Wednesday, 27 February 2019
मराठी राजभाषा दिन
Friday, 22 February 2019
वरोरनगरी
🌹✍ वरोरनगरी✍🌹
माही वरोरनगरी म्हणजे अवघी आनंदनगरी
वहती बामण माळी हरिजन मांगेले भंडारी
खंबायमाता विठ्ठलरखुमाय साई दैवते मंदिरी
भगता वारूनी हरती समस्त दुःखे परिवारी
जकले वाडवळ जाणती उपजावू माती वरोरी
पेराल ते उगवेल सुपीक मोरडात समुंदरतीरी
बागबगिचे फुलले तरू फळले डवरल्या वल्लरी
वांगी मुळे पापडी तांबोटी भाज्या हेंगा गवारी
नय भेदाभेद जातीपातीहा सुखशांती घरोघरी
गुण्यागोविंदाने नांदती मजेत सब्बन गावकरी
सलोख्यात एकनंबरी जाणून बहू दुनियादारी
स्वर्गलोकी वाटेल हेवा ऐसी वरोर दूहरी पंढरी
येती तरी सुखे या जाती तरी सुखे जा ममवरोरी
परकेपणा न वाटे कुणा वा बोझा न कुणावरी🚩
हेमंत राम पाटील -वरोरकर
मुंबई 400068.
🌹🌹🙏✍🌹🌹
Thursday, 21 February 2019
महणात गेली
ती माहणं महणात गेली
(वाडवळी गझल)
लांडीलबाडीनं दुहर्याही दौलत ज्यांनी हडपली
ती लांडगी महाणं माहणं नुरता महणात गेली
घरफोडी करून नांदती घरं ज्यांनी दुभंगली
ती घोर्पडी महाणं माहणं नुरता महणात गेली
वारूणीहंगे जिंदगी ज्यांची बाटलीत बुडाली
ती आसुरी महाणं माहणं नुरता महणात गेलीं
ऐदीपणे दुहर्या तव्यावर पोळी ज्यांनी हेकली
ती बांडगुळ महाणं माहणं नुरता महणात गेली
आप्पाबापा डोवरपणी भीकेही वेळ आणली
ती सौदागर महाणं माहणं नुरता महणात गेली
हेमंतराम पाटील-वरोरकर.
गोड बोला
गोड गोड बोला
घेताना माहणू गोडगोड बोलतो
परत करताना मातुर कदोठा तुटतो
तीळगूळ घ्या गोडगोड बोला भाय
गूळातून गोडवा जाता बाकी काय?
भीड ठेवाल ते भीक मागव्या लागेल
गोड बोलबच्चन धुतारे पार नागवतील
एकदा का अनुभव आला की सावधान
दुहर्यावेळी बंद करा देणं उसनवारीनं
गोड बोला यो संदेश बहुदा सत्याग्रहीहाटी
क्यव ते मरेस्तोवर यांसी कोरडी रेते घाटी
मधगळे मधाळ बोलून पळवती तूपरोटी
कडव्या फटकळ बोलापायी हाती नरोटी
गोडगोड बोल बये मोहनवर मोहिनी घाल
जाळ्यात मासा गावला की झालं चांगभलं
भल्या बुधा गोड बोलून करती भुलभुलैया
पाठी लागतो हाहुरवाडा तहहयात भय्या
हेमंतराम पाटील-वरोरकर.
मकरसंक्रांती १५/१/२०१९
डोस्क ठीकाणी हाय का ?
डोस्कं ठीकाणावरं हाय का?
उभारा उभारा उस्से पुतळे महापुरुषांसे
होऊ देत कोट्यावधी खर्स रयतेहे पैसे
बांधा बांधा देऊळं बांधा जरि वादग्रस्त
तेत्तीसकोटी देव नांदोत मंदीरी समस्त
राम कृष्ण आले नि गेले मूर्तीरूप जाले
डोस्क ठीकाणी हाय का? पुसणारे नुरले
जागोजागी सिमेंटी डोलारे अर्धवट उबे हात
बिल्डर नशेत न ग्राहक बहले हायहाय करत
कवडेक घोटाळे जाले वार्यावर विरून गेले
ठगांनी ठगविलेले ठणाणा करून गप्प जाले
कोणीही शासक येवोत लुटेरे लुटत हुटले
डोस्क ठीकाणी हाय का? पुसणारे नुरले
सवलतीह राजकारण वाढत गेलं गजकरण
जातीपातीया शृंगापत्तीत गरजूयं होते मरण
आर्थिक निकषावर सवलती द्या समद्यास्नी
नयते तुला नय माला नय घाल कुतर्यास्नी
अच्छे दिन बेपत्ता बहुजन मात्र दीन जाले
डोस्क ठीकाणी हाय का? पुसणारे नुरले
हेमंत राम पाटील-वरोरकर.
8108419392
तिरंगा
🇮🇳🇮🇳🇮🇳 *तिरंगा* 🇮🇳🇮🇳🇮
अभिवंदनीय गणतंत्रदिन
🇮🇳या देशाची शान आणि आन तिरंगा
आम्हा भारतवासीयांचा प्राण तिरंगा🇮🇳
🇮🇳जयहिंद नारा अमुचा,हाती तिरंगा
अखिल भारतीय गाती जयगीत तिरंगा🇮🇳
🇮🇳निळ्या आभाळी फडके अभिमान तिरंगा
तिन्हीलोकी श्रेष्ठ अमुचा भारतीय तिरंगा🇮🇳
🇮🇳क्रांतीकारक कुर्बान ,घेऊन तिरंगा
वीरजवान शहीद झाले मिरवित तिरंगा🇮🇳
🇮🇳सदैव लहरत राहो विजयी विश्वतिरंगा
अभिमानाने जपू मान वंदनीय तिरंगा🇮🇳
🇮🇳स्वातंत्र्याचे प्रतीक आमचा मान तिरंगा
अखंड एकतेचे विजयगीत तिरंगा🇮🇳
🇮🇳कोटी कोटी जनांचा प्राण हा तिरंगा
प्रण घेवू अर्पू प्राण आम्हा प्रिय तिरंगा🇮🇳
🇮🇳हुतात्म्यांची प्रेरणा सदोदित तिरंगा
ताकद आमुची वर्धमान बुलंदी तिरंगा🇮🇳
🇮🇳स्वातंत्र्यलढाई जिंकून विजयी तिरंगा
अविरत फडकत ठेवू हा विश्वतिरंगा🇮🇳
🇮🇳करतो आम्ही प्रणाम हा अमर तिरंगा
लाल किल्ल्यावर डोलतो डौलात तिरंगा🇮🇳
🇮🇳हा देश माझा महान, सन्मान तिरंगा
दैववशात लाभले वरदान आम्हातिरंगा🇮🇳
🇮🇳क्रांतीचा ज्वालामय अग्निपथ तिरंगा
जन्मभूमी भारतभूची रक्षक ढाल तिरंगा🇮🇳
सत्यमेव जयते ब्रीदवाक्य जयघोष तिरंगा
सव्वीसदली पुष्प अर्पितो कविवर तिरंगा
कविवर हेमंतराम पाटील.२६/१/२०१९
बी-२०१, त्रिवेणीसंगम,तावडेवाडी,
एल.टी.रोड, दहिसर (पश्चिम ),
मुंबई ४०००६८.M-8108419392.
प्रिं. भानुदास सावे
प्रिंसिपाँल भानुदास सावे
प्रिंसिपाँल भानुदास सावे आदर्श गुरु अमुचे
सिद्धहस्त संचालक मौनीविद्यापीठ गारगोटीचे
पाटीलवाडा चिंचणीचे मणिरामसुत विद्वान महा
लखाकता नभांगणीचा भूवर उतरला तारा हा
भावभोळा सांबाचा अवतारचि जणू अवतरला
नुसत्या दर्शनांती समाधान शिष्यगण पावला
दास हो आम्ही या गुरुवराचे धन्य जगी झालो
सर भानुदास मणिराम सावे गुरुकृपे उद्धरलो
मणिराम पित्याचे स्वप्नपूर्तीस्तव चिंचणी गाठले
निवडुंगी कंटकीय जीणं रसाळ फळासी आले
राम हेराम बीजमंत्रे वाल्मिकी आम्ही घडलो रे
मम के.डी. हायस्कूल चिंचणी लौकिकास आलेरे
मोरया तू मोरगावचा चिंचणग्रामी प्रगट जाहला
रेणूअणूचा विज्ञानवादी बुद्धिवाद बिजांकुरला
श्वसन हे अक्षरब्रम्हाचे श्वासागणिक सारे जगले
रम्य असे विद्यार्थीजीवन भानूसवे तेजोमय झाले
सारेगम पधनिसा सप्तसूर झंकारून निनादले
वेदांना जे नाही कळले ते ज्ञान गुरुराये दिधले
सकल शिष्यां समता ममता बंधुता शिकविली
रज तम गुण त्यजूनी सात्विक सुमने घडविली
कविवर -- हेमंत राम पाटील .एस एस सी १९७१
201बी/ त्रिवेणीसंगम,. तावडे संकुल, दहिसर(प).
मुंबई 400068. मो. -- 8108419392.
स्नेहमयी राजस्थान पर्यटन
वँलेंटाइन स्नेहमयी सहल समारोह
श्री सिद्धिविनायक नेहानिल टूरटूर पर्याटन
उत्तम बडदास्त ठेवून सोयसुविधा करी प्रदान
जेष्ठस्रेष्ठ बहुजनांसी सांभाळीती देती सन्मान
कवतुकमय आपुलकीने होती साजरे वाढदिन
तेहत्तीस पर्यटक नांदले घरोब्याने पंधरा दिन
समासमी जुळूनबंध योगायोगे सुयोग वँलेंटाइन
मेवाड मारवाड दौरा सफल जयजय राजस्थान
सह्याद्रिचे पुत्र आम्ही केले अबूपहाडी प्रस्थान
वाळवंटी वाळूचे डोंगर मरूभूमी रमले हे मन
तंबूनिवास जैसलमेरी नर्तनगणी अनुभव छान
उंटावरची सफर राहील मम स्मरणात दिनोदिन
बिकानेरी जयगड सुंदर उंदिरमामा मंदिर महान
उदयपूरचे शिल्प गाती राणाजीचे पवाडकथन
जोधपूर पूष्कर अजमेर देखता हरपले भान
चितोडची राणी पद्मावती धन्य धन्य पावन
अब्रू रक्षणार्थ केला जोहार अपुले प्राण अर्पून
जयपूर गुलाबी पत्थरमय वाळवंटी नंदनवन
जंतरमंतर आमेरगड बिर्लामंदीर हरितोद्यान
आनंदाचा कंद ऐसा देई मना अति समाधान
श्री सिद्धिविनायक टूर्स घडवी सकला पर्याटन
हेमंत राम पाटील. 8108419392
दहिसर , मुंबई. 14/2/2019.