Tuesday, 21 March 2017

अरण्यरुदन

अरण्य रूदन

वृक्षावीण जीणं रुक्ष वैराण वैराण
नकोस कुठार्या घाव घालू दाणादाण
जंगल तोड प्रचंड झाडं केली बुडलोट
घनदाट हिरवे रान जाले तप्त वाळवंट

डोंगराहे माथे बोडके टकले टकुरे टकूर
केले माहणा मसाण तोडोनिया तरुवरं
धरणी ही मायअपुली तिही करता विटंबना
पाऊस बरसावा भगुन दगडासी आराधना

कारे माहणा काहून अक्कल गहाण ठेवली
सवता हातान भावी पीढीहाटी कबर खोदली
आज एकवीस मार्च जाणं जागतिक वन दिन
कर परिमार्जन झाडं लावून सिंचून जोपासून
 
अरे माहणा माहणा घाणलास बो बो घणा
वन्यजीवांसाही तू ओरबाडला चारा दाणा
सब्बन ते तुयाहाटी पैदा करत नाय ईश्वर
हक्क का  जकल्यावर एक दिन सरणावर.

.........पी. हेमंतराम कविवर.

No comments:

Post a Comment