Thursday, 9 March 2017

डोंगरी हवेली माकुणसारी देवडोंगरी निसर्ग सुंदर टेकडीवर उभारले हे भुवन मनोहर संतोषाने वसवली ही वैशाली नगरी दिमाखात ही इंद्राची जणू अलकानगरी सफल जाहली सफाळ्यास ही स्वप्नपूर्ती हिरवाईने असे विनटली मंजुमय धरती आर्य-सार्थ कुशाग्र बाळे अण्णांचा आशिश देवाचे डोंगरी शांत बंगली नांदतो परमेश एक वीट श्रमाची एक वीट कष्टाची रचली एक वीट आई-बाबांच्या आशिर्वादे जोडली एक वीट भाऊ बहीणींच्या प्रेमाने भिजली सहकाराचा कळस चढवून सज्ज हवेली संतोषा कवतूक तुझे धन्य हवेली निधान लाभो गृहसौख्य तुम्हा प्रार्थी कविवर हेमन ..............हेमंतराम पाटील.

माय-बाप माय एकाकी एकाकी एकांतात आसू ढाळी वाटले नव्हते तिला पूत रडविल कोणेकाळी हवे ते ते त्याला दिले मोठा माणुस घडविले कदर याची नाही का धास्तावून मन गेले उर्मट ते त्याचे बोल चारचौघात अपमान काल जोडलेली नाती त्यांचे करी गुणगान माय करी जीवा रान लावी सर्वस्व पणाला लेकाच्या संसाराची नित्य वाहे काळजीला बाप निमुट ऐकतो हताश ऊदास अंतरात वादंग टाळाया हटकत नाही बाळा तात असा मुखदुर्बल बाप कणखर कणाहीन करावे काय मग त्या अभागी माऊलीनं परि विसर न पडावा बाप हा असतो बाप साहतो सारे म्हणोन समजू नका मख्खगप्प यावे भानावर मुला मायेशी नको करू कज्जा जर कोपेल तो बाप ठेविल ना मुलाहिजा ...........कविवर एच. आर.

No comments:

Post a Comment