Thursday, 9 March 2017

डोंगरी हवेली

डोंगरी हवेली

माकुणसारी देवडोंगरी निसर्ग सुंदर
टेकडीवर उभारले हे भुवन मनोहर

संतोषाने वसवली ही वैशाली नगरी
दिमाखात ही इंद्राची जणू अलकानगरी

सफल जाहली सफाळ्यास ही स्वप्नपूर्ती
हिरवाईने असे विनटली मंजुमय धरती

आर्य-सार्थ कुशाग्र बाळे अण्णांचा आशिश
देवाचे डोंगरी शांत बंगली नांदतो परमेश

एक वीट श्रमाची एक वीट कष्टाची रचली
एक वीट आई-बाबांच्या आशिर्वादे जोडली

एक वीट भाऊ बहीणींच्या प्रेमाने भिजली
सहकाराचा कळस चढवून सज्ज हवेली

संतोषा कवतूक तुझे धन्य हवेली निधान
लाभो गृहसौख्य तुम्हा प्रार्थी कविवर हेमन

..............हेमंतराम पाटील.

No comments:

Post a Comment