डुंगा बामणाही बाव
आठवणीत हाय अजुन डुंगाप्पाही बाव
मधल्या हुटीत खोब्यान मनपूत पाणी प्याव
डुंगाप्पा बावीहं निर्मळ थंडगार सुद्द पाणी
लाकडी हातरहाटानं ओढव्या मजा घणी
आख्खा गाव या बावीया पाण्यावर पोसला
डुंगाप्पा जलदाता भगून मोप महान ठरला
अनेक बहिणाईनं जलगायन सुरेल गायलं
त्या गायनानं झर्यासन तोय झरझर झरलं
अरे पाण्यामधि पाणी डुंगा बावीहं चांगलं
पहा पाणेरणीया घागरीत डुंब तुडुंब भरलं
ज्यानी त्यानी येताजाता निर घोट मारले
पाणी पिऊनशान गावकरी पाणिदार जाले
आता शहरात पितो वाकुड्या नळातले पाणी
गावस्या कविता लिवून जागवितो आठवणी
बालपणी प्यालो बावडीजल शुद्ध बामणी
तेस पाणी आता पाझरे कविवराही लेखणी
........पी. हेमंतराम कविवर.
No comments:
Post a Comment