Thursday, 30 March 2017

लाल लाल तांबोटी

🍅लाल लाल तांबोटी

लाल लाल तांबोटी बिलिमोरी तांबोटी
खाटीमिठी खाटीमिठी खाटीमिठी खाटी

लक्षुकाकाया वाडीत माघात येव्या बाज
काय तो नजारा जकल्या पंचक्रोशीत गाज

आता सुधारित तंत्र सुधारित बियाण वापर
शिक्षित हेतकरी तरुणा येवू दे टमाट्या बहर

लाल टमाट्याहा करा डबाबंद साँस
वाया घालवू नका आता टमाटासर्रास

टमाटा ज्यूस घरसेघरा स्वस्त अन मस्त
किमती देखिल किफायती वाजवी रास्त

टमाटर कच्चं खा नयते करुन कोशिंबीर
आमटीत वरणात कालवण होई लज्जतदार

बारा महिने तेरा काळ घ्यावे टमाटा सूप
बगा रगत सुद्द होऊन पालटे कुरुप रूप

...........पी. हेमंतराम कविवर.

No comments:

Post a Comment