Saturday, 24 November 2018

निवृत्ती

निवृत्ती

गळून गेले माझे मी पण
अनुभूतीला सारे अर्पण
रम्य बालपण हरपुन गेले
यौवन  सांप्रत नाही उरले

वानप्रस्थ मी या संसारी
नामस्मरणी मंत्र हरिहरि
कशास चिंता वार्धक्याची
निःष्कर्म वाट चिरशांतीची

शैशव जपतो निजप्रौढत्वी
सूर आळवित मनी भैरवी
कोलाहल ना गमे अंतरी
कवित्व मजसि देन ईश्वरी

मीपण नुरता उरते शांती
शांति लाभता सरते भ्रांती
थांबवि श्रीहरि व्यर्थ भ्रमंती
मनुजा लाभे चिर विश्रांती

येतो उघडा जातो उघडा
सवे जाईना वैभव वाडा
मी जाता मग राहिल काय
होइल काही का अंतराय

       हेमंत राम  पाटील
   दहिसर, मुंबई
8108419392.

Saturday, 17 November 2018

सूर जुळाले

शेलकाव्य उपक्रम

सूर जुळाले

शब्दधन हाची ठेवा
ठेवा जपून अंतरी
शब्दावीण सारे उणे
उणे देवत्व मंदिरी

मंदिरात अंतरात
अंतराळी तोच आहे
सूर जुळावा त्याच्याशी
त्याच्यापाशी सर्व आहे

माझी लेखणी दिवाणी
दिवा लावी कवितेचा
शोध घेवोनिया पाही
पाही आशियाना त्याचा

शब्दरूप ईश्वरू तो
तोच आहे कवनात
त्याला भजा निशीदिन
निशीदिन  दिनरात

प्रयत्नांती  परमेश
परमेश गवसला
माझा शब्दघन सूर
सूर काव्यात जुळाला

    हेमंत राम  पाटील
दहिसर-मुंबई
8108419392

वाडवळी शेलकाव्य

वाडवळी शेलकाव्य

माही वाडवळ बोली
बोली फक्कड रसाळ
जही फणस बरका
बर का! गोड बक्कळ

गेली होती विस्मरणी
विस्मरणी हद्दपार
शीष्टां नय होता लळा
लळा लावी कविवर

गावकरी हांगव्याला
हांगव्याला वाडवळ
खुर्सीहाटी हपापले
हपापले हट्टीबाळ

अरे जरासा बाळगा
बाळगारे  अभिमान
बायबोली वाडवळी
वाडवळी गावू गानं

आज हिंडता मी गाव
गाव बोले नय बोली
कुणी ना वाडवळीत
वाडवळी बोलेनात

    हेमंत राम  पाटील
दहिसर-मुंबई.

Sunday, 11 November 2018

वृद्धाश्रम पाऊले चालती वृद्धाश्रमी वाट नीजसंसारात हरवली खाट जबाबदारीतून सोपी पळवाट वृद्धाश्रमी वृद्धांची रवानगी थेट स्वकमाईने उभारिले घरकूल काटकसरीने राखी समतोल नाही हौसमौज कसली सहल हात नाही सुटला खर्चाया सैल निवृत्तले ऐसे बाप्पा बेलवलकर अपत्यांना बहाल केले घरदार अपत्यें चालाख भलती हुश्शार वृद्धाश्रमी भरती ऋण बाप्पावर अरे बाप्पा सौ.चे होते म्हणणे ताट द्यावे पाट कदापि न देणे दात होते तोवर खाल्ले ना चणे स्वीकार वृद्धाश्रम पंचाश्रम लेणें किंग लिअरही सुटला ना यातून ज्याने स्वराज्य केले लेकींना दान पोटच्या लेकींच झाल्या त्या दुष्मन वृद्धाश्रम होवो वयस्कांना वरदान हेमंत राम पाटील. 8108419392 B-201, त्रिवेणीसंगम,तावडेवाडी एल.टी. रोड, दहिसर(प),मुं-400068

वृद्धाश्रम
           
पाऊले चालती वृद्धाश्रमी वाट
नीजसंसारात हरवली खाट
जबाबदारीतून सोपी पळवाट
वृद्धाश्रमी वृद्धांची रवानगी थेट

स्वकमाईने उभारिले घरकूल
काटकसरीने राखी  समतोल
नाही हौसमौज कसली सहल
हात नाही सुटला खर्चाया सैल

निवृत्तले ऐसे बाप्पा बेलवलकर
अपत्यांना बहाल केले घरदार
अपत्यें चालाख भलती हुश्शार
वृद्धाश्रमी भरती ऋण बाप्पावर

अरे बाप्पा सौ.चे होते म्हणणे
ताट द्यावे पाट कदापि न देणे
दात होते तोवर खाल्ले ना चणे
स्वीकार वृद्धाश्रम पंचाश्रम लेणें

किंग लिअरही सुटला ना यातून
ज्याने स्वराज्य केले लेकींना दान
पोटच्या लेकींच झाल्या त्या दुष्मन
वृद्धाश्रम होवो वयस्कांना वरदान

    हेमंत राम पाटील. 8108419392
B-201, त्रिवेणीसंगम,तावडेवाडी
एल.टी. रोड, दहिसर(प),मुं-400068

Saturday, 27 October 2018

कोरडेपाषाण

कोरडेपाषाण

कोरडेपाषाण तुम्हीहो  कुंपणावरचे सरडे
शासनदरबारी कामकाज लालफितीत अडे

कोरडेपाषाण अतिरिक्त वेतनही पदरी पडे
तरिही नीज कर्तव्यात पेंड खाते कुठे रे घोडे    

कागदपत्राची दखलही जर घ्याविशी ना वाटे
मग जावे तरि का सरकारी नोकरीचिया वाटे

काम दिसामाजी थोडे तरि म्हणती अतिलोड
खुर्ची तापविती सातघंटे धारिणीवर धुळवड

नोकरीस्तव घातले का रे मध्यस्थांना साकडे
मोजलेही असेल दाम चहापानास्तव रोकडे

कोरडेपाषाण ऐसे कैसे झाले दरबारी मुखत्यार
ऊतून मातून मोप करून राहिलेत भ्रष्ट आचार

आम्हा माळीयाची जात पडताळणीस रवाना
तप लोटले धारिणी गायब खाद्य उंदीरमामांना

जोवर या कोरडेपाषाण खाबूंचे आहे अधिष्ठान
कैसे यावे अच्छे दिन नि व्हावा भारतदेश महान

   कवी-  हेमंत राम  पाटील. दहिसर,मुंबई .
        8108419392

Tuesday, 23 October 2018

रात्र पौर्णिमेची

रात्र पौर्णिमेची

रात्र पौर्णिमेची आश्विन मासाची
नव धानांकीत खीर ओर्पिण्याची

झाले बळीराज रात्रीस निवांत
कोजागर्ति ध्वनि घुमवी अनंत

रात्र पौर्णिमेची नागरी जनांची
गच्चीवरी मेळा मैत्री चांदव्याची

बहु दिवसांची आस चांदण्यांची
इच्छापूर्ती करी रात्र पौर्णिमेची

शुभ्र पीठूळ चांदण आसमानी
सखेसखी नहातील किरणांनी

रात्र पौर्णिमेची  उजळो मनात
आश्विनात आश्वस्थ व्हा आयुष्यात

      हेमंत राम  पाटील. दहिसर मुंबई.
       8108419392.

Sunday, 21 October 2018

काय करील सद्गुरू

काय करील सद्गुरू

प्राशी वारूणी गंडेरी   बाबा प्रवचन करी
भरपूर  यथासांग      दृष्टांताचा मारा करी

बाबा रंगे  शामरंगी    विठोबाच्या देऊळात
भक्तगणा  ओवीरूप   पाजी सारे ज्ञानामृत

बाबा देख बिलंदर    जैसा चोरावर मोर
नच लावी ताका तूर   खोदी उंदीर डोंगर

गरगरा फिरे आत्मा   घाली व्यर्थ येरझारा
हरिमुखे म्हणा सारे   चुके चौर्याशीचा फेरा

भक्तभोळा रे बावळा  उमजेना काग काळा  
बुवा करी कावकाव    राव गणी जपमाळा

बुवाबाजी फोफावली   ठार वेडे अनुयायी
अर्पूनिया द्रव्य सारे    रडतात  ठायीठायी

टाळ कुटून संसारी    गडी कष्टेना शिवारी
शिवशंकराचा गांजा   भक्त गांजून भिकारी

बापू बुवा बाबा भोंदू   नका नाद त्यांचा करू
होई वेडापीसा जीव   काय करील सद्गुरू

   ----- हेमंत  राम  पाटील. दहिसर-मुंबई.
           8108419392.

Friday, 19 October 2018

विद्याधन

विद्याधन

विद्याधने श्रेष्ठपण, मनुष्यास आले जगी
कल्पतरू ज्ञानयोग ,देई त्यास जे जे मागी

विद्येवीण कफल्लक ,भीकेपोटी घे कटोरी
जगताचा स्वामी जरि, विद्या नसता भिकारी

विद्याधन  श्रेष्ठधन ,चोर चोरू नच जाणे
बंधूंतही ना वाटणी ,किंवा कुणाची भांडणे

विद्याधन वाटा जगी , वाटताना वाढ होई
शिकविता पाठशाळा ,प्राप्तहोई स्वकमाई

आळशाला विद्या नाही , विद्येवीण धन नाही
निर्धनाला मित्र नाही ,मैत्रिवीण सौख्य नाही

देखा धनवान कैसा, धनानेच अंध झाला
विद्याधने देख अंध  , ज्ञानचक्षू डोळसला

विद्याधन जयापाशी , सन्मानिल जग त्यासी
तिन्ही लोकी त्याचा झेंडा, फडकेल गगनाशी

विद्याधन महाशक्ती  , बहुजना  जगविण्या
बुद्धगांधी दीपस्तंभ ,  स्वप्रकाशे दीपविण्या

--- हेमंत  राम  पाटील. १९/१०/१८
    दहिसर, मुंबई.8108419392.

Saturday, 13 October 2018

बा रे पैसा

बा रे पैसा

बा रे पैसा तुला कुठं कुठं जन धुंडिताती
तुही जगात सरसी तुजपायी किती भ्रमंती
हावटतो जगाया जकला बाजार एकहाती
गाठीस नाही पैसा त्यास पुसेना कुणी अंती

स्वामी तिन्ही जगाया पैशाविना भिकारी
ना काळजी तयांना भरल्या घरी तिजोरी
अहेल पैसा तोवर बैसा म्हणती पाटावरी
पैसा गेला अक्कल गेली जो तो धिक्कारी

पैशाया सामर्थे गुंडाजी पाजी जाले बाजी
पैसा जयावर राजी तयांना भजती नेताजी
पैशानेच मनुजा आले कुबेरत्व जगामाजी
न एकही वस्तू की पैशाने असाध्य आहे जी

जितेपणी लागे पैसा मरणांतीही पायजे तो
पैशाविना उपाशी पैसेवाला तुपाशी खातो
पैकाची गूळ जैसा मनुष्यमुंगळा चिकटतो
पैसा ऐसा मेवा खा कितीक पोट ना भरतो

पैसा नसे तयाची उपवर कन्या राही कुवारी
हताश बापास त्या सावकारी कर्जभार शीरी
धनिक हव्यासी भोट्टे पैशावर जीव लयभारी
कंगाल माणसाहे नकटेच नाक दुनियादारी

कवी - हेमंत  राम  पाटील.8108419392.
          दहिसर, मुंबई.400068.

ओवाळू आरत्या

ओवाळू आरत्या

डाय-डोकर्या जाल्यात  हरण्या
तरण्या जाल्यात शोभेया बरण्या
काय हांगव्या कर्माया कहाण्या
पोतेयास घरा कर्त्या दीनवाण्या

घर तुहं मंग उठाठेव तुस कर
होकर्यां पसारा डोकर्यां आवर
खादीया काळ निवृत्तावर भार
अहून अडसण नहून निराधार

संस्काराहं वैभव नहेन माहेरा
हमजा सासुरी अलक्षुमी फेरा
करणार्यापाठी कामाया भारा
संसारी मनुजा घाली येरझारा

लवंगी मिरच्या गावढळ गावस्या
नाव बदलून नगरी आल्या सासुर्या
गटार-गंगा सामावून घेतो  दरिया
हंबाळून ओवारू ओवाळू आरत्या

कवी - हेमंत राम  पाटील.
          दहिसर,मुंबई.

Thursday, 11 October 2018

शीतला माता

शीतला माता

जय देवी शीतला अंबा भवानी
केळवे - माहीम अधिस्वामिनी
समुंदर सुरूबाग मावळतीला
हिरव्या बागायती उगवतीला
पुण्यवंत भक्तगणा वरदायिनी
जय देवी शीतला अंबा भवानी

पृथ्वी आकाश पाताळ धुंडता
तुयाहरकी बीजी दुहरी नय माता
डोळा दिहे तेजमयी दयाकरूणा
करी जकल्या सजीवा कल्याणा
कालीरूपी लढली शस्त्र परजूनी
जय देवी शीतला अंबा भवानी

तू दुर्गा तू कमला तू काली माता
पृथ्वीवर अवतार दुर्जन निःपाता
श्रद्धाभक्तीभावे जे टेकती माथा
आशिष देई तयां होऊन कृतार्था
दुःखहारी सुखकारी तू सौदामिनी
जय देवी शीतला अंबा भवानी

कवी- हेमंत राम  पाटील
       दहिसर- मुंबई.

Wednesday, 10 October 2018

पाऊलखुणा

पाऊलखुणा

डिस्कोदांडिया नर्तक जमतिल नवरात्रीच्या सणा
रंगेल नऊ दिस रासगरबा उमटतील पाऊलखुणा

गणपती गेले गौर गेल्या ठेवून मागे पाऊलखुणा
त्या पदचिन्हांकीत वाटेने अंबा आल्या विश्वांगणा

काठेवाडी मारवाडी संगे सकल मुंबैकर थिरकती
पाऊलखुणा प्रतिवर्षी तयांना ओढूनिया आणिती

पाऊलखुणा अग्रणी पथनायक उमटवोनि गेले
मागोवा घेत पुढे तयांचे अनुयायी मार्गस्थ झाले

आजही सह्याद्रि गडकोटांवर गडप्रेमी जे भ्रमती
पाऊलखुणा शिवशंभूंच्या घडविती गिरीभ्रमंती

कवी- हेमंत राम पाटील 8108419392.
           दहिसर, मुंबई.१०/१०/१८

Sunday, 7 October 2018

प्रथा-परंपरा

प्रथा-परंपरा 

निर्मिका दगडा शेंदूर थापून निर्मिला देव
भोळ्या जीवांच्या मनात निर्मिले तू भेव
दुधासाठी कैक बाल अश्वत्थामे ते वंचित
दगडी देवाला दुग्धाभिषेक मोठ्याथाटात
बरी सगुणभक्ती मूर्तीरूप भगवंतही बरा
काय सांगू भगता चालू आहे प्रथा परंपरा

नारळफोडून मधुर पाणी ओति देवामोरीत
गंगाजल म्हणून गटारपाणी घेतात पोटात
गाभार्यात दुधानारळ पाण्याचा कुबट वास
दर्शनरांगेतुन गाभार्यात येता गुदमरतो श्वास
गाढवापुढे गीतापठण कालचा गोंधळ बरा
काय सांगू भगता चालू आहे प्रथा परंपरा

तैल तुपाचे दिवे ओवाळून देवा काजोळती
गोरगरीब हे भाजीत तेलाचा उंदीर मुतविती
ढोलनगारे घंटानाद कानी देव झाला बहिरा
नवस सायास करून रोग होणार काय बरा
देव शाकाहारी अन देवीला नवसाचा बकरा
काय सांगू भगता चालू आहे प्रथा परंपरा

बालपणी गुरव बाळाने देवाची पै उचलली
म्हणती मुका होउन तयाची वाचा बंद झाली
सध्या कोट्यवधी संपत्ती देवा तुझी लुटतात
तरि कोणी मुके झाल्याचे नाहीरे ऐकिवात
देव पण दुर्बला घातकी बळी जातो बकरा
काय सांगू भगता चालू आहे प्रथा परंपरा

कवी-   हेमंत राम  पाटील.B-201 त्रिवेणीसंगम,
         तावडेवाडी, एल.टी.रोड.दहिसर (प ).
         मुंबई.400068.M- 8108419392.

Friday, 5 October 2018

पितरं

पितरं आली कौलारा.

हयातभर जेत्तेपणी वाढगो बाप्पाला
मटणा तुकडा कोंबडवडा नय वाढला
तोंडाला पानं पुहली तुमी हणाहुदीला
आता क्याला पोटृयां पान दावी पित्राला
कावकाव करून वारते काक नैवेद्याला
जो आयबापा हंबाळी डर नाही त्याला

घोटभर शा हाटी जीव त्यांसा तळमळला
पैट मारून मैतराहंगे यो मस्त डळमळला
पडवीत बाप्पा ठेवला याने  हमजून उपरा
आता क्याला काकरूपी जेवू घाली पितरां
जित्या आठी न मेल्या खजूर वाटी लोका
मेल्या टाळूवरसं लोणी खाणारा तू बोका

उगा क्यव कांदे होलून तळती कांदेभजी
सडलेलं मांसभक्षी कागळा मुळीना राजी
नकोरे बुधा पैका अहा घालवू मुळी वाया
कौलावरसं नैवेद्यपानं घाल मुखी गरिबाया
भुकेला तृप्ती पावेल जवा तुह्या काकग्रासे
समस्त पितरं करतील तवा तुस आपलेसे

कवी- हेमंत राम  पाटील.दहिसर-मुंबई.
           8108419392.

Tuesday, 2 October 2018

बापू

बापू

तुह्या नावाये मोप बापू उदयाला आले
मायाजाळात अडकवून भक्ता वेडे केले
तू फाँरिनरिटर्न सूटबूटधारी महा बँरिष्टर
पण आखूड धोती स्वदेशी उघडा फकीर

कमावली अहती कवडीक दौलत गाठी
देशप्रेमी वेडा परि कष्टला देशमुक्ती हाटी
बापू नाव धारून बनिये आश्रम खोलले
शिष्यांना गंडवित बो शाही जीणं जगले

सब्बन पापी न बाजार मांडणारे मंबाजी
देवाला देखिल वेठीला धरलं रं बापूजी
राम रहीम  रंभां नासवून घेत होता सुंबा
राजकारणी पण भुलतात बापूया दंभा

बापू इंग्रज परवडले बिना शस्र तू लढला
आता ते पाक अतिरेकी घणाघणा मातला
बेंल्या तू सांबाया अवतार  बापूजी भोळा
पाकनं वाटणी लाटून केसान कापला गळा

पावू कय बापूजीला आजतक शोधून रेले
सादे जीवन उस्से विसार दिहती ना भले
दोन आक्टोबर साजरी करतो गांधिजयंती
स्वच्छतेया  दिखावा घेवोनिया झाडू हाती

कवी - हेमंत राम  पाटील
   दहिसर , मुंबई.२/१०/१८

Friday, 28 September 2018

माऊली

दशाक्षरी

      माऊली

आभाळागत  माया  अपार
तुळता  तुळे  नच  कदापि
प्रेमाची  वटवृक्ष  सावली
मापता  थिटे  अंकगणित
मायेचा  पदर तू  माऊली

माऊलीवीण  विश्व हे  शून्य
तिन्ही जगाचा स्वामी भिकारी
माय महिमा  अपरंपार
बाळा घडवी  विश्वमानव
शिकवोनी  जीवनसंस्कार

संस्काराची अमोल दौलत
उद्धारी  कन्यापूत्र  भूवरी
अथांग  मायेचा  हा निर्झर
फुलविण्या शैशव बगीचा
पाझरतो  चिर निरंतर

कवी - हेमंत राम  पाटील
          दहिसर, मुंबई.

Thursday, 27 September 2018

पितरमुक्तिदा कागळा

पितरमुक्तिदा कागळा

होतात मरणांती माहणं जर का कागळे
मग धर्म जात पंथ मानती का वेगळे

मुळात माहणा रुपांतर कागळ्यात क्यव
या प्रश्नावर आजविरी जालयं बो कावकाव

आंबा लावला ते आंबास उगवेन पेरू नय
मंग माहणाया कागळा होणं अशक्य हाय

खरोखर कागळ्यांना पूर्वज जर  का मानता
तर वहरभर तुमी त्यांना हाडतुड का करता

बरं गोरी माहणं गोरे कागळे होणे तर्कसंगत
पण सब्बन कागळे दिहतात काळ्या रंगात

कागळ्या रूपात पित्र येतात का? देव जाणे
पण पितृपाखी कावकाव कागळा धार्जिणे

जेत्या आठी मेल्या खजूर वाटी पुत्र ऐसा गुंडा
पितरमुक्तिदा कागळा करी त्यांसा जीव थंडा

   कवी  -  हेमंत राम  पाटील. दहिसर-मुंबई.
            8108419392.

साद तुला मानवा

दशाक्षरी

साद  तुला  मानवा

तू  नूतन जगताची आशा
करू नको निसर्ग विनाश
या देशी तुज नसे वानवा
रक्ष रक्ष तू पर्यावरणा
साद देते तुला मी मानवा

दुःखी आहे आज वसुंधरा
समतोल सारा बिघडला
तूच आहेस जबाबदार
सत्य आकळेल तुज जवा
बडवशील तू फक्त ऊर

निघोनिया जाईल ती वेळ
हाती काही उरणार नाही
यावे भानावर आता तरि
उभारूनी सिमेंट जंगल
दुर्लभ जाण कांदा भाकरी

कवी- हेमंत  राम  पाटील.
   दहिसर, मुंबई.

Friday, 21 September 2018

दशाक्षरी

दशाक्षरी

हात तुझा हाती असताना

हात तुझा हाती असताना
मम मनासी भय कोठले
तोल सांभाळशी सर्वेश्वरा
वाट चालताना ढेपाळताना
सोबत करी देई सहारा

जीवन सहारा वाळवंट
पाणवठा आढळेना कोठे
बिकट घाट कठीण वाट
अनोळखी परिसर मोठा
दिसेना कुठेही वहिवाट

परि तुजवर भरवसा
सोबत तू सोडणार नाही
दिलासा दिलास सदोदीत
अमूर्त रूपात चराचरी
नीज भक्तांसी देतोस हात

    हेमंत राम  पाटील.
दहिसर,मुंबई.
      8108419392.

वाडावळी काव्यरचना

पणतू हांगे पणज्याला

भोट्टृयाबा आयकून घेटली तुही कथा
आता तू पण आयक जरा पोरांही व्यथा
गाव होडून नोकरीहाटी पोरं आली शहरी
कायबाय पूर्वजाया वाटण्या कोडं भारी
दहा गुंठे सलग जमीन दुर्लभ वाट्याला
मंग हांगबा पोरटोरं रेतीन क्यव गावाला

जे हिकले हवरले नय पण जमीन मोप
त्यांना गावातस हपमम काम लय सोप
आता तुमसे नातू पणतू थेट विदेशाला
आरक्षणा शाप नयते हौस नय कोणाला
हगेहोयरे उपरे हमजून परके करतात
तवा आदिस तुटलेली मनं दुभंगतात

अरे तुमाला वाटते वृद्धाश्रमी दुरावा
पण  घरकोंडमार्यापेक्षा वृद्धाश्रम बरवा
जे आजकाल ओवा न होकर्यातय रेतात
त्यांसी होते नटसम्राटाहरकी वाईट गत
तरि बग भोट्टृयाबा नेत तुला लंडनला
पण किंगलियरसी हालत रडवेल तुला

  कवी - हेमंत राम  पाटील.
         दहिसर, मुंबई.
        8108419392.

Thursday, 20 September 2018

ना खेद ना खंत

ना खेद ना खंत

ते कर्जबुडवे मल्लमोदी देश सोडूनी गेले
बँकां खड्ड्यात घालून तोंड काळे केले
अवघा पैसा मार्गी लावून मार्गस्थ झाले
या चोरांना आधारावीण कैसे शक्य झाले

जोवर गुर्हाळ तोवर मुंगळे गुळाला लपटले
बुरे दिन आणून साले तोंड काळेकर्ते झाले
मद्यदुकान शाबूत स्वीसबँक द्रव्यही सुरक्षीत
मल्ल्या लपला विदेशी त्यास ना खेद ना खंत

गंडाघालून खड्डयात घालती देश महाभाग
पकडून त्यांना सरणावर ढुंगणी लावा आग
या भाड्यांना सहारा देती जे कोणी जगतात
खयभंग त्यांचा होईल घडेल पुनः महाभारत

......कवी- हेमंत राम पाटील.8108419392.
               दहिसर,मुंबई.


Monday, 17 September 2018

निरोप देतो

दशाक्षरी

देतो निरोप

देतो निरोप तुला गणेशा
सकल कला नि विद्यादाता
सुखकर्ता तू विघ्नहर्ता तू
प्रतिवर्षी पुनरागमन
देशी दर्शन भक्तगणा तू

दर्शनात होई समाधान
आरती गाता हरपे भान
कार्यारंभी तव पूजाअर्चा
एक हस्त तत्पर सदैव
द्यावया सकला आशीर्वचा

तव कृपेचा वरदहस्त
निरवी अघोरी संकटाला
ऐसा गणेश भाग्यविधाता
ब्रम्हांडीचा गणनायक तू
तूच कर्ता आणि करविता

कवी - हेमंत  राम  पाटील.
      दहिसर,मुंबई.
      8108419392.

दशाक्षरी

दशाक्षरी काव्य

गोवर आली , करू स्वागत

गोवर बाय आली वस्तीला
फूलपत्री अलंकार साज
चंदनी पाऊली प्रवेशित
भाणोशी सदनी विराजली
गोवर आली करू स्वागत

माहेराशी आनंद सोहळा
गोवर बायजी हरखली
हिरवा शालू  लागला खुलू
सखया सार्या होऊन गोळा
घालून पिंगा लागल्या डोलू

गोवराईचा  नैवेद्य  खासा
रांधियला ताजा बासा मासा
गोवराई जेवली थाटात
माहेरी झाला मोठा उल्लास
गोवर  पूजीली  भादव्यात

कवी- हेमंत  राम  पाटील
      मुंबई --१६/९/१८.
        8108419392.

Saturday, 15 September 2018

समोसा चटणीत मेला उंदीर

समोसा चटणीत मेला उंदीर

समोसा चटणीत सापडला मेला उंदीर
साक्षात पुण्यनगरीत हा घडला प्रकार
समोसा प्रेमींनो यापुढे व्हावे सावधान
बाजारू पोटोबा करताना जरा जपून

बघा साठीपार घरगुती खाणारे वयस्कर
जगतात  जीणं  खुंटीवर टांगून आजार
कारण बालपणापासून नियम पाळीती
फक्त दोन वेळा भुकेपोटी खिचडी खाती

पण आता चुलीपुढे उभे कोण ठाकणार
आयते खाणार त्याला ढाबेवाला देणार
शुगर कोलेस्ट्रल पोटढेरी जरि वाढणार
झुरळसुंदरी पालीउंदरी मृत लज्जतदार

यदाकदा होते सामुहीक अन्न विषबाधा
भय का उरी मीरानं पचवलं जहर राधा
नातरि कृष्ण धूरवायू जल ध्वनी प्रदूषण
बनविली मायभू नतद्रष्टांनो विषारी खाण

कवी  -  हेमंत  राम  पाटील.१५/९/१८
         दहिसर,मुंबई .8108419392.

Sunday, 9 September 2018

दूरदेशी बाप

दशाक्षरी
दूरदेशी बाप

बाप माझा गेला दूरदेशी
नांदतो मजेत ऋषीकेशी
वृद्धाश्रम दूरदेशी बरा
सून प्रेमविवाहाची राणी
मामंजी गडी स्वतःच्या घरा

निवृत्तीवेतन खर्ची जाय
सूनमाहेर लोळे चैनीत
ठेविला पोरं  मुठीत बयेनं
थांगपत्ताही लागू न देता
बापाचं आश्रमी आगमन

सांगा  बापाच काय चुकलं
एकुलत्या दिधलं सर्वस्व
कोणी कोणाचं नसते अंती
सत्य आकळे  निरोप घेता
दूरआश्रमी  चिर विश्रांती

कवी -- हेमंत राम  पाटील.
        दहिसर, मुंबई.
       8108419392

Tuesday, 4 September 2018

स्त्रीशक्ती जागर

स्पर्धेसाठी

स्त्रीशक्ती जागर जाणिवांचा

क्रांतीज्योत सावित्रिशी आहे तुझे नातें
ज्ञानसंपन्न होऊन घे हाती प्रगती मशाल
स्त्रीशक्ती महाशक्ती जागर जाणिवांचा
भगवान तथागतांचे उमलते ज्ञानकमल

आदिशक्ती अंबाबाई तुझीच मूर्तिमंत रुपे
तू चाल पुढे नको राहूअशी उगा पाठीसरी
भीमशक्ती आधार तुझा स्वतंत्र या भारती
रणरागिणी गृहस्वामिनी आधुनिक तू नारी

अन्याय अत्याचार सोसणे हाही गुन्हाच
नारीशक्ती पाठीशी नाही तू अबला आता
भित्यापाठी ब्रम्हराक्षस भक्ष्य होऊ नको
हिंमत दाव जरा बनशील तूच तुझा त्राता

थरावर थर रचून गौळणी फोडी दहिहंडी
कुठेही उणी ना नराहून आजची शूर नार
कृष्णजन्म सोहळ्यास राधिकाचा पाळणा
स्त्रीशक्ती जागर जाणिवां जोजवी ज्ञानदोर

कवी- हेमंत राम पाटील. मुंबई.
    8108419392.

Sunday, 19 August 2018

कन्याकुमारी

कन्याकुमारी

झरताना श्रावण सरी
       वाटते लय भारी
देवभूमी दख्खन सारी
माणसान बुडवली श्रीहरी
     
पैशासाठी घाव डोंगरी
       निसर्ग केला भिक्कारी
बिचारी केरळकन्याकुमारी
श्रावणात झाली दर्दभरी

खणुनिया खनिजाच्या खाणी
तुमडीभरूंन खळखळली नाणी
मग केली निसर्गाने झोडणी
कोसळले आभाळ दक्षिणी

...पी. हेमंत राम  कविवर.

दहिसर मुंबई.

पडका बंगला

[Image 309.jpg]
         
           पडका बंगला

शहरीबाबूनं बंगला बांधला निर्जनी ओस पडला
जागाठागा जागस्या जागी उगा घोर का जीवाला

तुहं ते माहं माहं माह्या बापायं इस्टेट परि बेवारस
पापी जीवाला हुटेना कदा जमीन जुमला हव्यास

लोभ्याहं धन धोबी खाय देहायाही भरवसा काय
आला बुलावा उप्परवाल्या नंगा आया नंगा जाय

माणसी एकेक बंगला गाडी लागली स्पर्धाहोड
अटे ओढतो तटे ओढतो भलतीस ही ओढाओढ

गिळून दौलत हपापाही जमवली माया जकली
वर्ख लावून होनेरी विकतो माल जकला नकली

पडका वाडा पडका महाल जालासे भूतबंगला
शीतेही नाहीत शेतीही ओस भूतही ना थार्याला

....कवी- हेमंत राम पाटील.8108419392.

Friday, 17 August 2018

वरोरी आद्य वैद्य

वरोरी आद्य वैद्य
वैद्यराज रघुनाथ माधव राऊत वरोरकर
आद्यसोपाक्ष आयुर्वेदाचार्य  धन्वंतरी थोर
कवडेक रोगग्रस्त केले रोगमुक्त तंदुरुस्त
अडवणूक नय केली कवा उभ्या हयातीत

बारक्या सारक्या आजारानं त्रस्त गावकरी
रघुनाथ डाँक्टर बुलावा येता हजर सत्वरी
सफेद धोतर काळा कोट गांधी टोपी माथी
उस्सागोरा साठीपार वैद्य येवून देई बस्ती

सब्बन रोगाह मूळ देखता कोठा साफ नय
एनिमा देवून आधी रघुवैद्यजी करी उपाय
मलावरोध हटता ऋग्ण खाडकन बरा होई
रघुनाथ वैद्यराजाहं जकलं गाव हाय उतराई

....पी. हेमंत राम  कवीवर.8108419392

Thursday, 16 August 2018

अटल योद्धा

अटल योद्धा
अटलबिहारी वाजपेयी महान
  टक्करून कारगील युद्ध  गहन
लक्ष्य एक माझा भारत महान
  बिकट स्थितीत विकास घडवीन
हार जीत दैवजात जरि भारता
  रिंगण ना सोडिले तरि तत्वता
वानिले वा कुणी निंदिले असता
  जय विजय पचविले सर्वज्ञ नेता
पेरियले शांतीचे बीज हयातीत
  यीये करावया सुराज्य भारतात
थोर संसदपटू उभय सभागृहात
   रयतेच्या सदैव वसेल हृदयात

....हेमंत राम पाटील.१६/८/१८.