Thursday, 29 December 2016

बेनंबरी अधिकारी

✍बेनंबरी अधिकारी
अधिकारी अटे घेति हातवटी
जेलबंद जाला तर गाठी नानावटी
नोटाबंदीया यांना आदिस सुगावा
काळापैशाहा गुंता कहाक सुटावा

मोक्याया जमिनी लाटुनिया स्वस्तात
करोडोंस्या मालमत्ता घातल्या घशात
वाह सांडाळांनो काय कमी तुमा पडले
तवा भ्रष्टासार  करुन गुमान राहिले

तुमस्यात अहतिल कोणी ईमानदार वा
परि उडदामाजि गोरा काय निवडावा
घाला धाडी सोकावल्या बोक्यांवरी नमोनमा
कोट्यावधी दौलती होऊद्या सरकारजमा

.............कविवर.

आरोग्य जुन्या न नव्या पीढीयं

✍  आरोग्य जुन्या न नव्या पीढीयं

पालघर जिल्ह्यात बहुतेक सोपाक्ष गावं वहतात.बीज्यासमाजाहे पण लोक हंगतिला जुन्यापीढीसोबत नांदत आले.पण वाडवळी पीढी मात्र आरोग्य पाहणीत नंबर ए-1 ठरली.
धंद्याप्रमाणे मांगेलवाडीत मावर्या वास.समारा घरा सामड्या वास.भंडारवाड्यात आंबुस हूर.
बामणाही घर विरळ किंवा दुर्मिळ.

वाडवळ मात्र पीढीजात हरीतक्रांति करत निसर्गानुसार वागला व आरोग्यसंपन्न जाला.कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी.या कर्मवादामुळे
तो ईश्वर जुन्यापीढीवर जाला राजी.
आट्यापाट्या हुतूतू लगोरीगोट्या इ. खेळ खेळून जुनी पीढी बाहुबली ठरली.कधीकाळी आजार उद्भवला तर आजीबाईहा बटवा कामाला येई.
एकत्र कुटुंबपद्धतीमुळे मनावर सुसंस्कार घडत.निकोप निरामय आरोग्य लाभे.ताटात पडेल ते अन्न हे पूर्णबर्म मानुन खाव्याह.भगुन ते अंगी लागत होत.

     आता काळ बदलला.उद्योग नोकरी कामधंद्यापायी बाबू शहरात आला.शहरवासी जाला.विभक्त कुटुंब पद्धति आली.ओबाय हावुहहर्याला बजावुन रेली,हातपाय मोडा न खा.
आमावर तुमसा भार नको.बलाक सिस्टम मध्ये नव्या पीढीय जीवन कोंदाटलं.बाईबुआ चाकरमानी बाळा
पाळणाघरी जोजोरे.आरोग्याही विपरित हानि.हगल्या मुतल्या डाक्टरसि पायरी आरोग्य कायपण सुधरेना.

खाणंपिणं घराबाहेर.चायनिज गांडुळ
चविने खाती.हाटेलस खाणं मसणात जाणं.आतडी कमाजोर करणारं कोल्ड ड्रिंक ढोसति. ओल्यापार्ट्यांनाही ऊत भारी.
कहकाय लाभेल आरोग्य नव्या पीढीला.शाळा हुटल्यार कलासला धावा.खेळ खेळाया आवसर नय मैदान नय न परमिशन बी नय.
हत्तिश्या आरोग्याही ऐशी तैशी.

..........हेमन  वरोरियन.

आरोग्य जुन्या न नव्या पीढीयं

✍ आरोग्य जुन्या व नव्या पीढीयं
जुन्या पीढीया आरोग्यासा मिरवावा तोरा
नव्या पीढीया गोलमटोल पोटाया वाढला ढेरा
जुपन्या पीढीला माहित नव्हता मँगी पिझाबर्गर
नव्यापीढीया ओढा चायनीजखाद्य शीतपेयांवर

हिरव्या हिवारात घाम गाळुन जुनीपीढी पीळदार
कांदा भाकर खाऊन देव्याहे समाधानी ढेकर
नव्यापीढीने पोटाहाटी होडले नीज घरदार
रोजगार मिळवुन नवीपीढि शहरात स्थिरस्थावर

सुविधा जरि कमी तरि शुद्ध हवापाणी दहीलोणी
जुन्या पीढीने जपला आयुर्वेद मुखी संतवाणी
नव्यापीढीह बुड गाडीखेरिज हाले नय
प्रदुषण धावपळ जीणं जीवघेण जालय

जुनी  पीढी होती खरसं आरोग्यसंपन्न
वयानं नय पण थकली नव्यापीढीया चिंतेन.

.........एच आर कविवर.

Tuesday, 29 November 2016

आयसीआयसीआयडायरेक्ट

आयसीआयसीआयडायरेक्ट
आयसीआयसीआयडायरेक्ट एल आय सी झूट
जाहिरात करणारा अंबासिडर लंबूजी सुप्पर नट
घण्यालोकाना भुरळ पडली केली गुंतवणुक थेट
खिसा भरुन लोकां फसवुन गायब जाला एजंट

म्हणे यांसे तज्ञ भारी जाणती शेअरमार्केट रेट
अति शाण्या बैल रिकामा लावली पुरी वाट
बुडाले कैक दुखाखातर घेऊन वारुणीये घोट
कैक बिसारे झटका येऊन गाठला महणघाट

भूमीपुत्रा उध्वस्त करणारे ये काँग्रेसी गवत
कटाई होऊ दे नमो  वाढुन रेलयं जे पीकात
लांडेगिरी करुन केले जयांनी काळेधन प्राप्त
नमोनमो मल्हारा कर तू त्यांसा पूरा निःपात

..........एच आर कविवर.

Monday, 28 November 2016

प्रथा मारल्या माथा

प्रथा मारिल्या माथा
दगडाला शेंदूर थापून केला बामणा देव
मूर्ख भाविकांस्या मनात निर्मिले तू भेव
दुधाहाटी कवडेक बाल अश्वत्थामे वंचित
दगडी देवाला दुधाभिषेक घण्या थाटात

नारळफोडून मधुर पाणी ओति देवामोरीत
गंगाजल म्हणून गटारपाणी घेतात पोटात
गाभार्यात दुधानारळ पाण्याहा कुबट वास
दर्शनरांगेतुन गाभार्यात येता गुदमरतो श्वास

तेला तुपाहे दिवे जाळती देवा काजोळती
गरिब बिसारेभाजीत तेलाया उंदीर मुतविती
घंटा नगारे बडविती रोज देव जाला बयरा
  नवस बोलुन रोग थोडा होणार हाय बरा

...........एच.आर.कविवर.

Friday, 25 November 2016

काळ धन काळ कर

काळ धन काळ कर.

काय हांगू काळ्या धनाही प्रथा न व्यथा
हाणला नमोंनी होटा नाठाळाया माथा

हजार पाचशेया नोटा कह्या वटवू हाटी
काळ्याधनिकाया हाती आली कराटी

अटे आड तटे बावडी डुबले डायाभाय
नमोनमो वाट लावली करती हायहाय

गोणपटा घालून नोटा लावू काय आग
दे माय धरणी ठाय चोहीकडे भागाभाग

जकलं जग करी योद्धा संन्याशाया गजर
देशाहाटी जनता तयार कराया सहकार

ध्यानी धरा जनता आता जागी जाली हाय
बस जालं काळ्याधना जीणं हायफाय.

..........एच आर कविवर.

निरोप सरत्या वहराला

निरोप सरत्या वहराला
सरत्या वहराला निरोप ई गोर्यालोकांही प्रथा
गोरे गेले पण प्रथा पसरली ई खरोखर व्यथा
एकतीस डिसेंबरला खपेल वहर वीसशेसोळा
विसशे सतरा स्वागताला होतिल मैतर गोळा

सरत्या वहरा दुःख भारी सुरापान रात्र सारी
नव्यावहरायी सूर्यकिरणे गुदगुदति ढुंगाणावरी
सूर्य यांस्या स्वागताला हे खरे बा सूर्यवंशी
नूतन वहरसुस्वागतम् सौजन्याही ऐशीतैशी

उगवता सूर्य बिसार्यानी कवा पावलास नय
तो दिहेपर्यंत विक्रम आपला हट्ट होडणार नय
वेताळ बिसारा दरवहरा हांगुन कंटाळुनगेलाय
पेगाया नव्या विक्रमात तळीराम भानावर नय.

..........एच आर कविवर.

Wednesday, 23 November 2016

शकुन-अपशकुन माजर आडवी गेली हमोरसन विधवा आली बाहेर कामाहाटी निघालेली वल्ली मागे फिरली कारण अपशकुन जाला ,यातुन काय साधल आजस उद्यावर ढकललं होणार काम खोळंबल मध्यरातिला घुबडाया चित्कार जीवाला घोर तोस घुबाडाया चित्कार गोर्या सायबाला शुभंकर बर्ममुहुर्ताला जर का एखाद कुत्र रडव्या लागल मंग हमजा एखादजण जग होडून देवलोकी गेलं आता माजरीला रस्ता ओलांडव्या अधिकार नय का विधवेला जो नियम तोस विधुराला लागू नय का घुबडाला घाबरला भगुनस इंग्रजा गुलाम जाला का महाणू रडला न कुत्रा मेला अह कवा घडल नय का शकुन अपशकुनाया प्रथा महाणानस निरमिल्या यास्तव व्यथा पण माहणालास भोगव्या लागल्या भला लाभला जल्म माहणा बुद्धियं वरदान तुला प्रथा न व्यथा इतिहासजमा घडव उज्वल भविष्याला. ............एच. आर.कविवर.

लखमणगडी

लखमणगडी 
                           हगनकाटामोडी

" धपाक्  म् म् मेलो SSS " अही बोम्ब आयकू आली

अर् र् पाटलाह्या नारळवाडित घोठाळा गडबड जाली

अजाण पोर मी आवाजाया दिसेला धावत  हुटला

पावत ते नारळीह्या बुडाखाली कोणितरी महाणू पडला

अर् र् योss ते पाटलाहा गडी लखमण काकाहाय

आता ते पाव्व्याहाटी जमली घणिभोठी गर्दी तय

कोणि हांगते लखमण मेला कोणि बोल्ते हाफाफ् हाय

बाविवरसन धावतस आली तरणिताठी पाटलिणबाय

लखमणरsss  तुला केव कम्बख्ती कोणि ये हान्गटलोय

हेणगोठा होडुन सोरी करव्याहा धन्दा आन्गावर आलय

तकटी तूही सवतास तुन काडली गाळि कही देऊ बाय

लखमण जागसेजागी कळवळते कुल्यावर हाथ ठेवलय

उसलुन खाटल्यावर ठेवला अर् र् हगनकाटा मोडलय

लखमणस्या सोरी लक्षात आली पाटीलबाबा घणा शिडलय

दयामाया खपली हुसलला तहास नं  डाणूला काटेजात टाकला

एक तन्गड वरती काठि टेकित पास मैन्यान लख्मण लन्गडा आला

दिवाळीहा पाडवा घणालोक जमला सोर मी सोर मी घळघळा रडला

माफ कर पाटील बाबा कामावर ठेवा कय जाऊ आता दे आसरा माला

सोट्ट ढोर परवडल पण सोट्ट महाणू नोको माहा घरा तुस कर माफ आमाला

लखमण गेला हाथ हालवत पण नारळाहा माड कहा पेन्डिन भरला आहला
   
                   तात्या पाटील

                       🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

देवदेवस्की वबुवाबाजी

✍देवदेवस्की-बुवाबाजी प्रथा
       एक पिंडासे सात पिंड जालेरे
       कोंबड्यासा वाटा कोळ्या धांगड्याला
देव ते फुकासा मांडला रे देव ते फुकासा मांडिला.
                 अंगात वारं आणुन कोळ्याभगत घुमत ओथा.    लिंबायाडाळ्याओबायस्या पाठीवर हाणत ओथा.
देवदेवस्की  व भुत उतरव्या भगत ओथा.
पंचक्रोशीत त्याला मान ओथा.
यो रातीया खेळ पोरांनाव हिकवला ओथा.
याअघोरी विद्येवर संसार सालत ओथा.

    पण एकदिही कुंभोलीमहाराजनामक बुवा आवतरला.
हवेतुन आंगठी काडुन समत्कार केला
लोकांसा प्रवाह बुवाबाजीकडे आपसुक वळला
कोळ्याभगतानं ऊपासमारीन देह ठेवला
कोळ्याभगतायि ही शोकांतिक व्यथा
अन बुवाबाजीही फोफावली प्रथा.

.........हेमन वरोरीयन.

Tuesday, 22 November 2016

वाडवळ कट्टा

वाडवळ कट्टा
बहु अहोत मोबाईलवर कट्टे जरि महा
प्रिय आमुसा वाडवळी कट्टा धन्य हा !

कितिकांनी कैक अहे कट्टे सालविले
आला संदेश बिजा धाडुन मोकळे जाले
वाडवळ कट्टयाने परि स्वत्व राखले
मायबोली वाडवळीत साहित्य शोभले

वाडवळीस अच्छे दिन दावूया पुन्हा
प्रिय आमुसा वाडवळी कट्टा धन्य हा!

काव्यकथा विनोद लेख शब्दसंपदा
आदानप्रदान वाडवळीतुन धार संवादा
कदी स्पर्धा वाडवळीत आयोजिति तदा
लेखणी बरसते अनेकांसी अनेकदा

लिव्या ते वाडवळीतस नयते मुकाट बहा
प्रिय आमुसा वाडवळी कट्टा धन्य हा!

.........एच आर कविवर.

Monday, 21 November 2016

प्रथा न व्यथा

✍प्रथा न व्यथा
बैल वापी देव्याही होती सालत आली प्रथा
बदल्यात भात नागली घेव्याही ओथी प्रथा
बाबू बंगाल्यान वापी दिलतोवा बैल वारल्या
वापी भात घेव्याहाटी गेलता बाबू बंगाल्या

वारल्यादा बोलला मी जातोय एका मयताला
कणगीसन पाच मण हुसल भात-नागलीला
पडत्या फळायी आज्ञा बाबू लागला कामाला
धनाया हांडा लागला बाबूबंगाल्या हाताला

बाबूबंगाली हांड्यासह बैलगाडी हेपाटत आला
पाठोपाठ वारलीदादाव बाबुया दारी उबाठाकला
वारली वदला बाबू महा हंडा मला परत कर
बाबू उत्त्तरला हंडा बिंडा तुहा नय आता विहर

बिसारा वारली शिव्याशाप देत हायखाऊन मेला
वारल्या तळतळाट बाबुया खानदाना भोवला
बाबू रगत ओकून तडफडत तिरडीवरुन गेला
बाबुहा कुलदीपक दारुपीवून अकाली
सोनापुरी गेला
बाबुह्या पुतणीन  जमीनजुमला हडप केला

पुतणी पारुबायस्या संसाराहा विस्कोट जाला
प्रथेही जाली व्यथा हपाप्या माल गपापा जाला.

..........हेमन  वरोरियन.








मयताला

Sunday, 20 November 2016

प्रथा न व्यथा

✍प्रथा न व्यथा
क्षात्रैक्य परिषदेत अंतर्भूत अहलेला पाठारे समाज दहिसर ते अलिबागतक एकवटला हाय.दोन तीन वेळा मर्तुकीला गेलतो.तवा एक प्रथा पावुन तो समाज कवडा बुरसटलेला हाय या गोष्टी कल्पना आली.
        मुडदा  ईस्पितळासन आणेपर्यंत तिन तास गेले.लोकाना दिलेल्या वेळेप्रमाणे दहा पासुन ते खोळंबले होथे.तोपर्यंत धार्मिक विधिहाटी बामणायी खोवळाखोवळ जाली.भोट्या मुस्किलीन एक बामण पाच हजार बोलीवर तयार जाला.
दुपारी एक वाजता कफनात गुंडाळलेले कलेवर न मरतुकीया बामण कहेबहे एकत्रस पोसले.
मंग बामणानं दोन तासात विधि आटोपता घेतला.
    त्या प्रेताही अवदशा होऊन दुर्गंध हुटलवा.जमलेल्या लोकांपोटात कावळे कोकलतवे.एकदास प्रेत तिरडीवरुन स्मशानाकडे मार्गस्थ जाले तवा लोकांनही शार वाजता हुटका जाली.
खर म्हणजे बामणाला ढाळणी देऊन पाच हजार रुपये वासवता आलेते व लोकाया खोळंबा,प्रेतायी दुरावस्था या व्यथा टाळता आल्या अहत्या.
   आप मेला जग बुडाल मंग कयस्या व्यथा न कयस्या प्रथा.

..........हेमन वरोरियन.

Saturday, 19 November 2016

वाडावळी कट्टा

👌वाडवळी लेखांनी विराजला वाडवळ कट्टा अजि धन्य जाला
दिलीपदादा प्रथेवर हाणला टोला
कुमारबंधु वाडवळी A-1पाठशाला
रोशन वाडवळी मशाल ज्वाला
वाडवळ कटृटा ऊजळून दाविला
वाडवळीसा निनाद घुमला
अभिमाने वाडवळी अस्सल बोला
वाडवळी तरंग लाटेवर आला
सायलीसा वेल गंधित जाला
साहित्य विलास विलसित जाला
सुचिता धन्य लिवुन वाडवळी बोला
श्रीकांतराव वाडवळी पाया घातिला
सुहास राऊत वाडवळी देह पोसिला
जयप्रकाश चौकटीत दिहू लागला
तात्या वाडवळ वाडवळी भाला
बिपीन चारुशील भुषण कटृयाला
अलका विनोदे कट्टा भारिला
राजू-पविसा कटृटा वाडवळीमय जाला
बाकी जो कवी लेखक ऊरला
गौरविन तयांना पुडास्या चौकाला🍁🙏🏼.

...........एच आर कविवर.



वळी








वळीत

Friday, 18 November 2016

सोन्याहा मोबाईल

✍📱सोन्याहा मोबाईल
जेवणाखाण्याही आंघोळीही सुद नय रेली
कार्टी आजकाल मोबाईलमय बो जाली
आख्खादिही कानाला मोबाईल लावलाय
सोन्याहा मस्त टाईमपास साललाय

ओबाय हांगते थांबव मोबाईल खेळ
दे जरा आपल्या घराहाटी पण वेळ
सोन्या काय पण कोणस ऐकत नाय
त्यासा येळकोट अजिबात राहत नाय

कामधंदा होडुन सोन्या घरास बहलाय
मोबाईलने पुरता त्याला पागल केलाय
गुप्तगू करव्याहाटी सोन्या संडासात बहला
मोबाईल सोन्याहा कमोडमन पडला

मोबाईल बिगडला पण सोन्या सुधारला
वाया गेलेला परत थार्यावर आला
भला लाभला जलम वाडवळ बाळा
कोणत्याव गोष्टीया अतिरेक सदा टाळा.

...........एच आर कविवर.

झिण्याबाबाया वाडा

✍झिण्याबाबाहा वाडा
झिण्याबाबाहा वाडा होता खेळाया आखाडा
सांचेपारा पोरं करिती खेळ खेळुनि राडा
वाड्यालगत रस्त्यावरति पेटायाची होळी
धमाल चाले नाचगाण्याची होळीगीतं वाडवळी

होळीआधी महिनाभर खेळति हुतुतु आट्यापाट्या
होळी पेटता चविने खाव्या चवळी ऊसळ वाट्या
वार्ता कराव्या मोठ्यामोठ्या जरि खोट्यानाट्या
झिण्याबाबाहा वाडा ओस आता खेळति भाट्या

..........एच्.आर्.कविवर.

भेंडीवीण भाट

🌶🌽🍆 भेंडीविण भाट
भेंडीविणा ऊजाड पडलयं भाट वरोरी
अटेस राबला होता रामबाबा मळेकरी
संसार सालत होता  भेंडीगवार पिकावरी
रमाई कष्ट फळले नांदले सौख्य घरी
भेंडी आमसी पाचधारी भाजींही राणी
बो सरस रसदार आमटीला सव घणी
आरोग्यासी ऐसितैसि भेंडी हाय औषधी
भेंडीरस मधुमेह्यांनो घ्या न्याहरी आधी

...........एच.आर. कविवर.

हकाळसी पोळी

हकाळसि पोळी
हकाळ हकाळ लिवतोय शार ओळी
वाडवळ कटृयावर भाजतोय पोळी
भींतीवर पावा हार न मानणारा कोळी
हकाळ हकाळ लिवतोय शार ओळी

जवान झेलतो सरहद्दिवर बंदुकीगोळी
वेदनेत व्याकुळतो तो माहणू वाडवळी
राजकारण्या मोरस्यातअहते नवी खेळी
हकाळ हकाळ लिवतोय शार ओळी

रमो गुर्जरभाय लखलाभ दहरादिवाळी
रमलूभगताही सदाकदा जिवायी होळी
फरक नाय काय वाडवळ जाला जरि माळी
हकाळ हकाळ लिवतोय शार ओळी

.........एच.आर. कविवर.

झोळ्या बदला

✍ झोळ्या बदला
आयबाबानं आमाहाटी काय नय केल
अहे कार्टा -कार्टीये आयकटले बोल
गणोबा जाला रागानं तांबडा लाल
बेंडिखल्यांना काय करव्या बाकी रेलं

यांना एट मेट गोट हिकवल सुकल कारं
बगा कसरावेसणारी पोरं रस्त्यावरं
आवडस जर काय नहेन केल तुमाला
तर आपसात एकमेकाया झोळ्या बदला.

आजकाल एकदुहर भगुन ओथात लाड
पण त्याही या लाडल्यांना रेली नय साड
मागसी पीढी काम करते मोडुन अपुले हाड
पुडसी पीढी मात्र दावते नड गाते रड

..........एच आर कविवर.

दीवाळी

🎆दीवाळी
तहोळी रवोळी चकली कडबोळी
आकाशकंदिल दिव्यांसी दीवाळी
ऊजळत आली फटाकडी दीवाळी
तोरण दारी ओटी सजली रांगोळी

मग कंपन्यांहा बोनस बो खुळखुळला
सुतळीबाम डामरीफटाका फटफटला
एक फटाका हरीया उडव्यात घुसला
पेटक्याफटाक्यानं भाताय उडाव पेटलं

बिज्या दीवाळीत आत्म्याह घर पेटलं
गाववाल्यांहीन निधीकाडुन उभारलं
तिहर्या दीवाळीला वाळणीह लुगड राख
मंग दीवाळीला फक्त देती शुभेच्छा लाख

शाणे व्हा नका करु ध्वनिवायु प्रदुषण
शाळेत गुरुजी हांगे राखा पर्यावरण
आली दीवाळी सावधान माणसा तरि
दीप ऊजळून ठेवि सद्भावना अंतरि

..........हेमन  वरोरियन.

फायनल दीवाळी

🎆फायनल दीवाळी
सातवीला केंद्राही फायनल परीक्षा अहे
फायनल पास जाल्यावर हायस्कुलला जाव्याहे
हांगव्याहे कारण की मी होतो फायनल्ला
तवापासुन मीन बहिस्कृत मायापुरता केलं दीवाळीला

त्यालाव कारण हेजारसा बिनफायनल जगुदादास
त्याला पांढरेसुब्र इस्त्री कपडे घालव्या घणा सोस
कपडे ईस्त्रीहाटी सिसणपर्यंत मायी तंगडतोड
मोबदला झिरो न जग्गू हिरो त्याला नय तोड

मंग फायनलस्या वहरा आक्रित घडुन आलं
ऐन दिवाळीत जग्गूनं मला लांड्रीत धाडलं
एक पेटता फटाका आंगलट आला गाठोड पेटलं
वचपा म्हणून जग्गून हुकतघातलेल लुगड जाळलं

करुनसरुन जग्गून मायावरस बालंट आणलं
दीवाळीहे धम्मक लाडू पाठीवर धपाटलं
अह एकंदरीत फायनल ठरली माही दिवाळी
रवोळी तहोळी गेली जिवायी जाली होळी.

.........हेमन वरोरियन.

भाताया पागोडा

👌भाताया पागोडा
अमदा दीवाळी मामाला पावली
वाड्यात भातायी उडवी रसली
बुद्धापागोड्यागत जही उभारली
मामाही मेहनत देवाला भावली

नारळी पोफळी खांब भोवताली
पागोडी उडवी वाड्यात हजली
पिवळ्याधमक होन्यानं भरली
मामाही मेहनत देवाला भावली

वाड्यात खळ्यात घेतील  झोडणी
बैल पातीला जुंपुन होईल मळणी
हेतातल्या होन्यानं कणगी भरली
मामाही मेहनत देवाला भावली

मामाय हेत बगा नवसाला पावलं
कुबेराय धन त्यास्या हेतात गावलं
अमदा दीवाळी मामाला पावली
मामाही मेहनत देवाला भावली

...........हेमन  वरोरियन.

रली

मनाहे श्लोक

✍  मनाहे श्लोक
मना हेमना वाडवळ कटृटा भारी
लिवा वाडवळी मनाला ऊभारी
भेटल्या वाडवळाशी वाडवळी बोला
वाडवळीत द्यावा टोल्यास टोला

जरि का हांगति संतती वाडवळाही
वाडवळी नाद घुमवा दशदिशा दाही
गावठी बाबु गणि सायेब सवताला
वाडवळीत द्यावा टोल्यास टोला

वाडवळीहा दुःस्वास कटृयाला भार
खोगिरभरति कटृयास हानि थोर
तरि कटाक्षे जपा माय वाडवळीला
वाडवळीत द्यावा टोल्यास टोला

सदा वाडवळीसा मनी ध्यास घ्यावा
वाडवळी रोपटे सब्बनाठायी लावा
महालक्षमी मायसा आशिष सकला
वाडवळीत द्यावा टोल्यास टोला

............हेमन  वरोरियन.

ला

गराण

गराण
खंबाय माय बंगला बांधलाय
रेव्याला कोणी तैयार नाय
जो तो शहराला मुक्काम ठोकतोय
गावात घर बग सुनसान हाय

वरोरशी दैना हांगु तरि काय भाय
घर हात पण माहणांसा पत्तास नाय
काही गावांत गोकुळ नांदतेय
काही गावाना बरखत नाय

हौसेखातर गावि बांधला बंगला
शहरात रमला कुटुंब कबिला
यो बिसारा एकटास वीकएंडला गेला
साफसफाई करण्यात कणा मोडला

आता मुंबाभाय केली पासष्टी पार
आधार नय रेला जिवाला घोर
शेवटी दोन वार कफन सरणावर
जकली दौलत रेणार बठ्ठी जागेवर

भगुन हांगत आपला वाडवळ कटृटा
आधार जकल्या वाडवळा बो भोटृटा
आपली सवताही घर अहोत नहोत
आपल्याला बेघर नाय कटृयाह नातं

..........हेमन .वरोरियन.

विष्णुजी सावरा

✍ विष्णुजी तुमीस सावरा

कालस खंबायमातेया दर्शाना वरोरा गेलो
सरकारी दुजाभाव पावून हबकुन गेलो
मारोडा ते मांगेलवाडा सिमेंटरोड जाला
वाडवळांना कच्चारस्ता यो दुजाभाव क्याला

विद्यमान आमदारांही जुनीघरं त्या रस्त्याला
पण विरोधी अहल्यानं राग तुमा आला
पालकमंत्री सावरा क्रोधा आवर जरा घाला
बाहुजनांनी निवडुन दिले अवड्यात विसरला

विष्णुजी नाव तुमसे जगतोद्धारा पुराणकाळा
खंबायमाय लक्षिमीरुप ठावं कळीकाळा
सिमेंटीकरण करा तुमी खंबायस्या देवळापर्यंत
देवी खंबाय तुमस्या डोईवर ठेविल हात

...........हेमन वरोरियन.🍁🙏🏼

कावकाव

अरे जिवंतपणी जल्मदात्यांनी भोगल्या व्यथा
मंग आप मेला जग बुडलं सुलीत घाला प्रथा
कोणसि परस्थिती अहते नहते तरिपण
समासिक वर्षश्राद्धाला द्या गावंजेवणं

काय हांगू लोका तुमा प्रथा नि व्यथा
जाल्या अर्थहिन कालबाह्य या प्रथा
अरे बामणा जर तुहा मंत्राया हाय बो जोर
जमिनिवरसा गोग्रास ने पाव घराया छतावर
जर का ये शक्य नय बामणा तुला
छतावरसा नैवेद्य कहा पोसेन स्वर्गाला

..........हेमन  वरोरियन.

काव काsव

✍  काव काsव
महाणू सरणावर जातो होडुन संसारडाव
मंग प्रथेनुसार ऊरकतात अकरावं बारावं
कावळ्याला भोट्यामायेनं वारतात कावकाsव
कावळा न लोकांनी खाऊनपिऊन घ्याव नावं

वाहरे वा! काय मस्त प्रथा आप्पलपोटी
जेत्या आठी न मेल्या खजूर वाटी
अरेरे  होकरान ओ मटण खातात
आयबाबांना जितेपणी पानं पुहतात

बरी हायरं तुमसी प्रथा प्रायश्चित्त करव्याही
मेलेल्या नावानं खाऊनपिऊन श्राद्ध आटोपव्याही
अरे जिवंतपणी जल्मदात्या

रिअल ईस्टेट

✍रिअल ईस्टेट
आता रिअल ईस्टेटवर नमो हातोडा मारणार
मंग हिरानंदा काय कटोरी घेऊन फिरणार
मिरारोड मावळतिला उभारला स्कायक्रिपर
वीस वहर जाली गंजून गेला आरपार

अहे बो हिरानंदा बिल्डिंगा बांधुन घायकुति आले
कैक गुंतवणुकदार वाटबगुन मेटाकुटी आले
स्वप्ननगरी ऊभारण्यासे कोणी सपन दाखवीले
अनेक दिवाणं दीन होऊन दिवाने जाले

तरिपण सिमेंट जंगले चौफेर वाढून रेली
कुतर्याहत्रीगत बेहिसाबी रिअलईस्टेट फोफावली
अति तयला माती म्हण ही कदापि विहरु नका
गरजुंना करारानुसार घरताबा साधा मोका.

.........हेमन  वरोरियन.

काळ्यापैशाये मानकरी

✍ काळ्या पैशाये मानकरी

मंत्री संत्री भ्रष्ट अधिकारी तहेस वेपारी
तुमी गुन्हेगार काळ्यापैशाये मानकरी
दडविल्या तुमी  नोटा पाचशे न हजारी
नमोंनी रद्द करुन नोटा केले तुमा भिकारी
लाजतुम्हा जर का तर सरकारी भरा तिजोरी
यापुढति तुमी घेतील नक्कीस खबरदारी
बेंडिखल्या बक्कळ धन काय नेणार सरणावरी
येशी ऊघडा जाशी ऊघडा क्याला धरी हाव
सोरावर मोर होऊन कोणी ऊलटवेल डाव
खाबुगीरी वाईट प्रथा ऊलथून टाका
शाण्याला शब्द पुरा नाठाळा ठोका
.
............हेमन वरोरीयन.

लुटारु

✍ लुटारू
गझनिया महमदा तू घणा सोर लुटेरा
सतरा स्वार्या करुन लुटे सोमनाथमंदिरा
देवळाये बामणपुजारी बगतस रेले
देवाहे जकले दागदागिने गझनी नेले

दगडाहे देव माहणानस तय्यार केले
भोटीभोटी भव्य देऊळे ऊभारली
बिसारा दगडीदेव रक्षा करु शकला नय
मोमद घोरीला काही अडवू शकला नय

मंदिरात गंगाजळी ओघ सुवर्ण पैशाया
बडवे गुरवांस्या बो फुकटस्या कमाया
परकियांनी लुटले निदान करुन लढाया
देवळातिल कारभारी जमविती माया

दोननंबरी पैसा वाहुन विकत घेति पुण्य
ऐशा धनाड्यांपुढति खरेभक्त नगण्य
भक्तीसा भरलाय बाजार रखुमादेविवरु
देवाया नावाने लुटति लोका हे सभ्य लुटारु

.........एच आर कविवर.

सरकारी आनास्था

✍सरकारी अनास्था
अकोला सरकारीगोदामात दुर्गंधी हुटली
शेकडो टन जवार पोती किडुन सडली
लाज शरम नावायि चीज अधिकार्यां नुरली
दरिद्री नारायण जनता भाकरीस मुकली

हेतकर्यांसे धान्य गोदामी भुगा होऊन किडले
सरकारी खात्यातील कीड हे कारण ठरले
अहीस सरकारी अनास्था जर टीकुन रेली
तर आपली लोकशाही पण पावाल सडलेली

ऊत आलाय सौदेबाजीला कवडीमोल शेतीमाल
अडते वेपारी लुटारु बनविति किसानास कंगाल
सरकारी गोदामे सडली रेशनझोळी खाली
दरिद्री सुदाम्याला नुरला नारायण वाली

............एच. आर. कविवर.