Saturday, 27 June 2020

पितृदिन

पितृदिन

हेतात राबला बाप निंबरात तापला रे खूप
जगविण्याहाटी लेकुरां उपाशी जागला बाप

सालायसा बारकेपणी हातामन घेऊन हात
कामातस पाहे राम टाळ कुटण्या ना उसंत

भणविले त्याने हाती देऊन बोरूही लेखणी
ओठी होती त्याह्या  तुकोबाही अभंगवाणी

जाहलोरे भोठे जहेजहे हात हुटतस गेला
आता आठवत रेतो माया बापाया वेंघेला

जवा सोबत होती तवा पाहिला नेक माहणू
नय होती मुशाफिरी कवातरि फेरी डहाणू

बदलले जहे जग बदलले तहे रंग ढंग संग
बदलला नय रे बाप साठीत गाठी पांडुरंग

         पी. हेराम  कविवर.
फादर डे   २१/०६/ २०२०


महापूरे जीव जाती


।। महापूरे जीव जाती ।।

निसर्ग निर्मिका / काय हांगू लोका
केला पोतें धोका / जीवालागी  ।।

विकासक साधी /  बांधकामी संधी
नदी पात्रामधी /  आक्रमण !!

महापूर आला / काळाचाच घाला
वाहून रे गेला / भव सारा  ।।

कृष्णा,पंचगंगा / करोनिया दंगा
घालूनिया पिंगा / श्रावणात   ।।

गेली रे लोंढ्यात / गुरेही वाहत
घडले आक्रित /  अकस्मात ।।

बुडाली बुडाली / संसारी भगुली
विझुनिया चुली / घरोघरी  ।!

हेत आवलेलं / वाहून रे गेलं
काय नय रेलं / माळरानी  ।।

माहणात देव / घेता जाला धाव
मदतीयं पेव / संकटात  ।।

   पी. हेमंत राम वरोरकर.
बी-201, त्रिवेणीसंगम,तावडेवाडी,
दहिसर मुंबई 400068
8108419392.

प्रतिहंगेरी वरोरनगरी

प्रति-हंगेरी वरोरनगरी.
१९६५ते१९७५ या दरम्यानस्या काळात वरोरनगरी प्रति-हंगेरी रूपात नवाजली होती. यास काळात तारापूर अणुशक्ती केंद्रा निमित्तान बेक्टल कंपनीनं कंत्राटी काम  आंगावर घेतल होत. कंपनीये गोरेसाहेब न मड्डमा सनबाथ घेव्याहाटी हरेक ईतवारी शांत रमणीय अह्या वरोर बीचला येत अहत.
       वरोर मागेलवाडी GD ब्रांड घरगुती वारूणीया लघुउद्योग करित अहे. ईलायती गोर्यांना ईलायसीयुक्त मागेली वारूणी बाटली मोप पसंद पडली होती.त्यांना पुरवठा करव्याह काम मागेल्यांसी जाणती पोरं करत व भरपूर टीप मिळवीत.विशेष म्हंजे गोर्यांसी लगट जाल्यामुळे ही पोर फाड फाड विंग्रजी फाडत.बवतेक करून हंगेरी फाँरिनप्रांतासे साहेबलोक अहल्यामुळे वरोर नगरी ही हंगेरी नगरी होउन गेलती.
       आपली पोरं हंगेरियन होऊ नयेत भगून व पोरांस भलं होव्व भगून बीचला जाणार्या रस्त्याला पालक लक्ष ठेवून होते.
पण बीचला जाणारा मागेलवाडीहा हमरस्ता होडला ते बिज्या वायल्या वाटा होत्यास. भाटाया बावीवरसन मोरडासन लक्षुकाकाया बेळ्यासन जाणारी वाट सोईस्कर होती. या बेळ्यापासून ते वाकडीया खाजणादरम्यान पसरलेल्या या लवली बीचवर गोर्या हंगेरिअनसा सनडे सनबाथ कार्यक्रम पार पडत अहे.
       पुढे अणुशक्तीकेंद्राह काम पूर्ण जाल. बेक्टल कंपनीय कंत्राट खपलं. मागेलणी वारूणी मातुर अविरतपणे सालू हाय. आता चाळीस पंचेचाळीस वहरात मागे वळून पाहताना कुंपणाईनं आख्खा बीच गिळंकृत केला. जंगल खात्यानं लावलेली झाडं तोडून कुंपणधारकाईनं पैसा कमावला व कुंपणं पुडे सरकवून नारळीबागा समुदराला भिडविल्या.
      प्रतिहंगेरी लोपली.हंग्री किनारी लोकांनी बीच गिळला.बरं जाल एकाअर्थी विठ्ठला,वरोरनगरी दशकापुरतीस बनून रेली प्रति-हंगेरी.
वरोरी नगरी धन्य माय भू प्रतिपंढरी.

     पी. हेमंतराम वरोरकर.