🌶 छंदी फंदी घरजवाय
हासर्या हासूया सख्खा घरजवाय
छंदी फंदी पितरं जकल्या व्यसनायं
देशी गावठी खोपडी पिऊन बो बो झिंगाट
हकाळ दुपार अस्तमानी रात्री सैराट
कामधाम काय नाय निजतो टाकून खाट
बायकोयी कमाई खाऊन लावतो तिही वाट
मटका जुगार खेळतो लावतोया सट्टा
जवाया जातीला गालबोट कुळाला बट्टा
हहर्याये पैसे सोरतो रगड दारू ढोसतो
हालतडुलत येतो बो बो वाढाआराटतो
टगेगीरी करव्याला नाक्यावर हिकला
हाऊबायस्या लाडामुळे शेफिरून राह्यला
वय घण नय जाल तरि तो पिकला
व्यसनापायी हासर्या हासूला रडवला
अहा जवाय विकत घेणं परवडेल काय
No comments:
Post a Comment