✍ मनाहे श्लोक
मना हेमना वाडवळ कटृटा भारी
लिवा वाडवळी मनाला ऊभारी
भेटल्या वाडवळाशी वाडवळी बोला
वाडवळीत द्यावा टोल्यास टोला
जरि का हांगति संतती वाडवळाही
वाडवळी नाद घुमवा दशदिशा दाही
गावठी बाबु गणि सायेब सवताला
वाडवळीत द्यावा टोल्यास टोला
वाडवळीहा दुःस्वास कटृयाला भार
खोगिरभरति कटृयास हानि थोर
तरि कटाक्षे जपा माय वाडवळीला
वाडवळीत द्यावा टोल्यास टोला
सदा वाडवळीसा मनी ध्यास घ्यावा
वाडवळी रोपटे सब्बनाठायी लावा
महालक्षमी मायसा आशिष सकला
वाडवळीत द्यावा टोल्यास टोला
............हेमन वरोरियन.
ला
No comments:
Post a Comment