हकाळसि पोळी
हकाळ हकाळ लिवतोय शार ओळी
वाडवळ कटृयावर भाजतोय पोळी
भींतीवर पावा हार न मानणारा कोळी
हकाळ हकाळ लिवतोय शार ओळी
जवान झेलतो सरहद्दिवर बंदुकीगोळी
वेदनेत व्याकुळतो तो माहणू वाडवळी
राजकारण्या मोरस्यातअहते नवी खेळी
हकाळ हकाळ लिवतोय शार ओळी
रमो गुर्जरभाय लखलाभ दहरादिवाळी
रमलूभगताही सदाकदा जिवायी होळी
फरक नाय काय वाडवळ जाला जरि माळी
हकाळ हकाळ लिवतोय शार ओळी
.........एच.आर. कविवर.
No comments:
Post a Comment