गराण
खंबाय माय बंगला बांधलाय
रेव्याला कोणी तैयार नाय
जो तो शहराला मुक्काम ठोकतोय
गावात घर बग सुनसान हाय
वरोरशी दैना हांगु तरि काय भाय
घर हात पण माहणांसा पत्तास नाय
काही गावांत गोकुळ नांदतेय
काही गावाना बरखत नाय
हौसेखातर गावि बांधला बंगला
शहरात रमला कुटुंब कबिला
यो बिसारा एकटास वीकएंडला गेला
साफसफाई करण्यात कणा मोडला
आता मुंबाभाय केली पासष्टी पार
आधार नय रेला जिवाला घोर
शेवटी दोन वार कफन सरणावर
जकली दौलत रेणार बठ्ठी जागेवर
भगुन हांगत आपला वाडवळ कटृटा
आधार जकल्या वाडवळा बो भोटृटा
आपली सवताही घर अहोत नहोत
आपल्याला बेघर नाय कटृयाह नातं
..........हेमन .वरोरियन.
No comments:
Post a Comment