Wednesday, 28 June 2017

कुणबीराजा

कुणबीराजा

मी हाय कोकणासा कुणबी राज
मला कोणी देईना लाखावारी कर्ज
मी कुणा घालू साकडं कुणा करु अर्ज
माणदेशियांनो मला का करिती वर्ज

अरे सरकारा मी पण माहणू हाय
माही पयल्याहरकी नय आमराय
पोफळी माड आता रायले न्हाय
अडते घुसल्यात बिहारी दलाल भाय

नाशिक नगर पुणे राजकारणी ठेला
आजतागायत  कवडाक घोटाळा केला
लाखोगणिक कर्जे  दिली आप्तगणाला
बळीराज पेटवून कर्जमाफी लाभ उठवला

तो आकाशातला बाप्पा बगतो तुमाला
तैसिची फळे देतो तुमस्या खोट्या कर्माला
लय पुळका येऊन रायला बळीराजाहा तुमाला
भगुन दीडलाखाहुन अधिक लाटण्या अधिरला.

...........पी. हेमंतराम कविवर.

Sunday, 25 June 2017

वंशज्वाला

वंश ज्वाला

पोराला हांगतात वंशदिवा
पोरी खरोखर वंशज्वाला

पोर लगनानंतर होतो वायला
पोरीया आधार आयबाबाला

आजकाल पाहता पोरी हुशार
सब्बन क्षेत्रात शेंड्यावर

आयबाबा कष्टानं घेतात घर
नागोबा आयत्या पीठावर

बापकमाईवर पोराह्या गमजा
उधळपट्टी करुन करतोय मजा

पोरी कमावून देते आयबापाला
लगिन जाल तरि जावई भला

पोराय शिक्षण करता निघे दिवाळ
खावी लागति ऊपाशी रताळ

पोरी पाठवणी करता सासरला
नामस्मरणी जीव धन्य जाला

पोराह लगिन करुन ओ आली घरला
आमरण जीव संसारी खपखप खपला.

.......पी. हेमंतराम कविवर.

Tuesday, 20 June 2017

लग्नाला सला

🌺😅लग्नाला सला
सला सला सला लगिनाला सला
साळकाया माळकाया लगनाला सला
वराडी जमले पाटील-राऊत
म्हात्रे -चौधरी पुरव-ठाकूर
हळदीया रंगात रंगले वधु-वर
जावू सला अक्षता टाकायला
सला सला सला लगनाला सला
साळकाया माळकाया लगनाला सला.

ढम ढम ढोलक्यावर वाजते पिपेरी
नवर्याहंगे तालावर नासते नवरी
मामा मामीला नासवतो
काका काकी हंगे फेर धरतो
पोरपोर्या सार्या करती दंगल
आप्त मित्रगण चिंतती मंगल
लगिन गीतांनी केलीयं कमाल
जावू सला धमाल पहायला
सला सला तुमी लगनाला सला
साळकाया माळकाया लगनाला सला.

.........पी. हेमंतराम कविवर.🙌

आंब्या तुला

आंब्या तुला काय वर्णू

आंब्या तुला काय वर्णू
काय वर्णू दादुस काय वर्णू
तुह्यासरे तुह्यासरे
तुह्यास खोडाय ढमढम ढोलक केलं

आंब्या तुला काय वर्णू
काय वर्णू दादू काय वर्णू
तुयासरे कैर्याह बेडेकर लोणसं केलं

आंब्या तुला काय वर्णू
काय वर्णू दादू काय वर्णू
तुयासरे फळ्या पाडुन माळा केला

आंब्या तुला काय वर्णू
काय वर्णू दादू काय वर्णू
तुह्यासरे पानायं दहर्या आंबोत केल

आंब्या तुला काय वर्णू
काय वर्णू दादू काय वर्णू
तुह्यासरे माचावर आमी अभ्यास केला.

..पी. हेमंतराम कविवर.

Sunday, 18 June 2017

भारत xपाक

भारत x पाक
आले भारत पाक आमने सामने पीचवर
क्रीकेट खेळायला
एकशे ऐसी धावांनी भारताया पुरता पाकने
धुव्वा की रे उडविला
जाला कुंबळे शोकमग्न कोचमन अबोल
की जाहला
सेटींग फिक्सिंग होउ लागले काय पुनः
विसारात पडला
दोन दिह्या पयले बातमीपत्रात त्याला सटृटे
बाजार आकळला
एक रुपयाला सात रुपये पाकिस्तान जर
सामना किहो जिंकला
भारत जर जिंकला फायनल एकास दोन
रुपये लाभ सटृयाला
पाहून सटृटा बाजारभाव असला धनको
जिंकवि पाकला

.............पी.हेराम कविवर.

नटसम्राट

नटसम्राट

आमी बाप जालो आमी बाप जालो
साफ खोटं, सर्रास खोटं

अरे अवकाशात भटकणारा एखादा आत्मा
आमस्या वासनेपोटी जल्माला येतो
न आमी हांगतो आमी बाप जालो

अरे आभाळ पाठीर वावून नेणार्या हत्तींना विसारा
ते हांगतीन कोणी कोणाय नहते.

एका बाजुला ज्याला जल्माला घातला
तो पोरं बापाला विसारत नय
न बिज्या बाजुला ज्यान आमाला जल्म दिला
तो तू विधाता पण आमाला विहरते

मंग ए करुणाकरा या उतार वयात डोकरपणी
आमसी डोकी आमी कोणस्यापुडे आपटावीत?

जगावं का मरावं एकस सवाल हाय?

.......नटसम्राट नाटका स्वगत वाडवळी
फादर डे निमित्त.

.........हेराम कविवर.

फादर डे

फादर डे

फादर रडे फादर रडे फादर डे
फादर मदर मायदेशी सडे
सुखदुःखात कोण नय भगुन अडे
फादर रडे फादर रडे फादर डे

डोकरी आथरुण धरुन हाय
डोकरा बिसारा सेवा करतोय
पोरबाळं परदेशी पैशा वेडे
फादर रडे फादर रडे फादर डे

याहाटीस धरला का इंग्रजी अट्टाहास
आता अडतोय मातापित्याहा घास
पिळवटून निंगते उभयताः आतडे
फादर रडे फादर रडे फादर डे

मंग अप्पा नटसम्राट कानात गर्जले
कोण कोणसा नय विसार आभाळाले
प्रतिकुल जे दैवी अहेन तेस जगी घडे
फादर रडे फादर रडे फादर डे.

.........पी. हेमंतराम कविवर.

Saturday, 17 June 2017

कृष्ण कृष्ण

🙏🏼कृष्ण कृष्ण जय श्रीकृष्ण
थांबव जीवनी महाभारत रण
किसान पिकवी भूवर कणकण
अडते दलाल लुटती मणमण

हेतकरी घाटावर हैराण हैराण
नय मिळे पेरणीस त्याला वाण
राखून ठेवी कोकणीकुणबी बियाण
स्वाभिमानी राजा भूवरी जाण

हरसाल कर्जमाफीय गराण
ही अवस्था भयाण भयाण
रुण काडून करति साजरा सण
हुंडावळी जेवणावळी दारुमटण

या हलाखीस कारणीभूत कोण
का पेटून रेलयं रणरणतं राजकारण
कृष्ण कृष्ण कृष्ण जय श्रीकृष्ण
सरणावर किसानाहे नको अकाली मरण

........पी. हेमंतराम कविवर.

Monday, 12 June 2017

बोलकी सूल

बोलकी सूल

काल रातीला कानात बोलली सूल
बटाट्यागत फुगलीत बाळं -मूलं
त्यांना पायजे चायनीज जंक फूड
त्याहाटी करतात वेडीपोरं रडारड

मंग मायलासुद्धा येते मायेहं कढ
फास्टफूड आयते आणुन वाढा वाढ
पोटाही ढेरी वाढतेय शहरी घरोघरी
गब्बर कमाई करुन खाऊकट्टा लयभारी

फोफावले भय्ये तंभी नगरोनगरी जकल्या
सूली रुसल्या संसारी ओवा करती टीवल्या
आयुष्य हे सुलीवरले कढई कांदेपोहे
घरसे खाव्या होडून जो तो रेडीमेड पाहे.

.........पी. हेमंतराम कविवर.

Thursday, 8 June 2017

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा

हांगे वड वल्लरिला फांद्या तोडून बोडका केला
सात जल्मपतिव्रता वसा सावित्रीनं सत्ययुगी केला
सजा मात्र मला जल्मठेपी देउन बांदिवान केला
जकलेस सत्यवान तर दुःख क्यव पतिव्रतेला

योस नवरा पायजे जहा काय सद्गुणाहा पुतळा
क्याला वटपूजा ढोंग जरि जीवा लागती कळा
नवरोबा तळीराम आसाराम सुधाकर लाभला
जकलेस सत्यवान तर दुःख क्यव पतिव्रतेला

वटवृक्ष शाखा तोडून गृहशांती कैसी लाभेल
धागा गुंडाळून व्यसनाधीन कहाक सुधारेल
एका जल्मात हौस फिटली सात जल्म क्याला
जकलेस सत्यवान तर दुःख क्यव पतिव्रतेला

दोघांना पुडसा मानव जल्म भरोसा काय धरावा
वेगवेगळ्या  योनि आपला तुपला काय निवडावा
मुळात पुनर्जन्म नहेन तर खटाटोप वाया गेला
जकलेस सत्यवान तर दुःख क्यव पतिव्रतेला

........पी. हेमंतराम  कविवर.

Monday, 5 June 2017

गाई पाण्यावर

गाई पाण्यावर

गाई पाण्यावर बळिराजा आल्या
पोटभर चारा पाणी ना मिळाला
वासुरे उपाशी अन दूध ते तुमाला
रस्त्यावर सांडून चिखल का केला

भाजीपाला  फेकून  वाया घालविला
माणदेशी भूमी देवतेहा कोप ओढवला
मंत्री  संत्री तुमसेस बहुकाळ राज्यकर्ते
कर्जात बुडवून तुमा केले साफ नाकर्ते

जहा काय घोर अन्याय तुमावरस जाले
कर्जमाफी देउन सतत करदात्या नागविले
कोकणी बळीराजानं काय घोडं मारलं
त्यांना बुडताना कवास का नाय तारलं

अरे सरकारा घ्या जकल्या जमिनी ताब्यात
सामुदायिक सरकारी शेती येऊदे लावणीत
हुंडाप्रथा व्यसने यांना कदा दूर करवेनात
जिद्द हरवली यांसी करण्या संकटावरी मात

वीजमाफ कर्जमाफ निवृत्तीवेतन सब्बन हवे
मागण्याला अंत नाही पुरवणारे सरकार द्यावे

.......पी.हेमंतराम कविवर.

मांडेरी बळीराज

मांडेरी बळीराज
मांडेरी डोंगरी बळीराज लावी फुलोरी बाग
सतरा बोअर मारले जकले गेले वाया नांग
मांडेरी बळीराज तरिपण नाय डळमळला
जिद्दीनं त्यानं आठरावा बोअर वेल खणला
  
अठरावा बोअर मारला नि  समत्कार जाला
कातळासन पाण्याहा जोरदार फवारा उडला
वरकस डोंगरी पथरी जमीन जलानी भिजली
नाग चाफेकळी रोपारोपातून बहारास आली

चाफा बोलला चाफा फुलला बळीराज खुलला
वाडवळी मांडेरी डोंगरी श्रमदेव प्रसन्न जाला
आता मांडेरी डोंगरी मळा आमराईनं विनटला
हापूस कलमांस्या झाडा आंबा पाडाला लागला

अटे पालघर जिल्ह्यात राजकारणी नाही वाली
भगुनस श्रमगंगा होऊ देईना झोळी कवा खाली
कठोर परिश्रमाबिगर पर्याय नाही कोणता दुजा
तरिच कष्टाह्या कमाईत सुखी आमसा बळीराजा

.......पी. हेमंतराम कविवर.

Friday, 2 June 2017

नरपड शिक्षण केंद्र

नरपड शिक्षण केंद्र

बोर्डी जालं कोसबाड जालं आता नरपड सज्ज
शिक्षणकेंद्र फक्कड धडपड छात्र होणार जज्ज
आगळावेगळा  उपक्रम भूषण स्नेहवर्धक मंडळा
विद्यमान शिक्षण मंत्री भेट देती ओळखून काळा

कार्यसम्राट समाजसेवक नरपड सुपुत्र महेश
गावाबरोबर सोपाक्ष समाजाहा होवो विकास
समाज सेवेतून घडतो महाणू जाणून पुरुषार्थ
अहीस सेवा घडू दे सदैव जीवनासी येवो अर्थ

अनंतकोटी शुभेच्छा महेशजी यश हे तुमा वरदान
त्रिवार अभिनंदन करोनि कविवर करितो आभिवादन

............पी.हेमंतराम कविवर.