Friday, 18 November 2016

कावकाव

अरे जिवंतपणी जल्मदात्यांनी भोगल्या व्यथा
मंग आप मेला जग बुडलं सुलीत घाला प्रथा
कोणसि परस्थिती अहते नहते तरिपण
समासिक वर्षश्राद्धाला द्या गावंजेवणं

काय हांगू लोका तुमा प्रथा नि व्यथा
जाल्या अर्थहिन कालबाह्य या प्रथा
अरे बामणा जर तुहा मंत्राया हाय बो जोर
जमिनिवरसा गोग्रास ने पाव घराया छतावर
जर का ये शक्य नय बामणा तुला
छतावरसा नैवेद्य कहा पोसेन स्वर्गाला

..........हेमन  वरोरियन.

No comments:

Post a Comment