Tuesday, 28 March 2017

आमी वाडवळ

🌶 आमी वाडवळ

आमी वाडवळ आमसा जाय नय वळ
बापजादे बलराम लाभलं आमा बळ
रामबाबा भावली आमसी पडवळ
हिजेना आमस्यापुढं कोणाही डाळ

लासारी  रक्तात नय खोटेपणा वाव नय
बाप दाव नय ते श्राद्ध कर हेस आमा ठाव हाय
ताठ आमसा कणा न ताठ हाय बाणा
भल्या तरि देवू लंगोटी एरवी सोटा हाणा

पोटात एक ओठात एक अही नय ही जात
बोलेल ते तोंडावर पाठी करणार नय घात
माणुसकी अजुन होडली नय होडणार नय
माहणा माहणू घडविते वाडवळी बोलीबाय.

..........पी. हेमंतराम  कविवर.

No comments:

Post a Comment