Thursday, 30 March 2017

डाँक्टर

💉💊 डाँक्टर

जीवाहा देव तोसि डाग्तर
दुर्दैवान एखादा जीव जातो वर
मंग डाग्तरावर करतात माथेफिरु वार
यो डाग्तरांवर अन्याय हाय घोर

साईदेवाला नवस फेडव्या जातात
वाटेत अपघात होती जिवाला मुकतात
मंग साईदेवाला ईजा करतात काय
तह नहेन तर डाग्तर देवा क्यव अन्याय

काळूदेवी अवकृपेन गेले तीनशे बळी
मंग त्या देवीला तुमी सडवल का सुळी
जीव वासव्या डाग्तर करी जीवाय रान
अपप्रसंगी जीवावर उठता होऊन हैवान

शेंदरी दगडी देवा डरपोक देती मान
डाग्तर मानवदेवाहा करती अवमान
जल्म मरण ना डाग्तरहाती ते दैवाधीन
हात नका उगारु डोक्यात राख घालून

.........एच. आर. कविवर.

No comments:

Post a Comment