गरज
गरज हाय सब्बन शोधाई जगत जननी
माहणू गेला पंख लावुनअवकाशी गगनी
गरजभागव्याहाटी माहणू रोज धडपडते
गरजेतून ज्ञान विज्ञानाहे शोधकार्य सालते
गरज एक ठीक पण गरजा नको अनेक
गरजा वाढल्या की मागव्या लागते भीक
गरजा कवास भागत नय गरजू भागुन जातो
दमुन भागुन निराशा शेवटी गरजू जीव देतो
अरे भैताडा अवड्या गरजा वाढल्यास क्यव
नय ते रंग ढंग ऊधळपट्टी तीन पत्या खेळेडाव
पोरांस लेंढार मोप त्यात व्यसनं करतो खूप
मग माहणायं ओथे वांदर माकडा माकडा हुप
आधीस मर्कट त्यातस राजरोज करीनशापान
नोकरीवर गदा आली रंगेहात लाच पकडल्यानं
गेली बायको वैतागुन माहेरी पोटृटी पोटृयां घेऊन
रोटी गरजेपोटी तळीराम हिंडे आता कटोरा घेवून
............पी. हेमंत्राम कविवर.
No comments:
Post a Comment