Thursday, 9 March 2017

बायबोली जित्ती रेवून दे

बायबोली जित्ती रेवून दे

क्यालारं माजुरड्यांनो इंग्रजी बँड वाजवितात
मायबोली बायबोली धाय मोकलून रडतात

पवाडे गेले पाँप म्युझिक आयटम साँग जाले
शिक्षणाहे माध्यम जकले इंग्रजी होऊन रेले

बोली बोलणार्याला गावठी नावान हिणवतात
तोडकी मोडकी इंग्रजीबोलुन बाबू मिरवतात

मायबोलीतुन हिका हांगणारे तज्ञ वाटती खुळे
मेंढरामागुन मेंढुर गेलं शिक्षणाय जाल वाटुळ

जवा मायबोली कळे मोल तवा गेली अहते वेळ
धड पोराह काय नय घडे पैशाया होतोय खेळ

हाल्या कोल्या बायबोली जित्ती जागति ठेवू या
मायस्यागत बायबोलीला सब्बन माया लावू या

.......कविवर हेमंतराम पाटील.

No comments:

Post a Comment