Friday, 18 November 2016

दीवाळी

🎆दीवाळी
तहोळी रवोळी चकली कडबोळी
आकाशकंदिल दिव्यांसी दीवाळी
ऊजळत आली फटाकडी दीवाळी
तोरण दारी ओटी सजली रांगोळी

मग कंपन्यांहा बोनस बो खुळखुळला
सुतळीबाम डामरीफटाका फटफटला
एक फटाका हरीया उडव्यात घुसला
पेटक्याफटाक्यानं भाताय उडाव पेटलं

बिज्या दीवाळीत आत्म्याह घर पेटलं
गाववाल्यांहीन निधीकाडुन उभारलं
तिहर्या दीवाळीला वाळणीह लुगड राख
मंग दीवाळीला फक्त देती शुभेच्छा लाख

शाणे व्हा नका करु ध्वनिवायु प्रदुषण
शाळेत गुरुजी हांगे राखा पर्यावरण
आली दीवाळी सावधान माणसा तरि
दीप ऊजळून ठेवि सद्भावना अंतरि

..........हेमन  वरोरियन.

No comments:

Post a Comment