Tuesday, 31 July 2018

फूलराणी

कविता आँफ द डे
स्पर्धेसाठी
३०-०७-२०१८

            फुलराणी

फुलराणी तुज अलग करोनी कुणी माळीती गजरा
तुला मिळविण्या ज्यांच्या त्यांच्या तुझ्यावरी नजरा

कुणी देव देवता सिद्धिसाठी तुला वाहती मुरळी
कुणी दुर्जन भोंदू बापू कुसकरून टाकितो कळी

फुलराणी तू जरि तरिही बाजारी झाली विकावू
कुणी माथ्यावर कुणी कोटावर लागलेकी मिरवू

कळ्या उमलत्या खुडून पुजिती निजगृहदेवता
कुणी कलेवरा हार वाहूनी फुलराणी धिक्कारता

फुलराणी तू फुलसुंदर केवळ फुलझाड वल्लरी
परंतु टपले तुला हुंगण्या केवडेभक्त सर्प अरि

.......कवी. हेमंतराम  पाटील. दहिसर मुंबई.
        8108419392.

हिरवा डोंगर

कविता आँफ द डे

३१-७ -१८

                हिरवा डोंगर

हिरवा डोंगर माथेरान आहे माझा निसर्ग देव
जपली आहे हिरवाई प्रदूषणमुक्त दैवी ठेव

वाट आहे नागमोडी वळणाची चढ-उताराची
वृक्षवल्लरींनी सजलेली मनोहारी राजमाची

माथ्यावर घनदाट झाडी नाव साजेसे माथेरान
हवापालटासाठी वसविता झाला गोरा मिल्टन

धनिक पारसीइराणी उभारल्या टुमदार हवेल्या
स्थानिक ठाकरांनी रानमेवा भाज्या पिकविल्या

वाहनांना पूर्णबंदी धूरविरहीत निसर्ग जोजवला
अश्व-सवारी पायी भ्रमंती प्रवासी तांडा चालला

वनवासी रमे वानरटोळी दावू नका नाना कळा
डोंगरकड्यावर घोडदौड रपेट जीवास सांभाळा

सनराइझ सनसेट वनट्री हनिमुन वा मंकी पाँइंट
कितीक ऐसे नामांकीत पाँइंट भीड मुशाफीर थेट

वनराणी मुशाफिरी बहु मजेशीर नेरळ ते माथेरान
डोंगरदेवा हिरवाळीचे दिधले माथेरानी चिरवरदान

   कवी-  हेमंत राम पाटील. दहिसर मुंबई.
           8108419392.

Monday, 30 July 2018

आरक्षण

आरक्षण

" ईश कर रक्षण" मायला दे आरक्षण
गेला घरधनी परलोकी गाठून स्मशाण
पोटस्या पोरांसी वाटणीवरून भांडण
सांभाळाया तय्यार नाही सपूत कोण

मायभुमीत सरकार देते जात-आरक्षण
माय जाहली वृद्धा तिला नाही संरक्षण
ए ईशा तू संकटी करतो अवतार धारण
दे समस्त निर्धना वृद्धा अबला आरक्षण

आरक्षणापायी जन कवटाळती  मरण
किती एक बसले दरबारी देऊन धरणं
मनू नामक माणसान निर्मिले चतुर्वर्ण
शुद्र वैश्य क्षत्रिय आणि वरिष्ठ ब्राम्हण

प्रत्येकी पंचवीस टक्के गृहित आरक्षण
परि भागाकाराचे गणित सुटाया कठीण
संभवामि युगे युगे वदला पार्थास कृष्ण
घे अवतार दे आरक्षण सर्वां उदरभरण

......पी. हेमंतराम कविवर.
   8108419392.

Wednesday, 25 July 2018

उपमा

उपमा
प्रेमाला उपमा नय प्रेमा खंतावली
उपम्याला रवा नय उत्प्रेक्षा रूहली
रव्याला  गहू नय रूपकं कोपलीं
गव्हाला पाणी नय हेती करपली
पाण्याला पंप नय बाव गेली खाली
पंपाला पैका नय लक्षुमी आटली
पैशाला नोकरी नय डिग्री उणावली
डिग्रिला कालेज नय विद्या खुंटली
विद्येवीण प्रेमिकांसी डोस्की फिरली
जकली उपमा पातेली स्वाहा केली
बिसारी प्रेमा बिनाउपमा उपासी रेली
प्रेमाला उपमा नय प्रेम हे सदाफुली

---.हेमंतराम  कविवर.8108419392

Tuesday, 24 July 2018

बोलघेवडे

बोलघेवडे
बोलबच्चन बोलघेवडे जगती जीणं परधार्जीणं
आयजीया जीवावर बायजी उधार ऐसे धोरण

ठगवून लोका जगतो बोका साधूनिया मोका
बांडगुळ हा बोलघेवडा फळझाडांसी धोका

झाड जोपासून वाढविती पालक बनून माळी
फळे मधूर खावयास आयतोबा हालवी डाळी

वाकमोहिनी घालून खाती कंधीपेढे बोलघेवडे
दोन वडे हकाळहांसे भगून वदती त्यां बेवडे

उद्योग फक्त गोलगप्पा पानतमाखू ठेल्यावर
शिष्टाईपुढती यांस्या नामोहरम होती उपवर

बारीत माह्या कुंडीत पनपनला रानटीघेवडा
कुंडीतले सत्व घेत केला कमजोर चीकूमाडा

कुणाया खांदी ओझे कुणाहे वाहे हेलकरी
विठ्ठल विठ्ठल जपता हरि हाके रथ संसारी

......हेमंतराम  कविवर.8108419392.

दुप्पट खाशी

* दुप्पट खाशी*

माणकू बाय माणकू बाय आषाढी  हाय
कडक उपास हांगते एकादशी धरलाय

खादाड माणकू भलतीच खादाड बाय
दिहीभर खा खा खाणं बो बो हादडलय

हकाळी उठली आणि धाप तिला लागली
  हांगते गोळी घेव्याला फुरसद नय भेटली

कायतरी खाऊन माणकूबाय गोळी घेते
बाजारासन आणलेली पिकीकेळी खाते

गोड सफरचंद माणक्याभाऊनं आणले
उपासा नावाखाली तिने तीन-शार खाल्ले

फळं बीळ खाऊन पोट काय भरल नाय
हाबूदाणा वडा खावून एकादशी करतेय

उपास उपास घोकंपट्टी भूक काय मिटेना
येताजाता मुखी फराळीचिवडा नि रसपाना

राजगिरा थालीपीठ धाडले अन्नपूर्णाबायनं
दोनतीन थालीपीठ फस्त केली माणकूबायनं

कवडक हादाडते बोले थोडेस लागते मला
दिहीभर उपास करून थकवा आलाय मला

जेवणाही सर बिलकुल   येत नय फराळाला
उपासहांगता माणकूबायसा बो पोटोबा जाला

विठ्ठला विठ्ठला माणकूबायनं  धरली एकादशी?
प्रसादाया फराळ मोपअति किती दुप्पट खाशी

....हेमंतराम  कविवर.8108419392.

Sunday, 22 July 2018

फाँरवर्डेड रतीब

फाँरवरडेड रतीब

दादूभाय फारवरडेड लोक मोप दिहतात
उहने राजरोस टपाले घणेस फा़रवर्डतात
आला संदेश तहास कटृयार टोलवतात
जहकाय झुरळ कपड्यावरस झटकतात

टोलवाटोलवी काय डोंबलं संस्कार घडवी
रोजरोज डिलेट मारून बोटं मातुर दुखवी
एक वाडवळ कटृटा काय तो जिताजागता
बाकी दिहोदिही पाठवतात आयता खलिता

आयजी जिवावर बायजी उदार तही गत
रात गयी बात गयी तेस ते घडतेय परत
जकल्यात भयंकर हाय विडिओ क्लिप
मोबाईलसी मेमरी खाऊन टाकी गपसूप

अंती काय शेठशी हिकवण झाप्यापावत
अन झोटींगाही वरात दगडी कोटापावत
तुमी फार वरडत रेवा रोज रतीब लावा
पण तो रतीब अमूलसा नको घरसा हवा

.....हेराम कविवर.810841 9392.

Saturday, 21 July 2018

सावधान गड्या

सावधान गड्या

अँटिबायोटीकने सरबाटल्या कोंबड्या
खाऊन भलत्यास टरारल्या तुंबड्या
जकला नकली बाजार सावधान गड्या
प्राशून सोमरस बेभान होती खोपड्या

तांबारले डोळे हुजलेला पेताडथोबडा
झोकून ओकतो गरळ बरळतो बेवडा
जाला भिकारसोट घर केलयं मारोडा
कारभारिणीवर डाफरून करतो राडा

अरे वेड्या ही पेवटी जिवाला घातक
बायकापोरा हाल करून घडते पातक
हग्याहोयर्यांना ठरतेय सोबत जाचक
होड व्यसन बळी पडू नकोस नाहक

बेगडी बाजार सारा भुलतोस कशाला
जो तो टपलायं खपविण्या चालू माला
तरि त्याग बुधा तू फसवा एकच प्याला
कदापि पीऊ नको ना पाजू  कुणाला.

......हेराम कविवर.8108419392.

गगनपूल

गगनपूल

महाप्रतापी एमआरडीसी स्कायवाँक बांदीले 
ठायी ठायी काय हालत त्यांनास ठावं जकले

दयसर पूरबपश्चिम जोड गगनपूल ऊबारला
सातवहरात साफ मातेरे साक्षी मजनू-लैला

पश्चिमेला बुरी हालत जयतय स्काय वाकलं
पत्रा निखळून परजून वाटसरू जखमी जालं

साल लोटलं दुरूस्ती नाय दे माय धरणी ठाय
गर्दुल्ले बेवडे भिकारी लवबर्ड यांसआश्रालय

दुर्घटना हांगून येईना संबंधित अधिकारी काका
अघटीत घडण्याआधी स्कायवाँक पाडून टाका

....पी. हेमंतराम कविवर.8108419392.

नको शीष्टपण घाण

नको शीष्टपण घाण

मी वोळखून हाय दांभिक शीस्टांसे बहाणे
त्यांसे बोलणे सालणे अन बो घमेंडी वागणे
देखल्या देवा दंडवत तहास तुमा रामराम
बाकी चंबूसम तोंडे बंद ठेवा घालून लगाम

सादे शिष्टासार उपेक्षित गुंडाळूनि बासनात
खोटा मुखडा धारूनिया वावरती जगतात
काय बाता मारिती गोर्यांसा जपी प्रोटोकाँल
या गोर्या गिधाडांनी लुटला हिंदूस्तानी माल

तुमसा खोटेपणाया काळा बुरखा हटवा जरा
मंग दुनियेला दिहेल प्लास्टीक सर्जरीचेहरा
रंग वरलिया गोरा आतून काळे मनोव्यापार
कोण ठोठावील बरे ऐसे तुमा शीस्टांसे द्वार

शीष्टांसी उठबस पावता दिहे माहणू शीस्तीसा
भोट्याघरसी पायरी उस्सी पोकळ जरि वासा
बड्याघरसा बेटा सवाई उडवितो रे बापकमाई
ऐसे शीष्टपण घाण देवू नको वर बाप-रखूमाई

......पी. हेमंतराम कविवर.8108419392.

Friday, 20 July 2018

गाळी

गाळी

गाळीनं कोणसी तोंडं जाली का काळी
अह कवा घडलं नय कोणत्यास काळी
गाळी फुलास्या माळी कुणास्या भाळी
जवाया विगवी कासू बायजी रावताळी

जवाय दे गाळी हावूहहर्यां रोज हकाळी
मिळे स्वर्ग अही वदंता ऐकलायं भूतळी
दुबळं पोरं अन्याय होता देत हुटतं गाळी
अस्त्र रामबाण देखून थरथरतो बाहुबळी

जही जेवणाही लज्जत मीठ वाढवी बाळी
तह वाढवी बायबोली सौंदर्य गाळी-टवाळी
गाळीविना सण अळणी गिरिजनांही होळी
गाळी वगळता निकामी रिक्त जेष्ठांची झोळी

.....हेराम कविवर.8108419392.

संतसंग

संत-संग

संत आसाराम  l ध्यानी मनी काम l
लोकां झाला भ्रम l साधुत्वाचा ll

बापू म्हणविती l ऊभारून मठ l
बादशाही थाट l हरिओम ll

गुंडपुंड झाले l रामरहीम बो l
तयाहून रोबो l श्रेष्ठ जगि ll

राधेमाँ संतीण l चारित्र्याची वाण l
विषयाची खाण l लांछनकी ll

कोणी जगत्गुरू l म्हणवी स्वतःला l
मोप भ्रष्टाचार l करोनिया ll

शोधावा तो कैसा l संत शिरोमणी l
दश नागफणी l दंश करी ll

तुम्ही करा वारी l भोळा भक्तीभाव l
चोर झाले साव l वाममार्गे ll

प्रश्न पडे आम्हा l एवढे का रामा l
हिंदुस्तान धामा l भोटमामा ll

वा!गोरखधंदा l देवा मांडियेला l
नावारूपा आला l ठकसेन ll

हेरा म्हणे  जना l ऐसा संतसंग l
नको पांडुरंग l लाभो मज ll

कविवर हेमंतराम पाटील.
8108419392.

Thursday, 19 July 2018

वाडवळी अभंग

वाडवळी अभंग

आमी वाडवळ l  पिकविले मळे l
दिली  कंदमुळे l बहुजना ll

सरावण येता l स्वयंपाक मोळा l
सात्विक भोळा l समाधानी ll

दोन गुंठे वाडा l घरा पाठीमागे l
भाजी भेंडे वांगे l लागवड ll

रमाई वाड्यात l पावसाळी भाज्या l
घण्याघण्या ताज्या l स्वस्तमस्त ll

बावी भोवताली l आळवाचा खाडा l
हिपण्यानं माडा l तरारला ll

काकडीच्या वेला l लागल्या काकड्या l
जरि त्या वाकड्या l चवदार ll

भाटात पेरला l पावटा उळीद l
समद्यांना खाद l तोंडीलावा ll

वय उंबर्याला l केळी नि पपया l
पक्वफळ खाया l सुमधूर ll

आंब्या ओहतारी l उगवले धेणे l
ईश्वराहे देणे l हेरा म्हणे ll

.....हेमंतराम  कविवर.
8108419392.

Wednesday, 18 July 2018

बारा मास

बारा मास

सैत उबारतो  कापडघडीया गुढ्या
वैशाख  ओढतोया वर्हाडी गाड्या

जेठ पेरतो भात वसुंधरेया हेतात
आखाड करतो आवणी दिनरात

सरावण लोळे मजेत कुरणावरती
भादवा गातो जय गणेश आरती

आश्विन कापतोभात सालवून पात
कार्तिक हजतो दिवाळीया जामात

महगीर पेटवी शेकोटी कुडकुडत
पौष घाली लोकरी स्वेटर आंगात

माघ काढीमुहुर्त करी दोनाये चार
फाल्गुन खेळतो होळी धरून फेर

......हेराम  कवीवर.8108419392.

Tuesday, 17 July 2018

आला आखाड

आला आखाड

आला आखाड तरफळलेले घड ताडा
तरफळं धुंडावया माडरानी स्वैर हिंडा
वरोरी भटकंती केसराळी अन मोरडा
तरफळगर कणिक मळून तळा वडा

आला आखाड वार्यापावसात आवणी
हात साले वेगात धन्यांसंगे कारभारणी
ईरलं घोंगड्या लेवून शेत गाते लावणी
धोंडीधोंडी पाणी दे होऊदे आबादाणी

आला आखाड राम बाप नांगरी शिवार
आडवाटेन रमाई येई दोपहरी हेतावर
अन्नपूर्णा ती वाही जड शिदोरी डोईवर
कामकरी परिवार जेवी जेवण बांधावर

आला आखाड चारापाणी बो येई भरास
गुरढोरं खिल्लारां खंसारी मुबलक घास
सरावण भादवा सरता येई आश्विन मास
बळीराज खुश पाहून शिवारी धान्यरास

......हेमंतराम कविवर.8108419392.

Sunday, 15 July 2018

द्विभार्या मालिका

द्विभार्या मालिका

हरेक मराठी पावता मालिका
हिरोला लागतात दोन बायका

स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नका
प्रेमस्या वाट्याला राधा नि दिपिका

माझ्या नवर्याची बायको मालिका
गुरूच्या साथीला शेणाया राधिका

घाटग्यायी सून अमृता नूर रडका
अक्षय कियाराहा लय लय लाडका

लक्ष्मी  सदा मंगलम दोन नायिका
मल्हार खुश आर्वि लच्छीवर बोका

रेशिओ हजारी घोवांना नवशे बायका
मंग हरेक दादल्याला दोन लाभतील का?

........हेराम  कविवर.8108419392.

महादानी

महादानी

माधवाने आज्ञापिले एक कार्य पार्थाला
यो सोन्यासा डोंगर दान दे पूर्ण गावाला
कुदळफावडे घेऊन निगाला अर्जून डोंगराशी
वर्दी दिली गावाला यावे त्वरित सुवर्णदानाशी

मंग अर्जून डोंगर फोडून देई दान हरेकाला
तरिपण डोंगर रेला तहास होन्यानं मढलेला
खाणकाम करून पार्थ बो पीडला थकला
तवा अंती हरिला शरणयेवून हांगता जाला

अरे कृष्णा कर्म करून भागलो डोंगर का हटेना
हरि त्यासी वदे जेणु काम तेणुच थाय अर्जूना
मंग तोस कार्यभार कृष्णाने कर्णावर सोपवला
कर्ण इप्सित जागी येऊन पायथ्याशी उभा ठेला

जमलेल्या गावकर्यांना राधेय आदरे बोलिला
गाववाल्यांनो यो जकला डोंगर दान तुमा केला
अवड हांगून राधासूत तेथून क्षणात निगून गेला
पार्थ दाता नटवा तुळता तुळे न दानी कर्णाला

......हेमंतराम कविवर 8108419392.

Friday, 13 July 2018

सत्यवादी

सत्यवादी

सत्यवादी  ना घाबरे समाजकंटका भरे कापरे
तुम्ही पीटा विकास डांगोरे वाजवा ढोल नगारे
दुरून डोंगर साजरे आतून उंदीर मामा पोखरे
नशिब जनांचे भलेबुरे सोशित साहती बिचारे

विकासक उभारी घरे गरजू पणाला लावी सारे
स्वप्न घराचे राही अधुरे डोळे तयाचे थिजलेरे
नळी फुंकली सोनारे इकडूनतिकडे गेले वारे
सांगा बरे नवपरिणित कसे नांदतील सौख्यभरे

भ्रष्टाचारअति फोफावला तयाचा धनी कोणरं
आरोप प्रत्यारोप एकमेकावर हेच आहे उत्तर
तुका सांगोनिया गेला ठेवा देवावरी सारा भार
देवराय आहे पंढरपुरी ठेवोनिया कर कटावर

.......हेमंतराम  कविवर. 8108419392.

वार्यापावसात बुडाले

सत्यवादी

सत्यवादी  ना घाबरे समाजकंटका भरे कापरे
तुम्ही पीटा विकास डांगोरे वाजवा ढोल नगारे
दुरून डोंगर साजरे आतून उंदीर मामा पोखरे
नशिब जनांचे भलेबुरे सोशित साहती बिचारे

विकासक उभारी घरे गरजू पणाला लावी सारे
स्वप्न घराचे राही अधुरे डोळे तयाचे थिजलेरे
नळी फुंकली सोनारे इकडूनतिकडे गेले वारे
सांगा बरे नवपरिणित कसे नांदतील सौख्यभरे

भ्रष्टाचारअति फोफावला तयाचा धनी कोणरं
आरोप प्रत्यारोप एकमेकावर हेच आहे उत्तर
तुका सांगोनिया गेला ठेवा देवावरी सारा भार
देवराय आहे पंढरपुरी ठेवोनिया कर कटावर

.......हेमंतराम  कविवर. 8108419392.

Thursday, 12 July 2018

जेष्ठ नागरिका

जेष्ठ नागरिका

शानशौकीने मस्त जगावं निवृत्त जेष्ठ नागरिका
पासष्टीत छप्पन गावी उगा भ्रमंती दौडू नका

पोर-सोर लई मतलबी भूलथापांना भूलू नका
स्वकमाई गंगाजळी समर्पूनी कंगाल होवू नका

बस झाली दुनियादारी उधारीपाधारी करू नका
जागाठागा खरेदी -विक्री भानगडीत पडू नका

जन स्वार्थाचे कीडे भोवती जपून पाऊल टाका
विठ्ठल हरी हृदयमंदीरी फुका पंढरी जावू नका

हिंदुस्तान देश महान विदेशगमनी मोठा धोका
दशपदी कल्याण श्लोक हे नाही मुळी फटका

......हेमंतराम कवीवर.8108419392.

Wednesday, 11 July 2018

वटपूजा

वटपूजा

ठुमकत मुरडत निंगाली पारू वडाया पारावर
योस नवरा पायजे तिला सातजल्मा मुरलीधर
पारू पाठोपाठ एकेक जमली धागाधारी नार
बांधला दोरा सात फेरे घेऊन वड पतीपरमेश्वर

पारावरस्या वडदेवा पावरं वाडवळ सावित्रिला
कर शतायुषी देवा तिया लाडक्या सत्यवानाला
ज्याकोणी धागा गुंडाळती वडा नेमाने दरवहरा
नक्कीस गवसत राहिल सुखसौख्य त्या संसारा

वरोरी शांतीबायस्या वाड्यात उभा बोठ्ठा वड
रामायं वरदान बायांनो गुंडाळा हुतीधागा जोड
वटपूजा वृक्षपूजा करा जकल्या बायाबापड्यांनो
झाडं लावा झाडं जगवा माया वाडवळबांदवानो

......पी. हेमंतराम कवीवर. वटपौर्णिमा २०१८.

अरे मवाल्या

अरे मवाल्या

या भारतात पोरीबाळी सुरक्षीत रेवूंदे मवाल्या
करू नको बलात्कार जुलूम जबरदस्ती मवाल्या
खंडणीवसूली खून दरोडे लूट थांबव मवाल्या
स्मगलींग चाचेगीरी बार अड्डे बंद कर मवाल्या

डोकरा होणार एक दिही तू विहरू नको मवाल्या
वयस्क माहण अबलांना उगा छळू नको मवाल्या
बिग बाँससा हुकमीएक्का गुंड का होशी मवाल्या
घाबर जरातरि त्याआकाशाया बाप्पाला मवाल्या

जयतय कब्जा करून बिल्डिंगी उभारतो मवाल्या
सोनापुरी साडेतीन हात कफन ही इस्टेट मवाल्या
येताना नागडाउघडा रिकामा आलास रे मवाल्या
जाताना तैसाच जाशील रिकाम्या हाती मवाल्या

महाजन गतः स पंथः अनुसर यापुढती मवाल्या
वाल्याया पापाया वाटेकरी कोणी नाय मवाल्या
लाख योनीपश्चात लाभला हा नरजल्म  मवाल्या
वाल्यासा वाल्मिक होण्या सुधार स्वतः मवाल्या

.......पी. हेमंतराम कवीवर.8108419392.

झाड होड

झाड होड

झाड होड झाड होड झाड होड वेताळा
कोळ्या भगत घुम घुम वार्यागत घुमत होता
कडुनिंब डहाळीनं भूतबाधित अजाणबाळा
झोड झोड सपासप एकहरका झोडत होता

कोळ्याही पोरं भुतभगावं गीत गावू लागले
देव तो फुकाया मांडला रे  देव फुकाया मांडला
एक पींडाये सात पींड जाले सात पींड जाले
कोंबड्याहा वाटा पोटभरू गोट्या धांगड्याला

भगत डोलू लागला वेताळाशी बोलू लागला
क्यावर येणं जाल वेताळा क्याहाटी येणं जाल
तुह्या अशिलानं चिंचझाड वेढून ताबा घेतला
चिंचेवर आक्रमण जालं भगून भुतानं झपाटल

कोळ्या भगतानं मांडवणी लय झँक केली
आरवते कोंबडे देवून झाडाया वेढा काढला
झाड होड जादूगीरी भगताही सफल जाहली
आरवता कोंबडा गेला भूतानं होडलं झाडाला

......पी. हेमंतराम  कवीवर.8108419392.

वरोरकर

🚩वरोरकर
गावाय नांव घेतल्यावर ज्यांसा ऊर अबिमानानं वर जातो ते वरोरकर.

सहा जातीहे लोक जय
गुण्या गोविंदानं नांदतात ते वरोरकर.

रामाया आमराईत हक्कान आंबे तोडून रामपुत्रांना तुमी कोण पुसणारे ते वरोरकर.

पंचक्रोषीत खड्या आवाजात वीरगान करणार्या शाहीराहा अभिमान बाळगतात ते वरोरकर.

बामणीभाषा न बोलीभाषा मेळ घालून बायबोली जपतात ते वरोरकर.

गावस्या हायस्कूलला दुहर्या गावस्या दात्याह नाव देव्याहा उदारपणा दावतात ते वरोरकर.

जास्त कोणसं कवतुक वा घणीस कोणसी निंदा नय करत ते वरोरकर.

दोन सुपूत्रांना आमदार घडवून देशकार्याहाटी न लोकहीतार्थ प्रेरित करतात ते वरोरकर.

.........पी. हेराम वरोरकर.🚩🙏🏾🙌🏽🤠

कर टवाळकी

कर टवाळ्या

बहल्या बहल्या कर टवाळ्या मार गोळ्या टवाळा
काकलक्ष बगळाध्यान कुतरझोप घे राख मळा

काय कोणसे भय क्याला टवाळी छंद टवाळबाळा
जह शस्त्र धनुर्धराला तह टवाळी अस्त्र वाडवळा

केली टवाळी कवनरूपे ती आली अजि मोपफळा
बायबोली वाडवळीया कटृयावर फोफावला मळा

करुया टवाळी दिवाळीअंक यत्न नय आला फळा
कविवराहं टवाळकाव्य पोस्टात जाले चोळामोळा

शीर सलामत  पगडी पचास ना फिकीर सर्वकाळा
काव्यपंढरीया वारकरी कविवर हेराम सांब भोळा

...........हेमंतराम  कविवर.8108419392

कथनकुटे

कथनकुटे

कथनकुटे कथन कुटणारं
लेखा तयांसी करू नको
निंदकाय घर हेजारी अहणार
भाव तयांना देवू नको

प्रसंगोत्पात पडसाद उमटणार
प्रतिसाद तयांना देवू नको
वानोत निंदोत टीकोजीवीर
उलटा वार बुधा करू नको

घडायचे ते विपरित घडून जाणार
आपुली सेहत बिघडवू नको
मातीया सुली अहतात घरोघर
उगाच डोस्क्याला ताप देवू नको

.....हेराम कवीवर.8108419392

वरोरी बालपण

वरोरी बालपण

वाह रे वा काय सुगीये दिही होते वरोरी बालपणी
अभ्यासपठण काबाडकष्ट हींव ऊन पाऊसपाणी
वीजपारवे दिवे दुर्लभ घासलेटभरले होते कंदील
आठ सदस्य परिवार दुःखदारिद्रय  सुखात नांदलं

घर चौमोळी कुडाया भींती वरती कौलारू छप्पर
हारवलेलाओटा बाजूला पडवीत पाळीव गुरंढोरं
हेजारीपोरं मस्त खेळत तवा अस्मादिक हेतावरी
काळा-ढवळा सावळा-तांबडा बैल होते खंसारी

कुडात लपलेले ढेकूण कवडेक रगत शोषिती
माळावर उंदीरटोळी दिहीरात खुडबुड करती
डासोबा अंधारात एकसाथ हल्लाबोल करती
मुंगे डेंगळेही घरावर हक्कवजा करती वस्ती

ऐसे होत घर सकलां आधार देत चराचराला
वंचित अर्थधनाला गरिबी पुजली पाचविला
माणुसकी आपुलकी अमोल दौलत गाठीला
आता जकल अहूनही समाधान नय जीवाला

.......हेमंतराम  कवीवर. 8108419392.