जल्मून पोरां उपेग काय?
धनी गेला वैकुंठी सातजल्माही होडून सोबत
पाठराखीण राही पाठी एकाकी टीपें गाळत
पोरं सूनबाय मश्गूल संसारी परघरी नांदे दोय
मायसा कोंडमारा होय जल्मून पोरां उपेग काय
काय वानू दिवट्यांपुत्रांसी मायपरवड मायदेशी
एकास स्थळी माय उपाशी पूत-सूनबाय तुपाशी
पूत्रपौत्र जरि भोवताली मायला वाली कोण नाय
मायसा कोंडमारा होय जल्मून पोरां उपेग काय
ओवारू ते परके रक्त पण थिटं येथे रक्ताहे नाते
एकपूती रडते अन सातपुती मायही आसू ढाळते
मारकीम्हैस जेवि रूप सूनेहे आय ती गरीबगाय
मायसा कोंडमारा होय जल्मून पोरा उपेग काय
गावोगावी ओस आळी नांदती घरटी रिकामी
एकले वार्धक्य दुःखी कोणी नुरले येण्याकामी
हाय हाय! बाय बाय! नाय दुजा काय अंतराय
मायसा कोंडमारा होय जल्मून पोरां उपेग काय
............पी. हेमंतराम कविवर.
8108419392.