✍ विष्णुजी तुमीस सावरा
कालस खंबायमातेया दर्शाना वरोरा गेलो
सरकारी दुजाभाव पावून हबकुन गेलो
मारोडा ते मांगेलवाडा सिमेंटरोड जाला
वाडवळांना कच्चारस्ता यो दुजाभाव क्याला
विद्यमान आमदारांही जुनीघरं त्या रस्त्याला
पण विरोधी अहल्यानं राग तुमा आला
पालकमंत्री सावरा क्रोधा आवर जरा घाला
बाहुजनांनी निवडुन दिले अवड्यात विसरला
विष्णुजी नाव तुमसे जगतोद्धारा पुराणकाळा
खंबायमाय लक्षिमीरुप ठावं कळीकाळा
सिमेंटीकरण करा तुमी खंबायस्या देवळापर्यंत
देवी खंबाय तुमस्या डोईवर ठेविल हात
...........हेमन वरोरियन.🍁🙏🏼
No comments:
Post a Comment