो नागोबा
बायकोपूढ्यात होयबा होयबा
ओवांना हवा सासरी घरावर ताबा
जावया जीवावर मायेरसा ढाबा

खायला आधी कामाला कधीमधी
हावूला कामायी गर्दी ओ रगडे गादी
हावूहहरे जाले सवतः घरात पाबंदी
ओ-होकरा वाढा ऊठवती हरामी ऐदी

.........पी. हेमंतराम कविवर.

Wednesday, 1 November 2017

अल्लाही आळी

अल्लाही आळी

अल्लाही आळी परणली एक बाळी
माहणारुपात राकुस आला रे भाळी
रोज रोज दारू पिऊन मारव्या गाळी
गोठ्यात बांधूनबाईल करी लाथाळी

अल्लाया अल्लडबंदा डोसक्यानं तापट
हांस्यापारा बेवडा झोकून होई बो ताईट
हालहाल करून फोडून काढी पाठपोट
ऐन जवानीत तळीरामानं लावली वाट

दुखर्या पाठीन मायेरी कहिबही यायसी
सखूमारीण शिंग फुंकून रोंब काढायसी
पणबिसारी धाकानं हैवानाघरी परतायसी
यमकोंड्याघरी नरकयातना सोसायसी

एकदिही अस्तमानी बोठा  कहर जाला
सैतानाने बावीत बेधडक ढकलले तिला
अल्ला आळीसा अल्ला हतबल जाला
वहराआत परिणित आतूहा बळी गेला

..........पी. हेमंतराम कविवर.