Friday, 27 September 2019

लगीनगीत

लगीनगीत

सला सला सला लगीनाला सला
साळकाया माळकाया लगीनाला सला

वाडवळ माळी नवरा महान
माळीण बाय शोभे नवरी छान
नाचूया गाऊया हरपून भान
गानूबाय घेई तानेवर तान
नवरा बोहल्यावर खोळंबला
मामार्यांनो आणा नवरीला ll सला सला...

वर्हाडी जमले पाटील राऊत
पुरव -चौधरी  म्हात्रे -ठाकूर
लगीनमंडपी बाया-बाप्यांसा
पोरापोरींसा कल्लोळ फार
लग्नगीतं धन बायबोलीला
जावू सला धमाल पहायला ll सला सला....

झडे चौघडा वाजे बेंडबाजा
वाजे ढोलक वाजे सनई
सुरावटीया नादावरती
पायी थिरकली बो तरूणाई
अंतःपटाया अडसर सरला
नवरी मिळे ही नवर्याला ll सला सला.....

  कविवर  हेमंतराम पाटील - दहिसर-मुंबई.

कटृयाहा पाळणा

कटृयाहा पाळणा
कट्टा जो जो रे मनमोहना । सुखवी वाडवळांना ।

रंजन करी सब्बना । पेरून शब्दधना॥धृ॥

पाळणा लांबविला नरपडासी । वाडवळांसे वंशी ।

बायबोलीह्या कुशी । उल्लास जकल्यांसी॥१॥

वाडवळी पालखी  । कवडेक अनोळखी l

दाविती भाषिक कुरखी ! मंडळी नवखी !!२!!

हालवी परवीणा सुंदरी । धरुनी कट्टादोरी ।

वाडवळी वाजे पिपेरी । जयू जयजयकारी ॥३॥

कट्टाव्यापकां  कवीराया । काव्य करी रमवाया  ।

विडंबन करुनिया । जागर वाडवळीबोलीया ॥४॥

येऊनि कटृयावर सत्वर । देती प्रत्युत्तर ।

सबासद भगिनी बंधूवर। कवतुकती अपार ॥५॥

कविवर भावभुकेला । कट्टाधीन जाला ।

झिजवून झरणीला। पाळणा रचियला ॥६॥

     कविवर पी. हेमंतराम वरोरकर.
8108419392.

वाडवळी अभंग

वाडवळी अभंग

आमी वाडवळ l  पिकविले मळे l
दिली  कंदमुळे l बहुजना ll

सरावण येता l स्वयंपाक मोळा l
सात्विक भोळा l समाधानी ll

दोन गुंठे वाडा l घरा पाठीमागे l
भाजी भेंडे वांगे l लागवड ll

रमाई वाड्यात l पावसाळी भाज्या l
घण्याघण्या ताज्या l स्वस्तमस्त ll

बावी भोवताली l आळवाचा खाडा l
हिपण्यानं माडा l तरारला ll

काकडीच्या वेला l लागल्या काकड्या l
जरि त्या वाकड्या l चवदार ll

भाटात पेरला l पावटा उळीद l
समद्यांना खाद l तोंडीलावा ll

वय उंबर्याला l केळी नि पपया l
पक्वफळ खाया l सुमधूर ll

आंब्या ओहतारी l उगवले धेणे l
ईश्वराहे देणे l हेरा म्हणे ll

.....पी.हेमंतराम  कविवर. दहिसर-मुंबई.

8108419392.

मा. तरंगदा, आगामी वाडवळी बुकाहाटी
वाडवळी अभंग देत आहे.कृ. नोंद व्हावी.

गे माय वाडवळी

🔤गे माय वाडवळी ....

गे माय वाडवळी तुह्ये कहे होवू उतराई
माही झरणी पाझरून तुहेस कवन गाई....||धृ||

बायबोलीहा डोलारा माही लेखणी पेलेल
तुह्या शब्दरूप आभाळा गवसणी  घालेल
बायबोली तोरण बांधू येथं वाडवळ भाई
गे माय वाडवळी तुह्ये कहे होवू उतराई  !!१!!

फडकवू निशाण नभी दुमदूमवू दिशादाही
तोलेल धरणीला शेषशाही वाडवळी माही
वर्धेल वाडवळी उणावणार नाही शाई
गे माय वाडवळी तुह्ये कहे होवू उतराई !!२!!

ऊघडले माऊलीने मायबोलीहे भांडार
चार हारी चार दारी ज्ञानघागरी घरोघर
आयाबायांनो  घातली वाडवळी ज्ञानपोई
गे माय वाडवळी तुह्ये कहे होवू उतराई !!३!!

भरा शब्दजले कलश घागरी तमाणी
वदनी लेखणी दिहू दे वाडवळी वाणी
आजविरी उपेक्षित परि आता नवलाई
गे माय वाडवळी तुह्ये कहे होवू उतराई !!४!!

आख्ख्या जगात आपुली मिरवू वाडवळी
अवघे मायमराठी कुंकू विराजो तिहे भाळी
सातासमुद्रापल्याड नांदो वाडवळी विठाई
गे माय वाडवळी तुह्ये कहे होवू उतराई  !!५!!

     पी.हेमंतराम कविवर. दहिसर-मुंबई.
8108419392.

वाडवळी माही

----------- वाडवळी माही----------

टपोरी स्वप्नांही  । खाण कवितांही
डोकावून पाही । वाडवळी माही !! १ !!

निवडुंगी वाणी । काळजाही राणी
नवाजते घणी । वाडवळी माही !! २ !!

आला गेला कोणी । होय ज्ञानी झणी
ऐसी हिरकणी। वाडवळी माही !! ३ !!

होनं, सांदी, नाणी । कविवर गाणी
शाहिरांसी वाणी । वाडवळी माही!! ४ !!

बायबोली ग्रंथ । शब्द धनवंत
करूया रवंथ ।वाडवळी माही !! ५ !!

समुंदरी लाट । वळणायी वाट
नागमोडी घाट । वाडवळी माही!! ६ !!

आभिमान मज । महाराष्ट्री राज
गर्जेल कवन । वाडवळी माही !! ७ !!

पारिजात सडा । घड ताडा-माडा
बहरेल वाडा । वाडवळी माही !! ८ !!

हृदयी वसंत। मनात हेमंत
झरणी झरेल । वाडवळी माही !! ९ !!

-----  पी. हेमंतराम वरोरकर.
मुंबई. 8108419392

मेल्या खाजूर वाटी

मेल्या खाजूर वाटी.

जिंदेपणी खाऊ घातला नय
साधासुधा सिसकडी-भात.
‌पकवान्न मटण आराटतात
अकराव्या बाराव्यात
षण्मासिक वर्ष श्राद्धास
      कैक पंक्ती जेवू घालतात
कावकाव करुन पीतरमुक्तीहा
    भोट्टा बोभाटा करतात

कावळा पींडाला चोंच मारीना
जीते जींव यांसे चुळबुळ करतात
नरड्यात चार घास पडून तुंबडी
भरव्याहाटी कावळे कोकलतात
घोटभर गोडाया श्याहाटी
डोकरपणी तळमळवतात
मरणांती ग्राईप वाटर चखणा
कवतुकानं ओली पार्टी करतात

जित्तेपणी मथुरा-काशी
तीर्थ स्थान नय नशिबात
मयत जाल्या बरोबर बघा
अस्ति पोसल्या वाराणशीत
जनलोक म्हणती हायहाय
तेवढ्यापुरती महणात
जित्या दिली आठी हयातीत
मेल्या खजूर वाटतात

      पी. हेमंतराम कविवर. दहिसर-मुंबई.
8108419392.


———————————