Friday, 17 March 2017

शिक्षणव्रती

अनुताई थोर शिक्षणव्रती

अनुताई वाघ शिक्षणव्रती वाघीण थोर
आडनावाहरकस धारिष्ट दावलं अनिवार
कोसबाड डहाणू इलाख्यात निसर्गसुंदर
परि ज्ञानापासून वंचित वारल्यांसी पोरं

एक गुराशी दुहरं पोराशी तिहरं वेठबिगार
अहा जकला ओथा विद्येया जयजयकार
ताराबाई मोडक गिजुभायस्या शिष्याहुन्नर
बालवाडी मेढ रोवली कोसबाड टेकडीवर

अनूताई वाघ जाल्या तारारुप पटशिष्यवर
अंगणवाडी गुडी उभारुन केला कार्यविस्तार
विद्यामाऊलीला सावली दाते जाले तरुवर
शिकू लागली वारली बाळं विद्या भरभर

सावित्रीकन्या अनुताई धन्य धन्य खरोखर
आदिवासी भागात केला शिक्षणप्रसार
नाव ऊज्वल कोसबाड अखिल जगभर
ताई अर्पितो तव स्मृतीस कवन हे कविवर.

............पी. हेमंतराम कविवर.

No comments:

Post a Comment