Sunday, 30 April 2017

बायबोली पोवाडा

बायबोली पोवाडा
कवड्याक जाल्या बोली जगतात
कवड्याक हात कवड्याक होतिल भविष्यात
परि बिनजोड वाडवळी बायबोली त्यात
वाढवू तिला बोलून संवाद नि लिखाणात
बायबोलीया जयजयकार जो जो होणार
कविवर शाहिरी कवन करणार आणि गाणार
  ॐ भगवती स्फूर्ती दे नमन करी कविवर जी जी जी ll

ही बायबोली घणी रसाळ शब्दरत्नाही खाण
नय म्हणी ऊखाणे लगिन गीताही मुळी वाण
नका कमी लेखू तिला दुहरी माय ठेवा जाण
वदनी लेखनी गिरविण्या घ्या सतीय वाण
या बायबोलीया लढ्यात जे सहभागी होणार
बायबोलीहे खरे भक्त वळख त्यांसी ठरणार
ॐ भगवती स्फूर्ती दे नमन करी कविवर जी जी जी ll

ज्ञानेश्वरी पारायणी बायबोली कैक शब्दसुमनावली
भरभरुन वेच करी थिटी न पडो पामर कविअंजली
इवलेसे रोपं ज्ञानप्रभू लाविली गगनांतरी तरुवेल गेली
तैसाचि वाडवळी वेलु जाईल ब्रम्हांडी धन्य बायबोली
असाध्य ते साध्य करता सायास या पावन ज्ञानभूवर
नवोदितांनो मदार तुम्हावर करा बायबोलीहा उद्धार
ॐ भगवती स्फूर्ती दे नमन करी कविवर जी जी जी ll

.......कविवर हेमंतराम पाटील.

Friday, 28 April 2017

दक्षिणोत्तर

दक्षिणोत्तर

जंगली बय घण्यास गाळी मारव्या लागली
मोगली दादाला बेंडल्या रोजशी कटकट जाली
मंग मोगलीदादानं रान्नीहा ओटा केला दक्षिणेला
एका सलग ओट्याहा दक्षिणोत्तर छेद जाला

जंगलीबय तरि जोरात भुंकत हांगत फिरली
मोगली दक्षिणमुखी बग त्याही वाट लावली
प्रत्यक्षात मोगलीहे पुत्रपौत्र भणले भोटे जाले
जंगलीबयसे उत्तरमुखी गोत जंगलीस रेले

कावळीणी शापान ढोर मरत नय हे सत्य हाय
कवाकवा कावळा बहते फांदी तुटते हेही खर हाय
आता दोन विरुद्ध तोंडी घराह नामोनिशाण नय
कोण हरलं कोण जिकलं पाव्या बय जित्ती नय

मोगलीय जंगली बयमुळे वेगळालं गोत भणलं
जंगलीबय गोत वणवणत घुमते अजून जंगल
दक्षिणेला घरमुख नको म्हणे मूर्खांसा बाजार
जोशी पोटाहाटी ठरवितो दरवाजा दक्षिणोत्तर

...........पी.हेमंतराम कविवर.

फुका रगतजाळ

फुका रगत जाळी

देहाची ती हाडे जाली जकली खिळखिळी
साठी पार जाली लागली पाठी दवागोळी
ऊजाड पडली पूर्वी भरलेली नांदति आळी
घराहाटी क्याला बंदवा फुका रगत जाळी

नाय उरली पोराबाळा ओढ गावा मुळी
शहराटलेल्या नवपीढीही खुलेना कळी
बागा अटे करपल्या रिकामी वनमाळी
घराहाटी क्याला बंदवा फुका रगत जाळी

हौसेखातर गावी ज्यांनी बंगल्या बांधल्या
मालकाही वाट बघून त्या रयाहीन जाल्या
ऊभारणे पासष्टीत अवघड घरकुल चौमोळी
घराहाटी क्याला बंदवा फुका रगत जाळी

उतारवयात व्यर्थ ऊधळू नको बा गंगाजळी
नटसम्राट आप्पागत पोता आणू नको पाळी
घर घर करता अग्नि सरणावर अवचित जाळी
घराहाटी क्याला बंदवा फुका रगतजाळी

..........पी. हेमंतराम कविवर.

Tuesday, 25 April 2017

कोल्हापुरी रस्साळ

कोल्हापुरी रस्साळ

अरे रस्स्यामधि रस्सा कोल्हापुरी लय चांगला
पहा पांढरा तांबडा रस्सा खवैयाला खिलविला
  कोल्हापुरी सागुतीसंगे कोंबडीवडा ताटी आला
मटण लोणचे जोड शीस्तीत तुंबडीभर ओरपला

असा जेवणाचा बेत कोल्हापुरी पाहुणचार
चारफडी चपाती खाता येई पोटभर ढेकर
धारोष्ण दूध ताजेशुद्ध प्यावे पंचगंगा कटृयावर
अमृतमय काकवी प्यावी ऊसमळा गुर्हाळावर

शुद्ध मोकळी हवा खावी पन्हाळ गड चढोनिया
भोळाभाव प्रगटावा जोतिबाला डोंगरी भेटोनिया
भावभक्तीने अंबाईदर्शन भवसागरी ताराया
करवीर नगरी हेमन धावे घ्याया पुनः प्रत्यया

..........पी. हेमंतराम कवीवर.दहिसर मुंबई.

रमलू भगत

रमलू  भगत
रमलू भगत खाव्याही ददात
कांडूया अड्डयावर हजेरी नियमित
मावर्या बाजारात दिहते घण्यावखत
हेपूटबगडी फुकटात गोळा करत
कोंबडीतंगडी न आतडी जमवत
मीठीनदीकाठी कालवण रटाटतं

गटारगंगेवर कांडूदादा लावतो भटृटी
कांडूया अडृयावर रमलूभगताही दाटी
अहे कवडेक रमलू भगत खानदानी पेवटे
गावठी खोपडी पेऊन झिंगतात दिवटे
पडतात गटाराबाजुला गटारभगत
दारु पिऊन पिऊन ओकतात रगत
देवा अहेनस जर का तू अस्तित्वात
पेताडांना नेवू नको गर्तेत.

........पी. हेमंतराम.

Saturday, 22 April 2017

नकोस कुठार्या

नकोस कुठार्या
नकोस कुठार्या वृक्षी घाव घालू
वृक्षावीण जीणं वैराट सैराट

तोडुनि जंगल झाड बुडलोट
घनदाट रान केले वाळवंट
कुराडीहा दांडा नीज गोता काळ
अरण्य रूदन जगी तळपट
नकोस कुठार्या ............

डोंगर बोडके टकले टकूर
माणसा मसाण तरु काटछाट
धरणी जननी तिज विटंबोनि
कशी उगवेल हिरवी पहाट
नकीस कुठार्या .........

माणसा काहून अक्कल गहाण
खोदून कबर लावतोस वाट
भावी पीढीहाटी काय निर्मिलेस
उजाड करून हिरवे घाट
नकोस कुठार्या ........

लावोनिया झाडे हिरवाई होवो
वृक्षा जोपासून साय घनदाट
मित्रवर आम्हा वृक्ष डेरेदार
जगणे तयांचे वरदान भेट
नकोस कुठार्या ..........

.......हेमंतराम पाटील.दहिसर मुंबई.

Thursday, 20 April 2017

ब्लफमास्टर

ब्लफमास्टर

मँट्रीकला ब्लफमास्टर सिनुमा पावला
तवापासून बंदा मारी एकसे एक बढाईला
होता एक हिंड्या बंदा  नवता कामधंदा
बेलिफगिरीत उमजला थोडाबहुत कायदा
लोकां मारी गमजा मी हाय बार अँटला
जवा भेटे ज्याला त्याला बंदा मारी बढाईला

बंदा वदे लंडनस्या विमानासन डेवलो
जपानस उड्डाण पण बुक करुन आलो
उद्या या कोर्टात तर परवा त्या कोर्टात
मांजरीगत उसाट बंदा फिरतो घरं सात
बंदा हुन्नर घुमतो भिंगरीलावून  पायाला
जवा भेटे ज्याला त्याला बंदा मारी बढाईला

बंदाही आय बिसारी बांधावरती घसरली
यानं कवा तिही साधी विसारपूस नय केली
याहे विमान सदा न कदाआसमानी उडालेले
मायस्या हयातीत धरतीवर कवास नय उतरले
मँट्रीकला ब्लफमास्टर सिनुमा मनावरी ठसला
जवा भेटे ज्याला त्याला बंदा मारी बढाईला.

.........पी. हेमंतराम कविवर.

Monday, 17 April 2017

अरण्यरूदन

अरण्य रूदन

वृक्षावीण जीणं जगति रुक्ष वैराण वैराण
नकोस कुठार्या वृक्षी घाव घालू दाणादाण
जंगल तोड बो अफाट  झाडं केली बुडलोट
घनदाट हिरवे रान झाले सपाट तप्त वाळवंट
कुर्हाडीचा दांडा नीज गोतास काळ झाला
अरण्यरूदनाचा आक्रोश भिडो काळजाला

डोंगर टेकडी माथे बोडके टकले टकुरे टकूर
केले माणसा मसाण तोडोनिया ऊंच तरुवरं
धरणी ही मायअपुली पुरती केली तू विटंबना
बरसावी बरसात म्हणून करी धोंडी आराधना
निसर्गदेवाला काटून छाटून ओकाबोका केला
अरण्यरूदनाचा आक्रोश भिडो काळजाला

का रे माणसा काहून अक्कल गहाण ठेली
स्वहस्ते भावी पीढी गाडण्या तू कबर खोदली
हरितक्रांति अखिलजगति व्हावी वृक्ष संवर्धून
करा परिमार्जन झाडं लावून जंगल जोपासून
वृक्षवल्ली आम्हा सोयरे तुका सांगोनिया गेला
अरण्यरूदनाचा आक्रोश भिडो काळजाला
 
अरे माणसा माणसा जप तू वृक्षमित्र बाणा
वन्यजीवांही लाभू दे आसरा नि वैरणदाणा
सर्व काही तुजसाठी पैदा करत नाय सर्वेश्वर
सत्ताहीन स्वदेह तुझा उघडा जाशी सरणावर.
खयभंग होण्याआधी सावरं मानवा स्वतःला
अरण्यरूदनाचा आक्रोश भिडो तव काळजाला

.........पी. हेमंतराम पाटील.दहिसर -मुंबई
भ्र.ध्व.-9757340310.

Saturday, 15 April 2017

शीतल जलसमाधी

शीतल जलसमाधी

किसान कन्या विशीत जलसमाधी शीतल
हुंड्याचा रिकामी हंडा बाप झाला हवालदील
पाच लाख  हुंडावळ लग्नाचा सौदा  बाजार
हुंड्याची कुठार घाली सपासप घाव तरुवर
दुष्काळी अवकळा आली कुत्राही पुसेना हाल
हुंड्याचा रिकामी हंडा बाप झाला हवालदील

बँकेचे कर्ज डोईवर मेटाकुटी किसान खिन्न
कन्यारत्न ऊजवेना हुंड्याबिगर बोहलासुन्न
बापदुःखात डुंबे कन्या निघाली देवाजीघरा
थिटी पडली पुरोगामी सुधारकी विचारधारा
रुढी प्रथा परंपरा कैक अद्यापि क्रूर जहाल
हुंड्याचा रिकामी हंडा बाप झाला हवालदील

अरे मर्दा  हुंडाजोगवा मागणे कदा बरे नव्हे
बायको पोसणे शक्यनसता लग्न करणे खरे नव्हे
फुकाफुकी लेकींचा जर वायाळ रुपे अंत होईल
परिणिता वधूविण वंशदिवा मंदावून विझेल
प्रथा रुढी अमंगल बिगरहुंडा होवो शुभमंगल
हुंड्याचा रिकामी हंडा बाप झाला हवालदील

........हेमंतराम पाटील. दहिसर -मुंबई.
भ्र.ध्व. 9757340310

Thursday, 13 April 2017

लिवती लेखणी

✍हिपी हिपी दूध पीत भोट्टे व्हावे
कण कण हिकून विद्या विद्वान व्हावे
एकेक महाणू जोडत देवमहाणू व्हावे
दिहामाजि हुरुमभर दंडासनस्थ व्हावे

वरी बो बरा अंतरी माणूसघाणा
तयासि हंगत नको देवराणा
अनुभव भोट्टा गुरु हिकवी शाणपणा
हेराम मंत्र जप तू वाडवळी माहणा

टोकणारा टीकाकार घणा बरवा
फुका भोट्टा हांगे तुम्हा म्हणे वा वा
धुमकेतु तो उगवी नभांगणी कवाकवा
पोपटपंची करणारा हमजा मौनीरावा

..लिवती लेखणी.✍