Tuesday, 23 August 2016
Monday, 22 August 2016
पड रे पाण्या
जग हाय तहानल पर्जन्य जळ
भरभरुन गळ ऊतू दे नरसाळ
डोळे लावुन वाट पाहे वाडवळ
आणिक अखिल विश्व सगळं
बघ या ढगाला लागलिया कळ
थेंब थेंब कवातरि गळतोय नळ
जळगाव धुळ तपमान सेहेचाळ
घाटावरुन सालली मुंबयला पळापळ
जो तो पाण्याहाटी करतोय वळवळ
सब्बन सजीवाही दारुण होय तळमळ
अरे मेघा दयाघना कोसळ रे कोसळ अमृत जलधारे तुष्ट करी जन सकळ
वाहू दे शिवारी ओघळते ओहोळ
होऊ दे हिरवे जकले रानोमाळ
हेमन ऊतराई वरुणा सर्वकाळ
येवू दे खाली नभ भरले आभाळ
गर गर भोवरा
गरगर भवरा
गरगर फिरे हा भवरा
रंजन करतोय पोराटोरा
गोलमटोल लकडी भवरा
फिरवा लपेटून सुतळी दोरा
सोबत घुमवा भिंगरी गरगरा
गरगरा फिरे वेगे भवरा
भवरा राधिकेचा नवरा
हेमना भ्रमवितो भवरा
रंजवी रंगरंगुला भवरा
लग लग लगोरी
लगलग लगोरी
लग लग लगोरी मामासी नवरी
जमवून रचियली खापरीवर खापरी
दोन गट करोनी खेळति पोर पोरी
नाणेफेक करोनी श्रीगणेशा करी
मनोरा कोसळाया चेंडुने नेम धरी
कोसळला मनोरा पुनश्च ऊभारी
प्रतिस्पर्धी गट तयासि विरोध करी
लगोरी खेळासी बघा गंमत न्यारी
हेमन लगोरीने हर्षित आंतरी
बावाची वाडी
बावाची वाडी बावाची वाडी
जो तो सोडायचा तिथच गाडी
मस्त ढोसायचा वारीची ताडी
ताडा माडाची भरुन तुंबडी
हाले डुले वाट वेडी वाकुडी
मधेच फाड फाड इंग्रजी फाडी
मधाळ सूर आगळीच गोडी
जर मग का खोड कुणी काढी
भरलीच समजा तयाची घडी
वाट असू दे मिरखाडीतून गराडी
भुताला बी डरत न्होता झिंगाट गडी
आढळे हेमना नच मातीची बांडी
प्ल्यास्टीकने नासली ताडी न माडी
आंबा कोलंबट
🍋आंबाकोलंबटाही भाजी अजय अजरामर
बिज्या कोणत्याव भाजीला त्याही नय सर.
आवणिया हंगामात लानपणि खाल्ली भरपुर
चव रेंगाळते अजुनही जिभेवर.
वास्तवातील सुदिन
बरा म्हणुन हा इथं हुका बोंबिल मी खातो
आवणीस्या दिवसांची आठवण जागवितो
परत येणार नाहीत सुदिन ते वास्तवात
मायबापही नुरले हयात या जगतात
कवातरि हेमन भुतकाळात बागडते
खारोट केसराळी शेती हिरवीगार होते.
बटाटावडा
दिहिभरात जेवण मिळो कवाव
हकाळहकाळ मारा वड्यावर ताव
बटाटवड्यावर जकलेस खुश
ऊन थंडी वा असो पाऊस
मराठमोळा बटाटावडा जो विकणार
ऊपासमार त्याही कवास नय होणार
सातसमंदरपार गेला बटाट वडा
हेमन गाई वडा पोवाडा.
धन्य धन्य वडा पाव
धन्य धन्य वडापाव
झकास खाण वडापाव
रंक असो धनिक राव
पसंत सर्वां वडापाव
साता समुद्रा पल्याड धाव
पोटपूजेस्तव वडापाव
मस्त मांडा पत्याचा डाव
इस्पाक एक्का वडापाव
असो बुद्धिबळाचा डाव
वजिर खातो वडापाव
मराठी माणसा गाडी लाव
बेकारी हटवेल वडापाव
कावळा म्हणतो कावकाव
भूक शमवेल वडापाव
..........एच आर .
प्रेम
✍🏼 प्रेमगीत
प्रेमात डुबले कविवर कटृयावर सात
कवयित्री पण दिहली पडलेली प्रेमात
मी खुळा कविवर पडलो ना प्रेमात
प्रेम सफल होई का एका जल्मात
हा कटृटा देई प्रेमाहा वस्तुपाठ कविस
प्रेमकाव्य स्पर्धा कल्पना बघ झकास
मी स्पर्धक नाही माहे प्रेमकाव्य नाही
विसरलात नाही मला हेस खूप काही
नदी
🌄🏖🏝 नदी
नदी भेटली समिंदरा परत फिरेना माघारा
तिया नशिबातस नाय परतुन येणं माहेरा
दिहते तह नहते माया बाया बापुड्यांनो
नदी माहेराशी जाते भगुन जग सालते बाप्यांनो
सब्बन जीणं नदीह पोटात घेतो समिंदर
तरि तिला आठवतो जल्म दिलेला डोंगर
डोंगराह्या मायेपोटी वाफेह रुप लेवूनिया
नदी तरंगत जाय पाखं वार्याहे लावुनिया
पुनः होऊन लेकरू नदी वाजविते वाळा
पान्हा फुटतो डोंगरा न मंग येई पावसाळा.
ओढ
✍🏼 ओढ
कवातरी पावसात गावाकडे मी जाईन
डोंगर दरी खोरी सारी भटकंती करीन
गावाकडे हिंडण्याही ओढ हाय जुनीस
समिंदर हाकारितो भेटायसं मज हाय खास
कवड्यातरि दिह्यात नय तळ्यात डुंबलो
कवड्याक काळात नय मळ्यात फिरकलो
मन पाखरु होऊन हुंदडतो जंगलात सैराट
सुखालागी आरण्य सेवितो बिनबोभाट
सरीवर सरी
⛱ सरीवर सरि
पावसाया सरीवर सरी
तयात सायकल सवारी
मंगारी एक पोर एक पोरी
प्लास्टिक छप्पर डोईवरी
साललायं कोणी बिहारी
धन्य ही पाऊस वारी.🏖
गुरु वंदना
🙏गुरुवंदना.
धन्य धन्य गुरुवर ल.ग.जोग सर
थोर साहित्य विद्वान समीक्षाकार
सन एकोणीसशे सत्याहत्तर
एम.ए.ला जोग गुरु बेहत्तर
साहित्यसमीक्षा अवघड पेपर
मी मी म्हणणारे कैक ते गार
अह्यावेळी हांगतो आज कटृयावर
प्रबंधविषय देते जाले जोग सर
'नावात काय हाय 'लिवा पृष्ठ शंभर
लिवताना भारलं कैक पोराना कापरं
मीन स्मरला मनी माऊली ज्ञानेश्वर
लेखणी बरसली ऊत्तर पत्रिकेवर
वाटस इन नेम हांगे शेक्सपीअर थोर
म्हटल ते हाय नयते काहीस नायरं
कवडेक दृष्टांत देऊन सिदध केलं सार
प्रबंध वासुन संतुष्ट गुरु जोग सर
प्रबंध पेपर घेऊन मिरवला डोईवर
जहा कालिदास रचित शाकुंतलावर
नासला खुशीनं जर्मन गटे कविवर
जोगसरांची गुणसुमने वर्गात मजवर
धन्य ते थोर गुरुवर पं.वि.जोग सर
गुरुपौर्णिमेस माहे नमन तुमा गुरुवर🙏🌹
.........हेमंत वरोरकर
आठवणीतले वाडवळ गुरुजन
✍🏼 आठवणीतले वाडवळ गुरुजन.
स्वच्छ धोतरसदरा गांधीटोपी डोईवर
दुसरिया वर्गावर आले गुरु मोरेश्वर
हसत खेळत नाचत गायन कला
शारोळी भिडल्या कायम हेमनाला
दादा गेले बंदराला
किल्लि राह्यली त्याहा कमरेला
आई घरात काय करते
छोट्याशा बाळाहा भांग पाडते
आख्खा वर्ग तालावर नासे डोले
गुरु नटवर जहे काय भूवर अवतरले
रोड्यामास्तर म्हणून जन बाहे त्यांना
कला कौशल्या सह दिधले बहुज्ञाना
ऐसे वाडवळ गुरु मोरेश्वर पाटील दिधला जीवनी ज्ञानरुप परिमल
अभिवादन अजि मनःपूत गुरुवरा
शब्दरुप गुरुदक्षिणा देई हेमन मोरेश्वरा
................हे.रा.वरोरकर.
वाडवळ गुरुजन
✍🏼🙏 वाडवळ गुरुजन.
गुरु का.के राऊत आले वरोर शाळेत
मला म्हणाले कायरे अक्षर तुहे हेमंत
मंग बहोडला दऊतटाक घेउन मेजापायी
वदले पुस्ती लिव करु नको घिसाडघाई
त्याआधि लेखनाकडे दिलं नवत लक्ष
राऊत गुरुजींचा मात्र लेखनावर भारी कटाक्ष
का.के.गुरुजींनी दावले स्वलेखन ऊदाहरणार्थ
धन्यधन्यधन्य लेखणी हे अनंतआनंदमयी ऊक्ती सार्थ
का.के.गुरुंनी दिला काव्यरुपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा .🙏🌹
भाकर
✍🏼 भाकर
पोटात कावळा काव काव करी
जालि दुपार माय दे पिठलभाकरी
तव्याखिली ज्वाळ भाणोसि सुलीवर
बाजुला बहून माय थापिते भाकर
ऊपाशी पोरं मायसि हकाळपासून
हेतावरसन आलयं माय थकुनभागुन
पोरांयामायेपोटी पोटा चिमटा घेऊन
माय शेकीते भाकर लई लगिबिगीनं
कदी तांदुळ कदी ज्वारिबाजरि आटा
माय वाढते भाकर पोरांस्या ताटा
पेटत्या सुलिवरसा तवा तापत जाय
सुलिजवळ बहून भाकर थापिते माय
.............हेमंतराम पाटील.
गटारीन फसिवल
🐉🐍गटारीनं फसिवलं
१९६६ सालाला गटारीनं केला कहर
हादरले वरोरग्राम शोकाकुल परिसर
आबा बाबा अन्ना आप्पा तात्या मैतर
संगतीला नारुदादा सपेरा मित्र माहीर
मटण फ्राय मच्छीगंधान धुंद परिसर
बैठकीस व्हिस्की मिलिटरिरम बिअर
रंगात आली गटारी नशिल्या रंगात
आनंद त्यांस्या मावत नव्हता पोटात
अवड्यात साप साप कल्लोळ घरभर
घरातिल मंडळी सत्वर आली बाहेर
ए साप दावतो तुहा बाप गर्जे नारुदा
पकडला साप माजात हसे खदखदा
साप गळ्यात अडकवुन मद्यप्राशन
तयात करी महादेवासे तांडव नर्तन
नासतनासत घराकडे मिरवत निगाला
नशेत मंत्र विहरला नाग डसला त्याला
सापद्वंशपिडितांसा मित्र मरुन गेला
गटारीने फसिवलं कायमस नारु सपेर्याला.
...........हेमंतराम पाटील.🙏
वर्षा जाहलि पराणी
वर्षाव कटृयावर.
जाली होती वायली
कटृयापासून सायली
कटृयावर परतली
वाडवळ आवली
तू कटृयावरसन गायब जाली
कट्टाकविंही कविता रुसली
सब्बन पंचायत होऊन गेली
पण तू फिरुन कट्टयावर आली
आता कटृयाला खरी जान आली
आता परत काव्य भरारी आली
आता चाबुक पराणी आली
आता कटृयाही वर्षाराणी आली
स्वागत हाय तुह बाय कट्टेवाली
सायली वल्लरी सुगंध ल्याली
वाडवळ कट्टा शोभा वर्धिली
सायली खरी तू जगावायली.
...........कविवर एच. आर.🌹
फसलेली गटारी
🍺🍻उत्तान डोंगरी गटारी
फसली फसली गटारी फसली
फसली फसली दलदलीत फसली
रव्या सोमू मंगळू बुध्या घुर्या सुक्कर
गटारी भक्त ओथे पक्के लंगोटी यार
वारकरी जहि गाठी तिरथक्षेत्र वारी
तहिस गाठली गटारी उत्तान डोंगरी
पेगावरपेग चिकनलेग चखना भारी
ळासूर्य मावळला यांना पोहाया सुरसुरी
ऊतरले पाण्यामधि दलदलीत रुतले
ओहटीसमय गटारी पुरते बो फसले
सांच्यापारी यांचेहाल कुत्रही खाईना
एकमेका हातहाती रात्रही सरेना
सदानंद महाराजांसा धावा मनी केला
त्याक्षणी दीव्य पुरुष तेथं प्रकटला
डोंगरीसा मार्शल डाक्टर परोपकारी
त्यांने वासवले हे फसलेले गटारी
आजही त्यांना त्या दिसाहेस्मरण करा
पालथ्या घड्यावर पाणी बोध हा खरा
..............पी. हेमंतराम कविवर.
गुरगुराट
तरंग ऊठले थेट मांजराया मनात
ऊपासमार साललय मोळ्या श्रावणात
पयल्यान मधला तुकडा बाळाला
हेपटंबगडं येव्या आमस्या वाट्याला
ऊपासमार नको वाडवळ कटृयावर
तुमसी अक्का होती गायब जवा
तिय ऊदरभरण केल आमी तवा
पण ऊपकारफेडव्या हौस भारी
स्वतः आमागत सात घर फिरणारी
तवा आमालाव आणलं कटृयावरी
कटृटासालक हात पासनंबरी थोर
हरेकानी दत्तक घ्या दोन मांजर
बाकीऊर्वरिता कैवारी कविवर.
Sarkari Khadda
हरी
खड्ड्याकाठी ठिय्या देई मावर हाकारी
गरीय मावरं घरी हा मंत्र मुखे ऊच्चारी
श्रावणी मावरं देईरे खड्डा सरकारी
मावरलागेल गळा आशाळभूत हरी वेडा
सांच्यापारा बहला त्याला बायकोया ओरडा
वांझखड्डा देख हरीया श्रावण गेला कोरडा.


