Sunday, 19 August 2018

कन्याकुमारी

कन्याकुमारी

झरताना श्रावण सरी
       वाटते लय भारी
देवभूमी दख्खन सारी
माणसान बुडवली श्रीहरी
     
पैशासाठी घाव डोंगरी
       निसर्ग केला भिक्कारी
बिचारी केरळकन्याकुमारी
श्रावणात झाली दर्दभरी

खणुनिया खनिजाच्या खाणी
तुमडीभरूंन खळखळली नाणी
मग केली निसर्गाने झोडणी
कोसळले आभाळ दक्षिणी

...पी. हेमंत राम  कविवर.

दहिसर मुंबई.

पडका बंगला

[Image 309.jpg]
         
           पडका बंगला

शहरीबाबूनं बंगला बांधला निर्जनी ओस पडला
जागाठागा जागस्या जागी उगा घोर का जीवाला

तुहं ते माहं माहं माह्या बापायं इस्टेट परि बेवारस
पापी जीवाला हुटेना कदा जमीन जुमला हव्यास

लोभ्याहं धन धोबी खाय देहायाही भरवसा काय
आला बुलावा उप्परवाल्या नंगा आया नंगा जाय

माणसी एकेक बंगला गाडी लागली स्पर्धाहोड
अटे ओढतो तटे ओढतो भलतीस ही ओढाओढ

गिळून दौलत हपापाही जमवली माया जकली
वर्ख लावून होनेरी विकतो माल जकला नकली

पडका वाडा पडका महाल जालासे भूतबंगला
शीतेही नाहीत शेतीही ओस भूतही ना थार्याला

....कवी- हेमंत राम पाटील.8108419392.

Friday, 17 August 2018

वरोरी आद्य वैद्य

वरोरी आद्य वैद्य
वैद्यराज रघुनाथ माधव राऊत वरोरकर
आद्यसोपाक्ष आयुर्वेदाचार्य  धन्वंतरी थोर
कवडेक रोगग्रस्त केले रोगमुक्त तंदुरुस्त
अडवणूक नय केली कवा उभ्या हयातीत

बारक्या सारक्या आजारानं त्रस्त गावकरी
रघुनाथ डाँक्टर बुलावा येता हजर सत्वरी
सफेद धोतर काळा कोट गांधी टोपी माथी
उस्सागोरा साठीपार वैद्य येवून देई बस्ती

सब्बन रोगाह मूळ देखता कोठा साफ नय
एनिमा देवून आधी रघुवैद्यजी करी उपाय
मलावरोध हटता ऋग्ण खाडकन बरा होई
रघुनाथ वैद्यराजाहं जकलं गाव हाय उतराई

....पी. हेमंत राम  कवीवर.8108419392

Thursday, 16 August 2018

अटल योद्धा

अटल योद्धा
अटलबिहारी वाजपेयी महान
  टक्करून कारगील युद्ध  गहन
लक्ष्य एक माझा भारत महान
  बिकट स्थितीत विकास घडवीन
हार जीत दैवजात जरि भारता
  रिंगण ना सोडिले तरि तत्वता
वानिले वा कुणी निंदिले असता
  जय विजय पचविले सर्वज्ञ नेता
पेरियले शांतीचे बीज हयातीत
  यीये करावया सुराज्य भारतात
थोर संसदपटू उभय सभागृहात
   रयतेच्या सदैव वसेल हृदयात

....हेमंत राम पाटील.१६/८/१८.

Tuesday, 14 August 2018

तिरंगा

" तिरंगा "
       

या देशाही शान आणि आन तिरंगा
आमा भारतवासीयांसा प्राण तिरंगा  ।।धृ।।

जयहिंद नारा आमसा,हाती तिरंगा
सब्बन भारतीय गाती जयगीत तिरंगा
निळ्या आभाळी फडके अभिमान तिरंगा
या देशाही शान आणि आन तिरंगा ll१ ll

क्रांतीकारक कुर्बान ,घेऊन तिरंगा
वीरजवान शहीद जाले मिरवत तिरंगा
सदैव फडकत राहो विजयी विश्व तिरंगा
या देशाही शान आणि आन तिरंगा  ll२ ll

स्वातंत्र्याहे प्रतीक आमसा मान तिरंगा
अखंड एकताहे विजयगीत  तिरंगा
कोटी कोटी जनांसा प्राण हाय तिरंगा
या देशाही शान आणि आन तिरंगा ll३ ll

हुतात्म्यांसी प्रेरणा सदोदित तिरंगा
ताकद आमसी हाय बुलंदी तिरंगा
स्वातंत्र्यलढाई जिंकून विजयी तिरंगा
या देशाही शान आणि आन तिरंगा ll ४ ll

करतो आमी प्रणाम हा अमर तिरंगा
लाल किल्ल्यार डोलतो डौलाने तिरंगा
यो देश माया महान,महान तिरंगा
या देशाही शान आणि आन तिरंगा ll ५ ll

क्रांतीया ज्वालामय अग्निपथ तिरंगा
या भारत मातेही रक्षक ढाल तिरंगा
दैववशात लाभले  प्रभू वरदान तिरंगा
या देशाही शान आणि आन तिरंगा ll ६ ll

......पी. हेमंतराम  कवीवर.15/08/2018.

लाडू घातला खावयाला

लाडू घातला खावयाला

बालपणी गरीबी होती पाचविला पुजलेली
चिंचणी बाजारपेठी जावेलागे पावलोपावली
मिलोजवारी झोळी पाठीला घरी परतत होतो
ब्राम्हणआळी जवळ तरूतळी विसावत होतो

अचानक आपुलकीची हाक आली कानावर
अरे केसरी रस्त्यावर उभा का?ये ओटीवर
हाकेच्या दिशेने पाहिले अन चकीत झालो
गुरूवर्य बेहरे सामोरे पाहून भानावर आलो

गौरवर्णी सात्विक केशव बेहरे मुख्याध्यापक
बसविले मला हाताला धरून देऊन बैठक
फायनलच्या वर्षाला असताना ते रूजू झाले
एक वर्षाच्या कारकिर्दीत विद्यार्थीप्रिय झाले

उपाशी तापाशी चिंचणी-वरोर वारी अनवाणी
पाझरले गुरूजी दिला लाडू पाजूनिया पाणी
गावढळ हरीने गाडीतबसाया जागा नच दिली
दयाधर्म शिकवणूक गुरूने बालमनी कोरली

...कवी- हेमंत राम पाटील.8108419392.

Wednesday, 8 August 2018

चायनीज हातगाडी

चायनीज हातगाडी

या चायनीज फूड हातगाड्या चालती खूप
विकती मृत कोंबडीसागुती चिकनफ्राय सूप

रेडीमेड जंकफूड लाँलीपाँप लाललाल माल
चायनीज भरला बाजार काय बा तुम्ही खाल

मेल्या कोंबड्या करिल जो ताव मारून फस्त
चायनीज गाडीवान देईन दोस्त समजून स्वस्त

ज्या मड्डमांना घरच्या जेवणाचा नाही संस्कार
त्या माँमही चायनीजचा घेती खरपूस समाचार

रोगट मुर्दाड मृत सडके चिकन जयांना प्यार
शाकाहारी जीवन प्रणाली तयां काय कळणार

आईच्या गर्भातून उमगला चायनीज यम्मी आहार
उपदेशणे तयांना म्हणजे पाणी पालथ्या घड्यावर

...कवी- हेमंत राम पाटील. दहिसर मुंबई.
           8108419392.

Tuesday, 7 August 2018

स्टंटबाजी

स्टंटबाजी

अरे बाईकरोमिओ काररोमिओ ट्रेनरोमिओजी
तुमची स्टंटबाजी वाढवते पालकांची काळजी

दगडियांनो तुम्ही जरा विचार करा बाकी लोका
तुमचा होतो खेळ पण इतरांस जीवाला धोका

अरे व्रात्य मर्कटांनो थांबवा तुमच्या मर्कटलीला
व्हावया नको की स्टंटबाज मेले काळ सोकावला

स्टंटबाजी हा धनिक लाडल्यांचा बापकमाई माज
कोळून प्यालेत सगळी लज्जा अट्टल नशेबाज

दिसता क्षणी हाण दंडुका कोठडीत टाक रक्षका
देवू नका या स्टंटबाजांना यापुढती फाजील मोका

  कवी- हेमंत  राम  पाटील.8108419392.

Thursday, 2 August 2018

भाकरीचा चंद्र

"कविता आँफ द डे "
३/८/२०१८

      भाकरीचा चंद्र

भाकरीचा चंद्र भूवरीचा लाभावा सर्वांपोटी
विठ्ठलाचे गोड नाम यावे ओठी भरल्यापोटी

भाकरीस्तव चाकरी बहुजना हवी सरकारी
कलह त्यासाठी चालला आहे हमरस्त्यावरी

भाकरीचा चंद्र गवसला की भूक यांची वाढे
सात पीढ्यां सौख्यासाठी धाव ब्रम्हांडाकडे

भाकरीचा चंद्र मिळता होते नकोशी भाकरी
पिझ्झा बर्गर चायनीज बिर्याणीवर ताव मारी

पूर्वजांनी लक्ष्मीपुत्रा धनदौलत साठा ठेविला
भाकरीचा चंद्र त्यांनी निर्धनांसि दुर्मीळ केला

घरची कांदाभाकर मिळण्या भाग्यशाली हवा
बाजारू खाणार्यांनो तुम्ही घ्या वैदूराजांचा दवा

शंभरीच्या आत बहुदा स्मशानघाटी तीर्थयात्रा
पाचशे वर्षासाठीची कमाई खाणार का कुत्रा

भाकरीचा चंद्र जर हरेक जनमाणसा लाभावा
गरजेपेक्षा जास्त साठा कायद्याने जप्त व्हावा

   कवी- हेमंत  राम  पाटील. मुंबई-400068.
    8108419392.

Wednesday, 1 August 2018

हरवलेले प्रेम

कविता आँफ द डे
१/०८/२०१८

              हरवलेले प्रेम

हरवलेले प्रेम शेक्सपिअरला
सात जन्मातही ना गवसले
ब्लँकलेडीने केसाने गळा कापला
अद्यापि घाव ना ते बुजले

हरवलेले प्रेम कोणी शोधिती नशेत
मद्यपेल्यांत डुंबूनी अहोरात्र
वेडेही झाले कुणी प्रेमाच्या विरहात
प्रेम नाही गवसले हरले मात्र

कुणी भडिमार करी प्रेमचारोळ्यांचा
शिरा तयांचा बेचव झाला तरिही
खेळ फसवा अडीच अक्षरु प्रेमाचा
औषधाला नुरले प्रेम अंती जराही

प्रेमरोगी पछाडले प्रेमरोगाने जर्जर
नाही दिलासा वा कसली आशा
प्रेमरोगा नाही वैद्यकी जालीम उपचार
प्रेमवेडयाची पाहवेना दुर्दशा

  कवी- हेमंत राम पाटील. दहिसर-मुंबई
         8108419392.

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य   (स्पर्धेसाठी कविता )

पंधरा आँगष्ट एकोणीसशे सत्तेचाळीस
हिंदूस्थान माझा झाला स्वतंत्र भारत देश
घटनाकारांनी दिल्या दुर्बला सवलतींस
दुर्बल व्हावे सबल दश वर्षात हा उद्देश

दहा वीस तीस वाढता वाढली वर्ष सत्तर
जातीआधारीत आरक्षण झाले बलवत्तर
जो तो झाला मागासला होण्यास तय्यार
खायला बकासूर आणि भुईला अधिभार

द्यावे कोणा कोठून आणि कसे आरक्षण
पाहून उद्रेक नाहिर्यांचा शासनकर्ते हैराण
बौद्धिक पात्रता ठरतोय मुद्दा आता गौण
जातीवंत व्हा मिळवा नोकरी नि शिक्षण

स्वतंत्रते भारती हेच का ध्येय तुझे होते
गुणवंत गाठी विदेश काय त्यांचे चुकते
आरक्षणे सबल झाले हक्क सोडी ना ते
उद्या घडेल क्रांती होईल होत्याचे नव्हते

...कवी- हेमंत  राम  पाटील
     दहिसर-मुंबई.8108419392.

फटका

फटका

नंदनवन नहेन घर इवलाले नरक तरि करू नये
वेळीअवेळी मुखी तमाखू कँन्सरग्रस्त होऊ नये
वडीलजन हयात तोवर वाटणी घ्यावी सन्मानानं
वाटणीआलेल हेत उदमाळ्या पिकवावं  जिद्दीनं

निवृत्ता भू भाग्यविधाता मातीत हात घाल जरा
आजविरिही अळंटळं टाळून कष्टाला पुढती सरा
जो पोते कष्टला तोस नर भला नारी भी हंगतीला
पोशिंदा नय कुणी कुणाहा चिरहयात जल्माला

टांगा उलाल घोडे फरार तरिही ना शहाणपण
आयते तुकडे मोडणं वंगाळ बरं नोहे गंडवण
ढोसून वारूणी करी बतावणी तोतया सदाशीव
पोटाहाटी भोपळा नय गाठी धूर्त शून्य बाजीराव

.....पी. हेमंत राम .8108419392.