Saturday, 13 April 2019

मायाबाजार

मायाबाजार

जकला दुनियाभर स्वार्थाया बाजार
जडलायं माहणाला कलियुगी आजार
बेगडी बुरखा पांघरून हिंडे नारायण
दुहर्याला लावत हेंड्या जगतोय जीणं

लखलख लालदिव्या गाडीतून फिरतोय
जनधन सब्बन आपकमाई हमजतोयं
भाजतोय पोळी  तापल्या  तव्यावर
जनतेया  तिजोरीवर नेताजीही नजर

भरोसा ठेव्यागत हाय काय व्यवहार
दिहे नय साफसुथरा उजळ कारभार
तूर्तास तरि घणी लांडी लबाडी पाही
तुहं ते माहं अन माहं ते कमाई बापाही

क्यालारं  कोणसी हालहवाल विसारते
एकपुतीव रडते न सातपुती पण रडते
लेकुरं उदंड मोप, मातला सैतान भारी
गोड गोड बोलून गळा कापतो पुढारी

झाकली मूठ सव्वालाखाई घरोघरी
ज्ञानराज हांगून गेले सार्थ ज्ञानेश्वरी
माया लोभ जकला गुंता जटीलभारी
नाम घेता फुकाये तारी पांडुरंग हरी

    कविवर हेमंतराम पाटील-वरोरकर.
      8108419392.





लगीनसोहळा

लगीनसोहळा

कुणीतरि आवर घाला लगीन खर्साला
जवडा खर्स घणा तवडा बहुमान त्याला
तालेवारांस लगीन म्हणजे दिवाळ सण
साक्षवीडा, मेहंदी, हळद मंग ढणाढण

लगीन म्हणजे दोन मनाया हृदयस्थ मेळ
पण  बडेजावापायी होतो पैशाया खेळ
हळदीला वारूणीया झिंगझिंग झिंगाट
मटण कोंबडवड्याहा तर लाखाया घाट

लाखाया मंडप पारव्या दिव्याही आरास
जेवणावळीये बेचव सतरा प्रकार खास
अन्नाही नुसती नासाडी अन पैशाही वाट
भल्या माहणा बुधा क्यालारं अवडा थाट

अनाथाश्रम तुमसी वाट पावतात निशिदिन
त्यांना करा सहाय्य पदरीपुण्य सत्पात्री दान
अटे गरीबांस दोन घासही मिळणे दुरापास्त
रजिस्टर लगीन पर्याय स्वस्त आश्वस्त मस्त

कविवर हेमंतराम पाटील-वरोरकर
    8108419392.




ठकास महाठक


 

ठकास महाठक
           

अवलिया आला दारा कुडमुड्या ज्योतिष
भोट्यान बोलला कुंडली तुमसी झकास
हात दावड जरा तुमसा पावतो भविष्यास
तळहाती तुमस्या बलवान हाय धनरेष

बरास वेळ घेवून हातात हात पावत रेला
पालथाकरुन बोले आजवरी पैसा ना टिकला
बो भोळा स्वभाव तुमसा झट भरोसा करता
काढून पैसा खिशातला पटकन देऊ करता

तुमी करता मदत दुजा तुमस्याकामी  येत नय
राग राग घरात उगी लेकरांबाळांवर खेकसताय
जवळसं लांबसं कळेना तुमी हत्तीगत सरळमार्गी
पटकन पचतात तुमाला बीजाही पुराणाही वांगी

सुख लिवलं कपाळी तुमस्या हांगतो तेवढं करा
कुळदैवता भेट दे आय लक्ष्मीही ओटी भरा
तुमसा देव हांगतो गावठी कोंबडा बकरा मारा
पैका मोप येणार हाय तुमी ओंजळ खाली करा

मंग मी उत्तरलो,जोशा आता तुहं भविष्य ऐक
नवलाईनं मला बगत गर्भगळीत जाला ठक
बळजबरीनं  मग त्याया हात हातात की घेतला
नय धनरेषा तुह्या हाती भिकारी ठक कुठला

अयला आलास तू ठका हाकलून बयेनं लावला
दारु, गांजा व्यसनापायी तू वस्तूवाणा  विकला
पोरांटोरांना होडून आता संन्यास अहा  घेतला
संधीसाधूबाबा पळभरही मायाहमोर ना टिकला

आयकून शब्दबाण उर्मी त्याह्या बो बो  झोंबले
बंबंम भोले  पुटपुटत दाढीहे दोन किही उपटले
भोट्टे डोळे करून उसासा होडत काळे तोंड केले
ठकास महाठक बनून कविवरे भामट्या नमविले

     कविवर हेमंतराम पाटील - वरोरकर
     8108419392.

एक रूपया दान


एक रुपया दान

महादेवाया देवळात गेलाे नतमस्तक हाेउन जवा
दाेनवे हात जाेडून दानपेटीत टाकला रूपया तवा

रुपया टाकला न काय नवल प्रत्यक्ष उभा महादेव
देव बोलला क्याला केली मठात येव्याही उठाठेव

अरेच्या एका रुपयात साक्षात जालं महादेव दर्शन
अह्या साक्षात्कारापासून वंचित कवडेक महाजन

देव वदला ,भोट्टाबिलंदर हाय तू वाडवळ गड्या
दानपेटीत फक्त रूपया अन मागण्या कवड्या?

मायाघरा लक्षुमी येउन दे,पाेराला लागूदे कामधंदा
जाे जे वांछील ताे ते लाहो, वारे वा काय यो सौदा

अरे देवळात येऊन दुकानात आल्यागत वागताेस
शिवाय एका रुपयात अवडं सब्बन मागताेस?

अरे देवा,मी मांगटल तू  दिलं अह कवा जालं का
ईमानी माहणाया कष्टाला फळ कवा आलं का?

ज्यांसी पाेट खाऊन फुगली, त्यांसी तू भर करतोस
अन मी  रुपया दिला भगून डाेळे काय वटारतोस

माया रुपयाला कमी लेखू नको देवा,हिणवू नकोस
यो रुपया घणा सात्विक हाय देवा नको अवमानुस

कविवर हेमंतराम पाटील-वरोरकर.
8108419392.