कवड्या वहरान साहित्यसंमेलनी बोलीला बोलावली
बोलीभाषाकविकट्टा निर्मिती मंडळी करती जाली
वाडवळी बोलीभाषा असामान्य मान्यता पावली
कोणसी तरि पुण्याई नव्वदीसंमेलनी कामी आली
एकधागा समाईक उभय संमेलनी वय हाय समान
नव्वदी गाठीत पार पडले सोपाक्ष वाडवळ अधिवेशन
पूर्वसूरी वाडवळ शीष्ट शिष्टाईत कमी पडले नहते जर
वाडवळी बायबोलीला व्यासपीठ मिळूनरेले अहते तर
गावात रेवून साठीपार शीष्ट वाडवळीला लावती वाटेला
तवा आताया पीढीला तरि ठपका देवुन अन्याय क्याला
वाडवळ कट्टा योस काय तो बुडत्याला काडीया आधार
बायबोली वाडवळी जिवंत ठेव्याहाटी करा पक्का निर्धार
...............एच.आर. कविवर.
No comments:
Post a Comment