Friday, 25 November 2016

निरोप सरत्या वहराला

निरोप सरत्या वहराला
सरत्या वहराला निरोप ई गोर्यालोकांही प्रथा
गोरे गेले पण प्रथा पसरली ई खरोखर व्यथा
एकतीस डिसेंबरला खपेल वहर वीसशेसोळा
विसशे सतरा स्वागताला होतिल मैतर गोळा

सरत्या वहरा दुःख भारी सुरापान रात्र सारी
नव्यावहरायी सूर्यकिरणे गुदगुदति ढुंगाणावरी
सूर्य यांस्या स्वागताला हे खरे बा सूर्यवंशी
नूतन वहरसुस्वागतम् सौजन्याही ऐशीतैशी

उगवता सूर्य बिसार्यानी कवा पावलास नय
तो दिहेपर्यंत विक्रम आपला हट्ट होडणार नय
वेताळ बिसारा दरवहरा हांगुन कंटाळुनगेलाय
पेगाया नव्या विक्रमात तळीराम भानावर नय.

..........एच आर कविवर.

No comments:

Post a Comment