Monday, 23 January 2017

बोलीभाषाकविकट्टा


कवड्या वहरान साहित्यसंमेलनी बोलीला बोलावली
बोलीभाषाकविकट्टा निर्मिती मंडळी करती जाली

वाडवळी बोलीभाषा असामान्य मान्यता पावली
कोणसी तरि पुण्याई नव्वदीसंमेलनी कामी आली

एकधागा समाईक  उभय संमेलनी वय हाय समान
नव्वदी गाठीत पार पडले सोपाक्ष वाडवळ अधिवेशन

पूर्वसूरी वाडवळ शीष्ट शिष्टाईत कमी पडले नहते जर
वाडवळी बायबोलीला व्यासपीठ मिळूनरेले अहते तर

गावात रेवून साठीपार शीष्ट वाडवळीला लावती वाटेला
तवा आताया पीढीला तरि ठपका देवुन अन्याय क्याला

वाडवळ कट्टा योस  काय तो बुडत्याला काडीया आधार
बायबोली वाडवळी जिवंत ठेव्याहाटी करा पक्का निर्धार

...............एच.आर. कविवर.

Friday, 20 January 2017

पैशायी नासाडी

धन्य तुमसा कुंभमेळा धन्य तुमसे शाहीस्नान
धन्यधन्य नागा साधू ठेवा लंगोटीय तरि भान

खेडोपाडी देशभर पाण्याहाटी व्याकुळले जन
चीन-बार्माये शुद्धजळ बैराग्याहे शाहीस्नान

कडुनिंबाही पान घाला शुद्ध होय उष्णोदक तमाण
क्यालारं बावांनो हगुनमुतुन नदी करता तुमी घाण

पापी जन पापे तुमसी गंगा मैली धवता-धवता
हेराम मंत्र सोपा जपता निगुन जाय मलिनता

बारावहराया कुंभमेळा हानि पोसवतो गोदाजळा
ब्रह्मगीरी कुशावर्त पावे प्रदूषण यासदेही यासडोळा

भोंदू साधू उघडुन डोळे पावा ढगा लागलय कळ
जटे तटे कटे कटे देशी पडे दारुण कोरडा दुष्काळ

सार्यापाण्यावीण गुरं-ढोरं खंगुन दुखणाईत जाली
हेतकर्या जीवाया बळापा होऊन खाई पेटुन रेली

साधू शाही स्नानानं अच्छे दिन येतील काय
जनतेया पैशायी नासाडी यापुढे खमेल काय?

..........हेमंत राम पाटील. दहिसर(प)
              मुंबई-400068
Mob-9757340310

स्त्रीभृण हत्याकांड

प्रसवतात अयला कोवार्या अबला आया
भृण बेवारसी त्यांसा वाली कोण नहे तया
घडतात पापं होतात फुकाया भृणहत्या
त्यातव घण्याखर्या होती स्त्री-भृणहत्या

         खानदानात अहवा वंशाया दिवा
           वंशवेल दिवटीला विषारी दवा
             ढुंगणावर लाथ कुलदिपक मारी
               तरि पोराहाटी अट्टाहास भारी

नाठाळांस्या माथी हमजुती कोत्या
भगुन होउन रेल्या स्त्री -भृणहत्या
भृण अजाण कोंडले गर्भकुशी
बो नरकयातना अभागी जीवाशी

          इस्पितळाहे भृण केरकसर्यात ठेले
          मोकाट कुत्र्यांहीन लसके तोडुन खाल्ले
           भुणभुण भृणाही जवा लागतेरे
           तपासयंत्रणा जागी होते तवारे

पाप मेनकेहे विश्वामित्र तो मोकळा
प्रसविले बाळा जर दाबतिल तिहा गळा
लफडेबाज घालिती जल्मास अर्भका
घण्या स्रीभृणाहत्या त्यातुन रे फुका

        प्रसवून धन्य धन्य शाही डाकबंगले
          भोग भोगुन दमले देव पूजेला लागले
          क्याला फुकाया देवी मखर आरत्या
           अहेन साड तर थांबवा स्त्रीभृणहत्या

...........हेमंतराम पाटील. बी-201 तावडेसंकुल
                    दहिसर (प) ,मुंबई-400068
‌             भ्रमणध्वनि-9757340310