Sunday, 12 March 2017

होळीगीत

होळीगीतं

मागेलीण मावली मागडी घणी
केलायं तिनं बोंबलाय पाणी
मावरकाटल वायलास खटला
हवलुबाय काय दावू निवेद तुला

भंडारीण बेणली पक्की बनेली
हूरीया बांडीत रिठ्याय पाणी घाली
हुरहूर लागुन जीव वेडापिसा जाला
हवलुबाय काय दावू निवेद तुला

वाडवळणी वाडी ऊजाड पडली
शिकून पोरं कामधंद्या शहरा गेली
पडवळ भोपळा काय नय भाजीपाला
हवलुबाय काय दावू निवेद तुला

गायगोठा गायम्हशीविण ओका जाला
गवळ्याहा दुधाया धंद्याहा वांदा जाला
उणीव जकलीस हात तिया मायला
हवलुबाय काय दावू निवेद तुला

.......हेमंतराम पाटील.

No comments:

Post a Comment