ऊकडहांडी हुर्यो
आजुबाजुला खडे डोंगरकडे
मधोमध मामाय गाव मांडे
दक्षिणदिशेन डोंगराया कडेकपारीन
वैतरणा नदी सालली समुंदरामन
अहा निसर्गाया देखणा नजारा जिथ
अमदा सोपाक्ष वाडवळी सभा हाय तिथ
आवतण हाय आग्रहाय जकल्या वाडवळा
बावीस जानेवारीला सब्बन व्हारे गोळा
सामीश जेवणाहा बेत रविवारी खासा
बोकड कोवळा जहा लुसलुसित ससा
मटणसागुती हंगत कोंबडवडे तळलेले
संघाहे अधिवेशनी खुशीत भले रे भले
ऊकडहांडीया न्यारा फक्कड बेत
गुलाबी थंडी ही माघायी कवडी मस्त
याहोया ठाकुर राऊत पाटील चौधरी
पुरव म्हात्रे आणिक समस्त कैवारी
तारामती हरिश्चंद्र स्वागत नगरी सज्ज
वाडवळी बोलत ऊतरवा मायबोली कर्ज
प्रणिता पंकज ठाकूर आदर्श अध्यक्षा
सोपाक्ष संघकर्मी दक्ष वाढविल्या कक्षा
तरी जकल्या वाडवळ बाहा बयणींनो
अधिवेशना या रे सब्बन सदस्यानो
मनात मांडे खाऊ नका गाठा समक्ष मांडे
कविवराहेमन वाट पावे आगामी संडे.
No comments:
Post a Comment