वाडवळ कट्टा
बहु अहोत मोबाईलवर कट्टे जरि महा
प्रिय आमुसा वाडवळी कट्टा धन्य हा !
कितिकांनी कैक अहे कट्टे सालविले
आला संदेश बिजा धाडुन मोकळे जाले
वाडवळ कट्टयाने परि स्वत्व राखले
मायबोली वाडवळीत साहित्य शोभले
वाडवळीस अच्छे दिन दावूया पुन्हा
प्रिय आमुसा वाडवळी कट्टा धन्य हा!
काव्यकथा विनोद लेख शब्दसंपदा
आदानप्रदान वाडवळीतुन धार संवादा
कदी स्पर्धा वाडवळीत आयोजिति तदा
लेखणी बरसते अनेकांसी अनेकदा
लिव्या ते वाडवळीतस नयते मुकाट बहा
प्रिय आमुसा वाडवळी कट्टा धन्य हा!
.........एच आर कविवर.
No comments:
Post a Comment