✍प्रथा न व्यथा
क्षात्रैक्य परिषदेत अंतर्भूत अहलेला पाठारे समाज दहिसर ते अलिबागतक एकवटला हाय.दोन तीन वेळा मर्तुकीला गेलतो.तवा एक प्रथा पावुन तो समाज कवडा बुरसटलेला हाय या गोष्टी कल्पना आली.
मुडदा ईस्पितळासन आणेपर्यंत तिन तास गेले.लोकाना दिलेल्या वेळेप्रमाणे दहा पासुन ते खोळंबले होथे.तोपर्यंत धार्मिक विधिहाटी बामणायी खोवळाखोवळ जाली.भोट्या मुस्किलीन एक बामण पाच हजार बोलीवर तयार जाला.
दुपारी एक वाजता कफनात गुंडाळलेले कलेवर न मरतुकीया बामण कहेबहे एकत्रस पोसले.
मंग बामणानं दोन तासात विधि आटोपता घेतला.
त्या प्रेताही अवदशा होऊन दुर्गंध हुटलवा.जमलेल्या लोकांपोटात कावळे कोकलतवे.एकदास प्रेत तिरडीवरुन स्मशानाकडे मार्गस्थ जाले तवा लोकांनही शार वाजता हुटका जाली.
खर म्हणजे बामणाला ढाळणी देऊन पाच हजार रुपये वासवता आलेते व लोकाया खोळंबा,प्रेतायी दुरावस्था या व्यथा टाळता आल्या अहत्या.
आप मेला जग बुडाल मंग कयस्या व्यथा न कयस्या प्रथा.
..........हेमन वरोरियन.
No comments:
Post a Comment