✍📱सोन्याहा मोबाईल
जेवणाखाण्याही आंघोळीही सुद नय रेली
कार्टी आजकाल मोबाईलमय बो जाली
आख्खादिही कानाला मोबाईल लावलाय
सोन्याहा मस्त टाईमपास साललाय
ओबाय हांगते थांबव मोबाईल खेळ
दे जरा आपल्या घराहाटी पण वेळ
सोन्या काय पण कोणस ऐकत नाय
त्यासा येळकोट अजिबात राहत नाय
कामधंदा होडुन सोन्या घरास बहलाय
मोबाईलने पुरता त्याला पागल केलाय
गुप्तगू करव्याहाटी सोन्या संडासात बहला
मोबाईल सोन्याहा कमोडमन पडला
मोबाईल बिगडला पण सोन्या सुधारला
वाया गेलेला परत थार्यावर आला
भला लाभला जलम वाडवळ बाळा
कोणत्याव गोष्टीया अतिरेक सदा टाळा.
...........एच आर कविवर.
No comments:
Post a Comment